29 September 2020

News Flash

तपन रायचौधुरी

इतिहासाचे पुनल्रेखन, पुनर्कथन आणि इतिहासातील अज्ञात पलूंचे संशोधन या भिन्न बाबी आहेत. हे आजवर अनेक इतिहास संशोधकांच्या आयुष्यभरच्या संशोधन प्रवासातून सिद्ध झालेले आहेच

| December 1, 2014 02:45 am

इतिहासाचे पुनल्रेखन, पुनर्कथन आणि इतिहासातील अज्ञात पलूंचे संशोधन या भिन्न बाबी आहेत. हे आजवर अनेक इतिहास संशोधकांच्या आयुष्यभरच्या संशोधन प्रवासातून सिद्ध झालेले आहेच; परंतु इतिहासाचे पुनर्कथन सर्वपरिचित, तर संशोधन प्रामुख्याने विद्यापीठीय क्षेत्रापुरते मर्यादित झाल्याचे अनेकदा दिसते. विद्यापीठीय कुंपण ओलांडून इतिहासाचे संशोधन लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी निराळे प्रयत्न आवश्यक असतात. हे जाणणाऱ्या थोडय़ा भारतीय संशोधकांपकी तपन रायचौधुरी यांनी गेल्या आठवडय़ात, २६ नोव्हेंबर रोजी ऑक्सफर्डमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
‘केम्ब्रिज इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथाच्या दोघा सहसंपादकांपकी एक, ऑक्सफर्ड विद्यापीठात १९७० च्या दशकापासून इतिहासाचे प्रपाठक आणि मग तेथेच तहहयात किंवा ‘सुप्रतिष्ठ’ प्राध्यापक, त्यापूर्वी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इतिहासाचे प्राध्यापक आणि या साऱ्या प्रवासात इतिहास संशोधकांच्या किमान तीन पिढय़ांचे मार्गदर्शक ही तपन रायचौधुरींची विद्यापीठीय संदर्भातील ओळख; पण ब्रिटिशपूर्व भारताच्या आíथक आणि सामाजिक इतिहासावर त्यांनी केलेले संशोधन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वयाची ८५ पार केल्यानंतर (२०१२) प्रकाशित झालेले त्यांच्या आठवणींचे पुस्तकही मौलिक आहे. या पुस्तकात स्वत:च्या बालपणी बंगालची जमीनदारी पद्धत कशी सुरू होती, हे विस्ताराने आले आहे.. इतके विस्ताराने की, बंगाली विषमतेची पाळेमुळे कशी आजही घट्ट आहेत, हे वर्तमानकाळाकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहणाऱ्यांच्या लक्षात यावे. पाश्चात्त्य आणि/ किंवा वासाहतिक इतिहास संशोधन पद्धतीपेक्षा निराळी संशोधन शैली विकसित करणाऱ्या इतिहासकारांत तपनदांना मानाचे स्थान आहे आणि राहील.  पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सद्दी सुरू होण्यापूर्वीच तपनदांनी इतिहासकार म्हणून ख्याती मिळवली होती. ते रूढार्थाने अजिबातच डावे नव्हते. मात्र सामाजिक प्रश्नांची मुळे ज्या समाजरचनेत असतात त्या रचनेचा आíथक पाया शोधून, खोदून पाहिल्याखेरीज प्रश्न कळणार नाहीत, हे तत्त्व त्यांना मान्य होते. गेल्या २५ वर्षांत त्यांच्यापुढले प्रश्न बदलले; तेव्हा मात्र- शिक्क्याने दबलेल्या विद्वानांपकी तपनदा नाहीत, हे सुज्ञांसह काही अज्ञांनाही समजले. तोवर तपनदांचा लौकिक वाढला होता. भारतीय राष्ट्रवादाचे एक संशोधक, आíथक इतिहासकारांतील अग्रणी आणि वसाहतवादाने खजीलच का असले पाहिजे यामागला सत्यांश मांडून दाखवणारे, ही त्यांच्या मृत्यूनंतरही आठवतील अशी त्यांची वैशिष्टय़े झळाळत होती आणि २००७ मध्ये त्यावर पद्मभूषण किताबाची मोहरही उमटली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 2:45 am

Web Title: historian tapan raychaudhuri
Next Stories
1 पी डी जेम्स
2 कृष्णा कल्ले
3 सबा
Just Now!
X