अध्यक्षपदाची हॅट्ट्रिक साधण्याच्या ईष्रेने मिहदा राजपक्षे यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या खऱ्या, मात्र नियतीने त्यांच्या पदरात उलटेच दान टाकले. निवडणुकीचा कल लक्षात येताच राजपक्षे यांनी भव्य असा अध्यक्षीय प्रासाद, टेम्पल ट्रीज तात्काळ सोडून दिला. आता या प्रासादात पुढील पाच वष्रे अस्सल सिंहली व्यक्तिमत्त्व असलेल्या मैत्रिपाल सिरीसेना यांचा वावर असेल. अत्यंत साधे व्यक्तिमत्त्व, सिंहलीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भाषेचा (म्हणजे प्रामुख्याने इंग्रजीच) गंध नसलेले, मितभाषी अशी प्रतिमा असलेल्या सिरीसेना यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. अवघ्या चार महिन्यांपूर्वी राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेल्या सिरीसेना यांनी थेट राजपक्षे यांनाच आव्हान देत अध्यक्षीय निवडणुकीच्या आखाडय़ात उडी घेतली. त्यांना पािठबा देणाऱ्या युनायटेड नॅशनल पार्टीचा खरा जनाधार शहरांत जास्त असला, तरी सिरीसेना यांनी मात्र आपल्या शेतकरी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर ग्रामीण भागातील मतदारांनाही आकर्षति केले. १९८९पासून राजकारणात सक्रिय असलेले ६३ वर्षीय सिरीसेना हे माजी अध्यक्षा चंद्रिका कुमारतुंग यांच्या विश्वासातील समजले जातात. सिरीसेना यांनी आतापर्यंत आरोग्य मंत्रिपदाबरोबरच संरक्षणमंत्रिपदही भूषवले आहे. तामिळ वाघांविरोधातील संघर्ष टिपेला असतानाच त्यांनी संरक्षणमंत्रिपद भूषवल्याने एलटीटीईच्या रडारवर ते खूप पूर्वीपासूनच होते. त्यांना टिपण्याचा तामिळ वाघांनी पाच वेळा प्रयत्न केला. २००८ मध्ये सिरीसेना यांच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बहल्लाही झाला. मात्र, त्यातूनही सिरीसेना बालंबाल बचावले. असो. हा झाला इतिहास. आता सर्वोच्च पदावर निवडून आल्यानंतर सिरीसेना यांच्यापुढील खरी आव्हाने आहेत ती म्हणजे मतदारांना दाखवलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याची. गेल्या दहा वर्षांत सर्वच आघाडय़ांवर बोकाळलेला भ्रष्टाचार समूळ उखडून टाकण्याबरोबरच अध्यक्षांच्या अधिकारांत अमर्याद वाढ सुचवणारी घटनादुरुस्ती रद्द करणे आणि जनतेत सरकारप्रति विश्वास निर्माण करणे या तीन मुख्य मुद्दय़ांवर सिरीसेना यांना तातडीने काम करावे लागणार आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सिरीसेना यांच्याकडे पाच वष्रे असली, तरी १०० दिवसांतील कामगिरीचा आढावा वगरे प्रकार आपल्याप्रमाणेच श्रीलंकेतही होतीलच. तूर्तास प्रादेशिक व्यक्तिमत्त्व, इंग्रजीचा फारसा गंध नाही आणि बहुसंख्याकांच्या बहुमतावर आरूढ होऊन अध्यक्षपदापर्यंत झेप घेणाऱ्या सिरीसेना यांची तुलना आपल्याकडच्या सध्याच्या नेतृत्वाशी होऊ शकते, हे मात्र खरे.

CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता