मॅन बुकर पुरस्काराविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतेच आहे. पाश्चात्य प्रसारमाध्यमांमध्ये त्याविषयी वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. खरं म्हणजे लढवून दिले जात आहेत. तर ते असो.
१० सप्टेंबर रोजी या पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या सहा जणांची यादी जाहीर झाली. या पुरस्काराच्या इतिहासात आजवर न घडलेलं वैशिष्टय़ या वेळी दिसतं आहे. आणि ते म्हणजे झिम्बाब्वे, कॅनडा, ब्रिटन, आर्यलड, अमेरिका (मूळच्या भारतीय) आणि न्यूझीलंड या सहा देशांतील अनुक्रमे नोव्हायोलेट बुलायावो (‘वुई नीड न्यू नेम्स’), रुझ ओझेकी (‘अ टेल फॉर द टाइम बिइंग’), जीम क्रेस (‘द हार्वेस्ट’), काल्म कोईबेन (‘द टेस्टामेंट ऑफ मेरी’), झुम्पा लाहिरी (‘द लोलँड’)   आणि  इलिनॉर कॅटन (‘द ल्युनिनरीज’), या सहा लेखकांच्या पुस्तकांची निवड झाली आहे.  १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम निवडीत यातला कोणता देश आणि कोणता लेखक बाजी मारतो, ते जाहीर होईलच. पण तोवर सर्वाची उत्सुकता ताणलेलीच राहणार. शिवाय तर्कवितर्कानाही उधाण येत राहणार. आणि मुख्य म्हणजे पुरस्कार जाहीर झाल्यावरही त्याविषयीचे आक्षेप-पुरस्कार येतच राहतात. पण गेले काही दिवस या सहा लेखकांची, विशेषत: झुम्पाच्या पुस्तकाची जोरदार विक्री चालू आहे. ओझेकी या बौद्ध धर्मगुरूच्या पुस्तकाचीही अशीच चर्चा आहे.
फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द लोलँड : झुम्पा लाहिरी, पाने : ३५२४९९ रुपये.
द बिग फिक्स : विकास सिंग, पाने : २३६२५० रुपये.
द किल लिस्ट : फ्रेड्रिक फॉर्सिथ, पाने : ३५२३९९ रुपये.
आय रिफ्युज्ड टू ब्रिबे- अ स्टँड अगेन्स्ट करप्शन : गिरीश शर्मा, पाने : ३२०१९५ रुपये.
द इंग्लिश गर्ल : डॅनिअल सिल्व्हा, पाने : ४००३९९ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
पंजाब- अ हिस्ट्री फ्रॉम औरंगजेब टू माउंटबॅटन : राजमोहन गांधी, पाने : ४००६९५ रुपये.
ऑफ ऑक्युपॅशन अँड रेझिस्टन्स : संपा. फहाद शाह, पाने : ३४०३९५ रुपये.
आय ऑम प्रेग्नंट, नॉट टरर्मिनली इल, यू इडियट : ललिता अय्यर, पाने : २६६/२९५ रुपये.
ब्रदरहूड -धर्म, डेस्टिनी अँड द अमेरिकन ड्रीम : दीपक अँड संजीव चोप्रा, पाने : ३८४५९५ रुपये.
द सिक्रेट ऑफ लीडरशिप : प्रकाश अय्यर, पाने : २७२२९९ रुपये.