जगभर युरोप-अमेरिकेतील लेखकांचा दबदबा असतो. त्यांची पुस्तके, त्यांचे इतर भाषांमध्ये होणारे अनुवाद, त्यावरील चित्रपट आणि या साऱ्यातून त्यांना मिळणारे मानधन हा प्रकाशनव्यवसायात कायम चर्चेचा विषय असतो. अशा अब्जाधीश लेखकांच्या मांदियाळीत आशियातील नावे क्वचितच असतात. भारतीय तर जवळपास  नाहीच. पण या वर्षी मात्र चीनच्या जियांग नान या फँटसी-कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकेने चीनमधील सर्वाधिक श्रीमंत लेखकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. तिला या वर्षांत तिच्या पुस्तकांच्या मानधनापोटी २५ कोटी ९० लाख रुपये मिळाले आहेत.
गेल्या वर्षी साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक विजेते चिनी कादंबरीकार मो यान यांचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. त्यांना वर्षभरात २४ कोटी ४५ लाख ३२ हजार ६७५ रुपये मिळाले आहेत.
चीनमधील हॉक्सी मेट्रोपोलिटन डेली या वर्तमानपत्राने ६० श्रीमंत लेखकांची ही यादी जाहीर केली. त्यात तिशी ओलांडलेल्या तरुण लेखकांची संख्या लक्षणीय आहे. २००६ पासून ही यादी प्रतिवर्षी जाहीर होते आहे. यंदा पहिल्यांदाच फँटसी-कादंबरी लेखिकेने या यादीत पहिला नंबर मिळवला आहे.
यावरून चिनी जनमानस कुठल्या दिशेने प्रवास करते आहे, याचा अदमास येतो.   नोबेल विजेते मो यानही जादुई वास्तववाद चितारणारेच कादंबरीकार आहेत.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
तुकीज ग्रँड सलून चेस : पारुल शर्मा, पाने : २९६३५० रुपये.
द हेन हू ड्रिम्ड शी कुड फ्लाय : सूं-मी वांग, पाने : १३४२९९ रुपये.
टॅटीयाना : मार्टिन क्रुझ स्मिथ, पाने : ३३६४९९ रुपये.
द स्कॅटर हेअर इज टू ग्रेट : बिलाल तन्वीर, पाने : २१४३५० रुपये.
लँड व्हेअर आय फ्ली : प्रज्वल पराजुली, पाने : ४००४९९ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
पर्पच्युअल सीटी-अ शॉर्ट बायोग्रफी ऑफ दिल्ली : मालविका सिंग, पाने : १३६२९५ रुपये.
द सायकोपाथ इनसाइड : जेम्स फॅलन, पाने : २५६/७९९ रुपये.
द लँड ऑफ फ्लाइंग लामाज  : गौरव पुंज, पाने : २५६३९५ रुपये.
द ईमेल रिव्होल्यूशन : व्ही.ए. शिवा अय्यादुराई, पाने : ४५०४९९ रुपये.
इफ इट्स मंडे इट मस्ट बी मदुराई : श्रीनाथ पेरूर, पाने : २९६४९९ रुपये.
सौजन्य -फ्लिपकार्ट.कॉम