15 December 2019

News Flash

शतकाच्या साक्षीदाराचे चरित्र

काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला हे खूप आजारी होते. पण उत्तरोत्तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. काही दिवसांनी तर ते घरीही गेले.

| November 23, 2013 12:07 pm

काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला हे खूप आजारी होते. पण उत्तरोत्तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. काही दिवसांनी तर ते घरीही गेले. येत्या काही दिवसांत ते हिंडू-फिरू लागतील.. सभा-संमेलनांमधून भाषणंही करू लागतील, अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.
‘लाँग वॉक फॉर फ्रीडम’ हे त्यांचं आत्मचरित्र जगभर गाजलं. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवादही प्रकाशित झाले. त्यांची छोटी-मोठी चरित्रंही आजवर प्रकाशित झाली .
वय वर्षे ९५ असलेल्या मंडेलांनी विसाव्या शतकातल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या उलथापालथी पाहिल्या. कृष्णवर्णीयांसाठी कितीतरी मोठे काम केले आहे. त्यांचे ‘मंडेला- द लाइफ ऑफ नेल्सन मंडेला’ हे रॉड ग्रीन यांनी लिहिलेले आणि भरपूर दुर्मीळ छायाचित्रे असलेले चरित्र लवकरच प्रकाशित होत आहे. उत्कृष्टरीत्या सजवलेल्या या पुस्तकात मंडेलांविषयीची आजवर प्रकाशात न आलेली माहिती असेल. त्यामुळे हे चरित्र वैशिष्टय़पूर्ण ठरावे.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
ऑन अ विंग अँड अ प्रेयर : अरुण शर्मा, पाने : २५२२५० रुपये.
कॉम्बॅट ऑफ श्ॉडोज : मनोहर माळगावकर, पाने : १३६२९५ रुपये.
धीस प्लेस : अमिताभ बागची, पाने : २६०४९९ रुपये.
सीता-अ‍ॅन इलस्ट्रेटेड रिटेलिंग ऑफ द रामायणा : देवदत्त पटनाईक, पाने : ३२८४९९ रुपये.
हिरोज ऑफ ऑलिम्पस- द हाऊस ऑफ हेड्स : रिक रिओर्दान, पाने : ५६५४९९ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
इंडिया अ‍ॅट रिस्क : जसवंत सिंग, पाने : ३०४५९५ रुपये.
करेज अँड कन्व्हिक्शन : जनरल व्ही. के. सिंग, पाने : ३९६५९५ रुपये.
डेस्टिनेशन मार्स : एस. के. दास, पाने : १७६/१९५ रुपये.
अ‍ॅक्रॉस द चिकन नेक : नंदिता हक्सर, पाने : २८०४९५ रुपये.
सायन्स इन इंडिया : व्ही. व्ही. सुब्बरायप्पा, पाने : ६२४१५०० रुपये.
सौजन्य – फ्लिपकार्ट.कॉम

First Published on November 23, 2013 12:07 pm

Web Title: nelson mandela completed his life century
टॅग Nelson Mandela
Just Now!
X