बीबीसीमध्ये ३० वर्षे काम केलेले आणि त्यातील २० वर्षे दिल्ली ब्युरो चीफ म्हणून काम केलेले जानेमाने पत्रकार-लेखक मार्क टुली  अजूनही ‘नॉन स्टॉप’ आहेत. म्हणजे त्यांचे लेखन नॉन स्टॉप रेल्वेसारखं थांबत थांबत चालूच आहे. बरं, ते लिहिणार तेही भारतातील समस्या आणि विविध प्रश्नांविषयी.
त्यांचं नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. हा कथासंग्रह असून त्यात दहा कथा आहेत. त्या सर्वाची पाश्र्वभूमी आणि त्यातील पात्रं उत्तर प्रदेशमधील आहेत. संग्रहाचे नाव अजून ठरलेले नसले तरी त्यात नेहमीप्रमाणे ‘इंडिया’ हा शब्द  असेलच, असे वाटते.
१९९५ साली टुली यांचे ललितसाहित्याचे पहिले स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झाले. त्याचे नाव होते, ‘द हार्ट ऑफ इंडिया’. हा कथासंग्रह आहे आणि यातील कथाही उत्तर प्रदेशातच घडतात. या राज्याविषयी टुली यांना विशेष ममत्व असण्याचे कारणही तसेच आहे. त्यांच्या आईचे वंशज हे उत्तर प्रदेशात राहत होते आणि याच भागात ते ब्रिटिश सरकारच्याही सेवेत होते. आपल्या मुळांचा शोध हा सर्जनशील लेखकांसाठी कायमच कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय असतो.
त्यानेच टुली यांच्यासारख्या सजग पत्रकारालाही भुरळ घालावी ही थोडी नवलाची गोष्ट आहे.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द ककूज कॉलिंग : रॉबर्ट गालब्रेथ, पाने : ४९४५९९ रुपये.
लो प्रेशर : सँड्रा ब्राऊन, पाने : २८५३५० रुपये.
अ टेल फॉर द टाइम बिइंग : रुथ ओझेकी, पाने : ४००६९३ रुपये.
वुई नीड न्यू नेम्स : नोव्हायोलेड बुलावायो, पाने : ३३६५९९ रुपये.
शिवा- द लिजंड्स ऑफ द इमॉर्टल : क्षितिश पांडे, पाने : ८०१७५ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
द एलिफंट कॅचर्स : सुब्रतो बागची, पाने : २४०५९९ रुपये.
आयकॉन्स अँड इडियट्स-स्ट्रेट टॉक ऑन लीडरशीप : बॉब लुत्झ, पाने : २४०२५० रुपये.
फ्रॉम टू रॅट रेस टू फायनान्शिअल फ्रीडम – मनोज अरोरा, पाने : ३०८/२९९ रुपये.
द न्यू बिहार-गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट : निकोलस स्टेर्न, एन. के. सिंग, पाने : ३६०७९९ रुपये.
हिच्ड- द मॉडर्न वूमन अँड अरेंज्ड मॅरेज : नंदिनी कृष्णन, पाने : २७२२९९ रुपये.