आज आपण ऑनलाइन जगतामध्ये फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवìकग साइट्सवर वावरतो. गुगलवर हवी ती माहिती शोधतो, अमेझॉनसारख्या साइट्सवरून खरेदी करतो. या सर्व गोष्टी ज्यांच्यामुळे शक्य झाल्या ते म्हणजे स्टुअर्ट पार्किन. सोशल नेटवर्किंग साइट्सवर सातत्याने पोस्ट होत असतात. दिवसाला या साइट्सवर लाखो टेराबाइट्सची माहिती जमा होते. या माहितीचे व्यवस्थापन करणे, ती साठवून ठेवणे, कुणीही कुठूनही ती माहिती मागितली तरी ती पुरविणे अशा अनेक गोष्टी या कंपन्या करीत असतात. ही मोठी माहिती साठवून ठेवण्यासाठी या कंपन्या जी साधने वापरतात, त्याचे जनक पार्किन आहेत. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना नुकताच तंत्रज्ञान क्षेत्रातील नोबेल मानल्या जाणाऱ्या ‘मिलेनियम टेक्नॉलॉजी प्राइज’ने गौरविण्यात आले.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर ज्या प्रमाणात वाढू लागला, त्या प्रमाणात त्यावर जमा होणारी माहिती कशी जतन करायची, हा प्रश्न निर्माण होऊ लागला. यावर जगभरात विविध कंपन्या संशोधन करीत होत्या. यातील आयबीएम ही कंपनी आघाडीवर होती. याच कंपनीत पाíकन काम करतात. पाíकन यांनी स्पीनट्रोनिक मटेरिअल्समध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी त्याच्या बारीक बारीक पातळ्यांवर अभ्यास केला आणि यातून त्यांनी कमी जागेत माहिती कशी स्टोअर करता येऊ शकेल अशी चुंबकीय रचना तयार केली. पुढे याच रचनेचा वापर संगणकातील हार्डडिस्कची क्षमता वाढविण्यासाठी करण्यात आला आहे. यामुळेच आपण टेराबाइटची हार्डडिस्क आपल्या संगणकात बसवू शकतो.  
पाíकन यांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबात १९५५ मध्ये झाला. इंग्लंडमधील वॉटफोर्ड हे त्यांचे मूळ गाव. पाíकन यांनी १९७७ मध्ये बी.ए. ही पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी १९७९ मध्ये केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी महाविद्यालयातून पीएच.डी. मिळवली. १९८२ मध्ये ते आयबीएममध्ये वर्ल्ड ट्रेड डॉक्टरेटल फेलो म्हणून रुजू झाले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना सन १९८९ मध्ये आयबीएम फेलो हा आयबीएममधील सर्वोच्च बहुमान देण्यात आला. यानंतर त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये शिकविण्याचे काम सुरू केले. तेथेही त्यांना सर्वोच्च पदे देण्यात आली. पाíकन यांनी सन १९८९ मध्ये ‘स्पीन वेल्वे’ची निर्मिती केली. याचाच वापर करून पुढे आयबीएमने ‘स्पीन वेल्वे रिड हेड’ तयार केले, ज्यामुळे हार्डड्राइव्हमधील माहिती साठवण्याची क्षमता हजार पटीने वाढली. त्यांच्या या ‘स्पीन वेल्वे’साठीच हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या नावावर तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बहुमान आहेत. यात गुटेन्बर्ग संशोधन पुरस्कार, हमबोल्ट संशोधन पुरस्कार, अमेरिकन भौतिकशास्त्र संस्थेचा पुरस्कार आदींचा समावेश आहे.