सध्या देशभर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाची हवा तयार होऊ लागली आहे. पहाडासारखा अडथळा मानल्या जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्यालाही मोदींचा वारू अडवणं  शक्य होत नाही.
जग नेहमीच उगवत्या सूर्याला नमस्कार करणारं असतं, त्यामुळे प्रसारमाध्यमे, मध्यमवर्गाचं विचारविश्व यामध्ये नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधानपद हाच विषय चर्चेचा  ठरतो आहे. त्यामुळे मोदींवर इंग्रजी पुस्तकं  प्रकाशित होऊ लागली आहेत. ‘नरेंद्र मोदी – द मॅन, द टाइम्स’ (नीलांजन मुखोपाध्याय), ‘द नामो स्टोरी – अ पोलिटकल लाइफ’ (किंगशुक नाग) ही पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत.  अजून काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत म्हणे! याचबरोबर गुजरातीमध्येही मोदी यांच्यावर काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची चरित्रं लिहिली जाताहेत, त्यांच्या दूरदृष्टीचा, विकासकामांचा उदोउदो होतो आहे. मोदी यांच्या अधिकृत बेवसाइटवरून तर मोदी यांनी लिहिलेली, ‘गुजरात संकटात’सारखी पुस्तके विनामूल्य डाऊनलोड करता येतात. ‘सामाजिक समरसता’ हे मोदींचे पुस्तक सध्या गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाचले जाते आहे. मोदी पंतप्रधान होतील की नाही हे निवडणुकीनंतरच कळणार आहे, पण मोदीत्व पसरायला आतापासूनच जोरदार सुरुवात झाली आहे.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
इन्फेर्नो : डॅन ब्राऊन, पाने : ५२८७५० रुपये.
लव्ह इज व्होडका : अमित शंकर, पाने : २१२१९५ रुपये.
अँड द माऊंटेन्स इकोड : खालिद हुसैनी, पाने : ४१६५९९ रुपये.
कन्फेशन्स ऑफ अ प्रायव्हेट टय़ूटर : विक्रम माथुर, पाने : १२८१०० रुपये.
फोरबिडन अर्थ : सबिना एरियाना आनंद, पाने : १७६१९५ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
इन द बॉडी ऑफ द वर्ल्ड – द मेमॉयर : इव्ह इन्सलर, पाने : २३२१९९ रुपये.
लंच विथ एफटी – ५२ क्लासिक इंटरव्ह्यूज : सं. लिओनेल बार्बर, पाने : ३३८८९९ रुपये.
बिइंग इन अदर्स शूज : सत्या मूर्ती, पाने : १७६/१५० रुपये.
अमेरिकन देशी – मास्टर्स ऑफ अमेरिका : अतुल्य महाजन, पाने : ३१८१९९ रुपये.
कम्प्लिट/कन्व्हिनिएंट : केतन भगत, पाने : ३८४१९५ रुपये.

सौजन्य : फ्लिपकार्ट डॉट कॉम