स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही पर्वात सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या कावेरीताई पाटील यांच्या निधनाने राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या प्रेरणेने भारलेले ठाणे परिसरातील आणखी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
अगदी लहानपणापासूनच त्यांना जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेविषयी चीड होती. ठाणे शहरालगतचे कळवा गाव ही त्यांची कर्मभूमी. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय गोपाळराव पाटील यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी देशकार्यात स्वत:ला झोकून दिले. प्रभातफेऱ्या, घणसोली येथील मिठाचा सत्याग्रह, ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात कळवा येथील मुंबई-पुणे रस्त्यावर झालेल्या पहिल्या जाहीर सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. अटकेनंतरही न्यायालयात माफी मागण्यास नकार दिल्याने त्यांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्या स्वातंत्र्य चळवळीत पुन्हा सक्रिय झाल्या. गोवालिया टँक येथील महात्मा गांधींच्या सभेला त्या पतीसह उपस्थित होत्या. ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना आवश्यक मदत केली होती. ठाणे तहसील कार्यालयावरील ब्रिटिश ‘युनियन जॅक’ उतरवून तिरंगा फडकविण्याचा धाडसी प्रयत्न त्यांनी केला. या प्रकरणी त्यांना अटक झाली. मात्र गरोदर असूनही त्यांनी न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. येरवडा कारागृहातच त्यांनी मुलास जन्म दिला. स्वातंत्र्यानंतर कळवा व बदलापूर परिसरांत त्यांनी शाळा सुरू केली तसेच वसतिगृहांची स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या कावेरीताईंनी स्वतंत्र भारतातील राजकारणातही भरीव योगदान दिले. कळवा ग्रामपंचायतीचे सरपंचपद त्यांनी  १२ वर्षे भूषविले.
 ठाणे महापालिका अस्तित्वात आल्यापासून (१९८२) २००७ पर्यंत सलग २५ वर्षे त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. महिलांसाठी बचत गट अथवा स्त्रियांसाठी राजकारणात आरक्षण नसताना ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रांत आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी व कष्टकऱ्यांचे देशभरातील विविध भागांत त्यांनी अभ्यास दौरे आयोजित केले. ठाणे परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय घडवून आणणाऱ्या नेत्या असाही त्यांचा लौकिक होता. शिस्तप्रिय असणाऱ्या कावेरीताई उत्तम स्काऊट गाईड होत्या. ठाणे जिल्हा स्काऊट गाईड पथकाचे प्रमुखपदही त्यांनी भूषविले होते. भिवंडी तसेच मुंब्य्रातील हिंदू-मुस्लीम दंगलीच्या वेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा