महात्मा गांधींना आज बरं वाटलं असेल, कारण ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचा खून अथवा ‘वध’(?) केला, कारण  त्यांच्यानुसार– ‘ त्या काळाची ती गरजच’ होती;  त्याच संघाच्या तालमीतला एक शिपाई आज देशाचा ‘प्रधान सेवक’ झाला आणि  महात्मा गांधींच्या मार्गावर चालायला लागला! हा सेवक  गांधींची महानता देशाबरोबर जगाला सांगतो आहे, त्यांच्या मार्गावर लोकांना चालायला ‘चॅलेंज’ देऊन भाग पडतो आहे. देशही गांधींनंतरचा महान पुरुष म्हणून या सेवकाला प्रतिसाद देतोय! सोशल मीडियावरून तरी.
सांगायचे एवढेच की, वेळ गेली, काळ बदलला आणि त्याच महात्मा गांधींच्या विचारांची गरज पडली. म्हणूनच असं म्हणतात की, माणूस मारून त्याच्या विचारांना मारता येत नाही. असो. कदाचित आता तरी आपली तरुणाई म्हणणार नाही- ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’.

इंग्रजी स्वच्छतेतील ‘स्व’ अचूक.. पुढले काय?
देशभर गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियान सुरू होणे, ही स्वागतार्ह घटना आहे. त्यात सहभागी होताना परिसर स्वच्छतेप्रमाणे लेखनविषयक स्वच्छतेकडे सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे,  असे सुचवावेसे वाटते. प्रत्येक शिक्षिताला केव्हा न केव्हा कोणी तरी शिक्षक शुद्धलेखनाचे नियम शिकवतो; पण हे सगळे ‘पालथ्या घडय़ावर पाणी पडल्या’सारखे! इंग्रजी व संस्कृत सोडून अन्य भाषांमध्ये लिहिणारे, लिहून घेणारे, छापणारे आणि सर्वाधिक वाचणारे असे सगळेच घटक शुद्धलेखनाबाबत आग्रही राहिलेले दिसत नाहीत. लिहिताना ‘चलता है’ अशी बेफिकीर वृत्ती सर्वत्र बळावली आहे. दुसरीकडे इंग्रजी शब्दांच्या स्पेिलगमध्ये जरा मागेपुढे अथवा वेडेवाकडे झाले तर लगेच आकांडतांडव करणारे महाभाग हजारोंनी सापडतील! आता ‘सदिच्छा’ हा शब्द इंग्रजीत लिहिताना बहुतेक जण रअऊकउऌउऌअ असा लिहितील, कारण त्यांना छ अक्षरासाठी उऌऌअ ही इंग्रजी अक्षरे लिहावी लागतात याचे ज्ञान नसते किंवा स्मरण राहत नाही! काहींना उ म्हणजे च आणि उऌ म्हणजे छ असेच वाटत असावे. आजच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ घोषणेच्या इंग्रजी तर्जुम्यात २५ूंँूँँं हा शब्द असा स्वच्छ लिहिलेला आढळत नाही, (त्याऐवजी तो २५ूंँँ असा आहे.) म्हणून हा पत्रप्रपंच!   
विजय काचरे, कोथरूड, पुणे</strong>

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Sharad pawar on Eknath khadse
‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”
satara lok sabha election marathi news, ncp satara marathi news
लोकसभेची जागा भाजपाला सोडण्यास साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोध, उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही नकार

आपल्याला ‘क्षुल्लक प्रश्न’ का पडतात?
शपथ किंवा प्रतिज्ञा घेतल्याने खरेच आपल्या भारतीयांच्या मनावर काही परिणाम होतो का? कृतीत त्याचे रूपांतर होते का? प्रबोधनाने आपण शहाणे होतो का? आपल्याला आपल्या व्यक्तिगत सवयी बदलण्यासाठी सामाजिक चळवळींची गरज का भासते? त्या यशस्वी होण्याचे केवळ भास होताहेत असे का वाटते? एखादे करड मानांकन आपण कागदोपत्री मिळवण्याएवढे हुशार नक्कीच असतो. निर्मलग्राम पुरस्कार मिळालेली गावे किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक पाहून आपल्याला मनापासून कधीच आनंद का होत नसावा? नवरात्रीच्या रास-गरबामध्ये फेर धरायला लोकांना सनी लिओन आणि हनी सिंगची(च) गाणी लावावीशी का वाटतात? त्यांना ध्वनिप्रदूषण कमी करण्यास व वेळेचे बंधन पाळण्यास सांगणारी व्यक्ती त्यांना अश्रद्ध आणि भांडकुदळ का वाटत असावी? ‘मुलांवर संस्कार व्हावे म्हणून’ शेजारच्या आजोबांना होळी-गणपती-नवरात्र उत्सव हवे आहेत. त्यांच्या संस्कारांमध्ये ‘आता माझी सटकली- मला राग येतोय’, ‘बेबी डॉल’, ‘चार बोतल वोडका’ ही गाणी(?) देवा(?)च्या मूर्तीसमोर वाजवली जाण्याला काय महत्त्व आहे?
स्वच्छ भारताचे स्वप्नरंजन करत रस्त्याने चालत असताना त्या चित्राच्या ‘फ्रेम’मध्येच (यश चोप्राच्या चित्रपटात नायिकेची ओढणी उडत उडत यावी तसे) दोनचार कुरकुरे किंवा तत्सम चिप्स किंवा ‘फेअर एन् लव्हली’च्या सॅशेंचे नको असलेले तुकडे कसे काय येतात? प्रबोधनाने आपण शहाणे होतो का?
तसे असते तर प्रत्यक्ष प्रबोधनकारांच्या मुलांकडे, नातवांकडे वा स्वत:कडे बघितल्यावर आपल्याला काही क्षुल्लक प्रश्न का पडतात?
डॉ. शैलेश सोनार, कल्याण</strong>

..आणि मंगळदोष
उपासतापासाविषयी पंतप्रधान मोदींनी जनतेला जो संदेश अप्रत्यक्षपणे दिला त्याबद्दलचे पत्र (लोकमानस, २ ऑक्टो.)वाचले. एकीकडे भारताचे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचले आहे; तर दुसरीकडे हजारो आईबाप आपल्या मुलामुलींना ‘कडक मंगळ’ असल्यामुळे त्यांची लग्नं कशी जमणार या चिंतेत आहेत, हा विरोधाभास भीषण विनोदी आहे. ‘एका प्रसिद्ध अभिनेत्याची भावी वधू मांगलिक असल्याने तिचे लग्न एका झाडाशी लावून देण्यात आले आणि तिचा मंगळदोष दूर करण्यात आला,’ अशी कहाणी आपल्याला अलीकडेच ऐकायला मिळाली आहे. यावर बिहारमधल्या एका स्त्रीवादी वकिलाने न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
 पंतप्रधानांना जर खरोखरच वैज्ञानिक ‘स्वच्छता अभियान’ सुरू करायचे असेल तर त्यांना आपला टिळा लावलेल्या स्वपक्षीयांपासून सुरुवात करावी लागेल. कारण पत्रिकावाल्या कुडबुडय़ांची संख्या त्यांच्या पक्षात सर्वात जास्त आहे आणि पत्रिका वगरे सगळा मामला कसा ‘वैज्ञानिक’ आहे हे सदर मंडळी आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. पण मतांचा जोगवा मागण्यासाठी गुंडांना मंचावर आणणारे, भ्रष्टाचाऱ्यांना पक्षाचे उपाध्यक्षपद देणारे याबाबतीत काही करतील हे संभवत नाही. कारण त्यामुळे पक्षाचा प्रस्थापित ‘जनाधार’ दुबळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ग्रहगोलांच्या या गोलमाल कल्पना जनमानसांत इतक्या घट्टपणे रुजल्या आहेत की त्यावर मात करण्यासाठी मोठय़ा आणि धाडसी नेतृत्वाची गरज आहे.
– अशोक राजवाडे, मालाड

