News Flash

शहाणपण देगा देवा..!

‘वेगळेपण देगा देवा..’ हा अग्रलेख (९ ऑक्टो.) वाचून खेद वाटला; मात्र आश्चर्य वाटले नाही. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीलाही प्रारंभी ‘लोकसत्ता’चा विरोधच होता.

| October 11, 2014 04:24 am

शहाणपण देगा देवा..!

‘वेगळेपण देगा देवा..’ हा अग्रलेख (९ ऑक्टो.) वाचून खेद वाटला; मात्र आश्चर्य वाटले नाही. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीलाही प्रारंभी ‘लोकसत्ता’चा विरोधच होता. ‘स्वतंत्र व्हावे ही व्यक्ती असो वा प्रदेश यांची नसíगक प्रेरणा असते. ती मारून टाकण्यात काहीही शहाणपणा नसतो आणि शौर्य तर नसतेच नसते’ असे आपण म्हणता. स्वतंत्र विदर्भनिर्मितीमागे भाजपची वा त्याच्या मातृसंस्थेची हीच विचारसरणी असेल, तर पाकिस्ताननिर्मितीबद्दल अजूनही ते गळा का काढत असतात?  तुम्ही म्हणता त्यात तथ्य असेल तर पश्चिम जर्मनीने तिच्याहून मागास असलेल्या पूर्व जर्मनीचे लोढणे गळ्यात अडकवून घेऊन एकसंध जर्मनीची पुनíनर्मिती का केली असती? आणि सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी ५०हून अधिक वष्रे का झगडत राहिले असते? त्यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र भाजपने दिल्लीत सत्ता असताना काय प्रयत्न केले?  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिरेकी राष्ट्रवादात भाषावार प्रांतरचना बसत नाही. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने प्रथम आंध्र प्रदेशची फाळणी करण्यात काँग्रेसला मदत केली व आता केंद्रात बहुमत मिळताच तो महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यास सज्ज झाला आहे. आपल्या अल्प काळातील राजवटीत शिवसेनेने हा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचे थोडेफार तरी प्रयत्न केले असते तर भाजपला या असंतोषास खतपाणी घालण्याची संधी मिळाली नसती.
त्याचप्रमाणे मुंबई महाराष्ट्रापासून तोडून तिचे वेगळे नगरराज्य करण्याचा कट आहे, हा कल्पनाविलास नसून तशी शंका येण्यास जागा आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची निर्मिती करून त्याच्या अधिकारक्षेत्रात मुंबईबाहेरील प्रदेशाचा समावेश करणे ही त्याची पहिली पायरी आहे.  
मुंबईतील उद्योगपतींनी भारतीय प्रशासनसेवेतील अमराठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘इेुं८ो्र१२३’  सारख्या संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्ल्यानंतर मेणबत्त्या लावून  निषेध करण्यात महाराष्ट्रद्वेषी अमराठी समाज अग्रभागी होता. मुंबईतील याच समाजाने उचल खाऊन मुंबई महाराष्ट्रापासून तोडून तिचे वेगळे नगरराज्य करण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईचे संरक्षण करण्यास महाराष्ट्र शासन असमर्थ आहे, असा या समाजाचा दावा आहे. आम्हाला सीएम नको, सीईओ पाहिजे असे या मोच्र्यात फलक होते. या संदर्भात त्याच काळात ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेला लॉर्ड मेघनाद देसाई यांचा ( ब्रिटनच्या उमराव सभेचे ते सदस्य आहेत) भारताच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसणारा व राजनतिक शिष्टाचारांचा उघड उघड भंग करणारा लेख पाहावा. लेखाचे शीर्षक र३ं३ीँ िऋ१ इेुं८ असे असून त्यात मुंबईतील अमराठी नागरिकांना मुंबईचे स्वतंत्र नगरराज्य स्थापन करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

विदर्भाच्या मुद्दय़ावर दिशाभूल!
‘वेगळेपण देगा देवा..’ या अग्रलेखातील (९ ऑक्टो.) शिवसेनेविषयीच्या मुद्दा पटला. कारण या मुद्दय़ाला असलेला शिवसेनाविरोध किमान उघड आणि स्पष्ट तरी आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर शिवसेनेला जे इंधन मिळते त्याचा वापर हा पक्ष विधानसभा वारीला नक्कीच करतो. पण एक विलक्षण बाब ही आहे की, मोदी म्हणतात, जोपर्यंत मी दिल्लीत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. या वक्तव्यानंतर लगेच  रविशंकर प्रसाद, जावडेकर ही मंडळी वेगळ्या विदर्भ राज्याचे आम्ही समर्थन करतो, असे बोलून मोकळे होतात. राष्ट्रवादीला विधानसभेच्याच तोंडावर पडलेले अखंड महाराष्ट्राचे दिवास्वप्न नवल करण्यासारखे नाही. वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर महाराष्ट्राची दिशाभूल करून विधानसभेवर स्वपक्षाचा झेंडा फडकावण्यातच सर्व राजकारण्यांचे स्वारस्य असावे.
गणेश सोमासे, पुणे

