१) किटी पार्टी सन्यासिन्स : अनन्या बॅनर्जी,
पाने : ३५२३५० रुपये.
एका पत्रकार महिलेनी लिहिलेली ही कादंबरी इंग्रजी पत्रकारितेतील महिलांच्या ग्लॅमरस जीवनशैलीवर प्रकाश टाकते आणि त्यातील विरोधाभासांवरही.
२) अ‍ॅन अमेरिकन ब्राइड इन काबूल : फिलिस चेस्लर,         पाने : २५६५९९ रुपये.
२० वर्षांची ज्युइश-अमेरिकन मुलगी काबूलमधील मुलाच्या प्रेमात पडते. लग्न करून त्याच्या घरी जाते आणि तिचा इस्लामिक परंपरांशी जवळून परिचय होतो आणि संघर्षही, त्याची ही गाथा.
३) चेसिंग टुमारो : सिडने शेल्डन-टिली बॅगशॉवे,
पाने : ४००२१७ रुपये.
प्रसिद्ध कादंबरीकार सिडने शेल्डन यांची ही नवी रहस्यमय कादंबरी. ट्रॅसी व्हिटने ही शेल्डन यांची लाडकी नायिका या कादंबरीची नायिका आहे. श्वास रोखून धरायला लावणारी रहस्यमयता आणि वेगवान घडामोडी या नीजखुणा याही कादंबरीत सापडतात.
नॉन-फिक्शन
१) हॉनर अँड फिडेलिटी- इंडियाज काँन्ट्रिब्यूशन टू द ग्रेट वार १९१४-१९१८ : अमरिंदर सिंग, पाने : ४३२५९५ रुपये.
पहिल्या महायुद्धात भारताचा संबंध राहिला तो ब्रिटिशांच्या मिषाने. त्यांच्यासाठी या युद्धात लढलेल्या भारतीयांच्या योगदानाची माहिती या पुस्तकातून तपशीलवार जाणून घेता येते.
२) प्लेइंग इट माय वे : सचिन तेंडुलकर,
पाने : ४९४८९९ रुपये.
सचिन तेंडुलकरच्या या आत्मचरित्राची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे आणि विक्रीही.  बाकी त्याबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही. सांगूही नये. शेवटी मास्टरब्लास्टर सचिनचे आत्मचरित्र आहे.
३) ब्रेकपॉइंट :  जेफ स्टीबेल, पाने : २५६५९९ रुपये.
इंटरनेट सध्या माणसाच्या मेंदूपेक्षा जास्त जलदगतीने काम करते आहे. त्यामुळे जगातल्या अनेकांचे त्याशिवाय चालत नाही. तंत्रज्ञानाच्या या अदभुत किमयेची कहाणी सांगणारे हे पुस्तक आधी चाळून आणि जमलंच तर वाचून पाहायला हरकत नाही.