‘चित्रकार सुनील दास कालवश’ ही १० ऑगस्टच्या सोमवारीच थडकलेली बातमी महाराष्ट्रातील चित्रकलाप्रेमींनाही कदाचित फार महत्त्वाची वाटणार नाही, याचे कारण सुनील दास या व्यक्तीशी कमी, परंतु त्यांच्या चित्रांशी अतिपरिचय, हेही असू शकते. सुनीलदांनी कागदावर चारकोल, टेम्परा आदी वापरून केलेली घोडे, बैल.. किंवा स्त्रिया यांची चित्रे सतत कोठे ना कोठे दिसतच राहतात. चित्रलिलावांच्या ‘कॅटलॉग’मध्ये तर बहुतेकदा एखादे तरी चित्र सुनील दास यांचे असतेच. कलाबाजारातील या अतिपरिचयाच्या पलीकडले सुनील दास यांचे ऐतिहासिक स्थान समजून घेण्याची संधी अखेर त्यांच्या निधनाने दिली आहे.
घोडे आणि बैल यांच्या चित्रांसाठी सुनीलदा सर्वपरिचित झाले. पिकासोपासूनच्या अभिव्यक्तिवादी चित्रकारांत जो पुरुषीपणा दिसतो, त्याचे निराळे रूप सुनीलदांच्या या चित्रांत आहे. त्यांची वृषभचित्रे पिकासोच्या ‘मिनॉटॉर’ची आठवण देणारी आहेत; पण यापलीकडे सुनीलदांनी, त्या प्राणिचित्रांतून वेदनेचाही आविष्कार केला आहे. ही वेदना दर वेळी चेहऱ्यांवर नव्हे- रेषेमधल्या तणावातून दिसते. सुनीलदांनी स्त्रीचित्रेही भरपूर केली, त्या स्त्रियांचे चेहरे वरकरणी शांत भासतात; पण या स्त्रियांचे डोळे मात्र रोखून पाहणारे, क्वचित कालीसारखे लालसुद्धा. यापैकी अनेक स्त्रिया वारांगना आहेत, त्यांची स्थिती मी चित्रांतून दाखवली, असे सुनीलदांनीच म्हटले होते.
१९३९ सालचा जन्म, कोलकात्याच्या गव्हर्न्मेंट आर्ट कॉलेजातून १९५९ मध्ये  पदविका आणि त्याच वर्षी राष्ट्रीय पुरस्कार तसेच फ्रान्सची शिष्यवृत्ती मिळाल्याने लगोलग पॅरिसकडे प्रयाण, युरोपात रंगरेखाकलेसह मुद्राचित्रण आणि शिल्पकलेचेही शिक्षण, यानंतर चाळिशीत ते मायदेशी परतले. पुढे साओ पावलो व हवाना बिएनालेसह अनेक देशांमध्ये प्रदर्शनांसाठी त्यांना निमंत्रणे आली आणि तब्बल ८८ एकल प्रदर्शने, १५० हून अधिक समूह प्रदर्शने अशी कारकीर्द त्यांनी केली. समवयस्क बंगाली चित्रकार अमिताभ सेनगुप्ता यांच्या आत्मचरित्रात, ‘सुनील दास हे काहीसे आत्मप्रौढ’ असा आरोप सापडतो खरा; पण या आरोपामागचे कारण- ‘गरजवंतांना मदतही करू शकतो मी. तुमच्याही माहितीत कुणी असेल तर सांगा,’ असे सुनीलदा म्हणाले होते, हे! भरपूर चित्रे करावीत आणि पुढे जात राहावे, अशी स्वच्छंदी वृत्ती सुनीलदांकडे होती.. ती मात्र त्यांना फार जपता आली नाही, कारण त्यांच्या चित्रांच्या होणाऱ्या नकला. बाजारात त्यांची चित्रे खपू लागल्यामुळे, ‘माझ्या सहीसकट नक्कल करणारी १५०० चित्रे मी आजवर पकडली आहेत,’ असे त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखतीत सांगितले होते.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?