प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विजय केळकर व पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सध्याच्या आíथक संकटावर मात करण्यासाठी एकमेव उपाय सुचला आहे तो म्हणजे आíथक अनुदान कमी करणे आणि परकीय गुंतवणूक वाढविणे.
आíथक अनुदान हे जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनासाठी दिले जाते, ज्यामुळे सरकारचा हात ज्या आम आदमीच्या पाठीमागे आहे त्याचे जगणे सुसहय़ होते. मात्र सरकारने सिलेंडर, डिझेल, पेट्रोल इ.वरील आíथक अनुदान कमी करून आम आदमीच्या पाठीशी असलेला आपला हात काढून पोटावर पाय देण्याचे काम केले आहे.
त्यापेक्षा सरकारने अनावश्यक कर सवलती (उदाहरणार्थ आयपीएल स्पर्धेला करांत सूट) देणे बंद करावे, वित्तीय तूट कमी करण्यासाठी करवसुली वाढवावी.
प्रा. दिनेश जोशी, लातूर