दलित अनुयायांसाठी राजकारणबा रस्ता
‘संघं शरणम् गच्छामि’ (अन्वयार्थ, १ ऑक्टो.)मधून रामदास आठवले व त्यांच्या बरोबरचे सर्व रिपब्लिकन नेते यांची झालेली दयनीय अवस्था वाचनात आली. या नेत्यांनी सरकारदरबारी काही पद-प्रतिष्ठा मिळवण्यासाठी बाबासाहेबांच्या ध्येय धोरणाला, व्यवहाराला जो हरताळ फासला आहे त्याकडे नेते मंडळी सोयीस्करपणे दुर्लक्षच करतील; पण अनुयायांनी तरी शहाणे होऊन त्यांच्या सर्व लाचार नेत्यांना दूर ठेवून राजकारणापासून दूर असलेल्या संघटनांमधून सक्रिय व्हावे व समाजबांधवांची उन्नती करावी. बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्ञानोपासना केली व  ते कधीही लाचार झाले नाहीत, हा त्यांचा आदर्श समोर ठेवला तरच त्यांची प्रगती होईल.
-श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

‘पाळीव’ पशुवैद्यांकडे अनुभव उरला आहे?
‘मंत्र्यांचे ‘पाळीव’ डॉक्टर आता जनावरांच्या सेवेत’  ही बातमी (लोकसत्ता, १ ऑक्टो.) वाचली. या डॉक्टरांनी पशुवैद्यकीय कामांव्यतिरिक्त इतर कामे करण्यात १० वर्षांचा कालावधी मूळ विभागाबाहेर व्यतीत केलेला असल्याने ते त्यांचे मूळ काम विभागात रुजू झाल्यानंतर कितपत प्रभावीपणे करू शकतील याबद्दल शंका घेण्यास वाव आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना सराव व उपचार पद्धतीचे अद्ययावत ज्ञान असणे नितांत गरजेचे असते. ज्यांनी १० वष्रे पशुवैद्यकीय काम केलेले नाही ही वस्तुस्थिती असताना त्यांची त्या कामासाठी रवानगी करणे रास्त ठरत नाही. त्याऐवजी त्यांना एखादा उजळणी पाठय़क्रम करायला पाठविणे योग्य राहिले असते. असो. त्यांचे ‘रुग्ण’ मुके असल्यामुळे उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल अथवा चुकीच्या उपचाराबद्दल वाच्यता होणार नाही. आता तरी सरकारने विशेष सेवेमधील अधिकाऱ्यांच्या सेवा मंत्री आस्थापनेवर घेताना तारतम्य बाळगावे.  
– रवींद्र भागवत, सानपाडा (नवी मुंबई)

अशा ‘बिभीषणां’मुळे लंकेसोबत अयोध्याही
‘भाजपचे बिभीषणायन’ हा अन्वयार्थ (२ ऑक्टो.) वाचला. हरयाणा काय किंवा महाराष्ट्र काय, भाजप ज्या नमुन्यांना गोळा करतोय, ते पाहिले की सामान्य जनतेसाठी नक्कीच ‘अच्छे दिन’ येणार याची खात्री पटते.   
भाजपच्या रामनाम सदैव घेणाऱ्या नेतेमंडळींनी रामायण पुन्हा एकदा नीट वाचावे, म्हणजे त्यांना कदाचित कळेल की लंकादहनासाठी रामाने ज्या बिभीषणाची मदत घेतली, त्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत होती. त्याने शेवटपर्यंत रावणाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या मार्गाने जायचा सल्ला दिला. या कलीयुगातील बिभीषणामुळे लंकेबरोबरच अयोध्यादेखील जळणार नाही ना, याची दक्षता भाजपने घेतलेली बरी.
– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)