हॉफषूल फुर गेश्टाल्टुंग असे जरा कठीणच नाव असलेल्या.. आणि म्हणून ” उल्म स्कूल ” या सुटसुटीत नावानेच अधिक परिचित असलेल्या जर्मनीतील उल्म येथील डिझाइन-शिक्षण संस्थेत सुधाकर नाडकर्णी १९६६ ते ६९ या काळात शिकायला गेले नसते ; तरीदेखील भारतातील बिनीच्या, अव्वल डिझायनरांमध्ये त्यांची गणना झालीच असती. पण मग, डिझाइन क्षेत्रात फक्त भारतातच नव्हे तर जगभर नाव कमावणाऱ्या दोन-तीन पिढय़ा घडवणारे प्राध्यापक हा आजचा लौकिक त्यांना लाभला नसता. गेल्या वर्षी त्यांची पंच्याहत्तरी याच देशोदेशींच्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेने साजरी केली नसती आणि नु डिझाइन क्षेत्रासाठीचा  आंतरराष्ट्रीय ‘आयकॉन’ पुरस्कार मिळाल्याची बातमीही आली नसता.
 मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये शिक्षण घेण्यापूर्वीच सुधाकर यांनी , केवळ कागद वा कॅनव्हासवर चित्रे काढण्यापेक्षा निराळे समाधान शोधायचे आहे, हे ठरवले होते.  ” जे जे ” तील शिक्षण १९५८8 ते १९६२ या काळात उपयोजित कलेचे शिक्षण घेतल्यावर एका जाहिरातसंस्थेत ते रुजूही झाले, पण यशवंत चौधरी ( आयसीआयसीआय च्या बोधचिन्हासह अनेक स्मरणीय चिन्हांचे संकल्पक ) या ज्येष्ठ मित्राचा सल्ला मानून उल्म येथे शिकायला गेले. डिझाइन म्हणजे केवळ कलात्मक मांडणी नसून वस्तूच्या प्रयोजनाचे आणि ती वस्तू वापरण्यामागील प्रेरणांचे भान , हा विचार घेऊन उल्महून परतलेले नाडकर्णी, तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या राष्ट्रीय संकल्पन संस्थेत शिकवू लागले . मुंबईच्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेत  (आयआयटी ) १९६९ पासून ” औद्योगिक संकल्पन संस्था ” ( आयडीसी ) सुरू झाली , तेव्हा ते स्वगृही आले! हा त्यांच्या कारकीर्दीचा दुसरा बहर १९९७ पर्यंत कायम राहिला, त्यानंतर गुवाहाटी  आयआयटीत  संकल्पन अभ्यासशाखा स्थापन  करून ती वाढविण्यासाठी  त्यांची नेमणूक झाली. हेही कार्य उत्तम प्रकारे तडीस नेल्यावर, सध्या ते मुंहईतील एका व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या डिझाइन विभागाचे प्रमुख संकल्पक व सल्लागार आहेत.
संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पाच्या संकल्पन सल्ला समितीसह अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, समित्या, आिदचा अनुभव त्यांना असला , तरी ते ज्या महापालिकेच्या शाळेत ( तत्कालीन प्रथेप्रमाणे ) शिकले , त्या मुंबईने मात्र त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला नाही. गुवाहाटीत असताना वेत आणि बांबूचा ” सलाइन स्टँड ” व अन्य वैद्यकीय फíनचरची किफायत आसामला बहाल करणाऱ्या या संकल्पन – गुरूला आजही , पुरस्काराच्या उबेपेक्षा डिझायिनगच्या एखाद्या आव्हानाची आच अधिक महत्त्वाची वाटत असावी, यात शंका नाही .