झुंजणारे कुठे झुंजती..
‘लोकसत्ता’च्या १० ऑक्टोबरच्या अंकातील सदानंद मोरे यांचा लेख, प्रशांत कुलकर्णी यांचे व्यंगचित्र आणि ‘तालेवारांच्या तलवारबाजी’वरील लोकमानसमधील पत्र परस्परसुसंगत झाले आहेत. वर्तमान समाजवास्तवावरील इतिहासाच्या उदात्तीकरणाच्या परिणामांचे प्रा. मोरे यांचे विवेचन पूर्णपणे पटण्याजोगे आहे. त्याचे सध्याच्या  काळातील चपखल उदाहरण कुलकर्णीच्या व्यंगचित्रातून खुसखुशीतपणे प्रत्ययास येते. अस्मितेच्या तलवारीकरणावरून अजून एक आठवण झाली. राजकुमार तांगडे यांच्या‘शिवाजी अंडरग्राऊंड..’ या नाटकात या अस्मितेच्या तलवारी सांभाळण्यापायी दोन पात्रांची अखेपर्यंत रिकामी राहणारी झोळी आणि त्यांची होणारी कोंडी उत्तम दाखविली आहे. लोकहितकारक कामे करण्याची आश्वासनेदेखील न देऊ इच्छिणारे नेते अस्मितेच्या (गंजलेल्या) तलवारी नाचवत भडकावू भाषणे करीत फिरतात. अशा वेळी सुरेश भट यांच्या ‘झुंजणारे खुले झुंजती बोलणारे घरी बोलती’ या ओळींची आठवण होते आणि त्याऐवजी ‘झुंजणारे कुठे झुंजती? बोलणारे अखंड बोलती’ असे म्हणावेसे वाटते.
मनीषा जोशी, कल्याण

..तर जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण शक्य
अतुल देऊळगावकर यांचे ‘हरित अर्थकारणाची दिशा’ आणि ‘हरित अर्थ-राजकारणाची संधी’ हे लेख (लोकसत्ता, ८ व ९ ऑक्टो.) वाचले. हरित अर्थकारणाची दिशा या लेखात सुरुवातीसच त्यांनी ‘कार्बनच्या काळ्या छायेतील अर्थ-राजकारण आणि वैयक्तिक जीवनशैली दोन्हीमध्ये आमूलाग्र बदल घडवून अल्प व शून्य कर्बव्यवस्थेकडे जाणे, ही काळाची गरज आहे. हरित जीवनशैली व पर्यावरण जपणार राजकारण घडवण्याच आव्हान व संधी आपल्यापुढे उभी आहे’ असे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिपादन केले आहे.
जागतिक तापमानवाढीस मानवाकडून होत असलेले कार्बनचे उत्सर्जन कारणीभूत असल्याचे आयपीसीसीच्या अहवालात म्हटले आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, समूह, देश यांनी आपापली कार्बन फूट-िपट्र कमी करणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु हे करण्यास जगातील कोणताही देश तयार नाही. कारण आजच्या घडीला देशाचा विकास म्हणजेच देशाच्या ठोक राष्ट्रीय उत्पन्नाचा वíधष्णू दर असे गृहीतक आहे. वाढत्या ठोक राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढणाऱ्या कार्बन उत्सर्जनाशी आणि म्हणूनच जागतिक तापमानवाढीशी थेट संबंध आहे. याचाच अर्थ असा की जागतिक तापमानवाढ आटोक्यात आणण्यासाठी सध्याची विकासाची संकल्पना बदलणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु दुर्दैवाने असे करण्यास जगातील कोणताही देश तयार नाही.
यंत्र वापरून तयार झालेली प्रत्येक वस्तू किंवा तिचा घटक आणि यंत्राधारित प्रत्येक प्रक्रिया कार्बन उत्सर्जनास कारणीभूत असते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या बहुतांश वस्तू व आपण करीत असलेल्या क्रिया या यंत्राधारित असतात हे लक्षात घेतल्यास, वैयक्तिक स्तरावर जास्तीतजास्त वस्तू व सेवा वापरणे म्हणजेच जागतिक तापमानवाढीस हातभार लावणे हे स्पष्ट होते. ‘कमीतकमी वस्तू आणि सेवांची निर्मिती व कमीतकमी वस्तू आणि सेवांचा वापर’ हे धोरण अंगीकारल्यास जागतिक तापमानवाढीवर अंकुश मिळविणे शक्य आहे.
डॉ. मंगेश सावंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2014 4:24 am

Web Title: separate mumbai vidarbha for maharashtra
टॅग : Separate Vidarbha
Next Stories
1 वेगळेपण नको गा देवा..!
2 महाराष्ट्रातील साहित्यिक, विचारवंत गप्प कसे?
3 अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांची खेळी?
Just Now!
X