आपलं हे चिंतन सुरू करताना त्याचा योजलेला आकृतिबंध प्रथम पाहू. त्यानुसार प्रथम स्वामी स्वरूपानंद यांनी संपादिलेली ‘नित्यपाठा’तली ओवी, कंसात ‘ज्ञानेश्वरी’त ती कोणत्या अध्यायात आली आहे त्याची नोंद, नंतर तिचा प्रचलित अर्थ, नंतर तिचा गूढार्थ आणि त्यानंतर गूढार्थाचे विवेचन. काही ओव्यांत प्रत्येक शब्दाचाही गूढार्थ व्यापक असेल तर प्रचलित अर्थ मांडून होताच, एकदम ओवीचा पूर्ण गूढार्थ न सांगता, प्रत्येक शब्दाचा गूढार्थ आपण पाहणार आहोत आणि नंतर विवेचनाच्या अखेरीस त्या ओवीचा तो गूढार्थ एकत्रितपणे पुन्हा वाचणार आहोत. साधारणपणे आपल्या चिंतनाची ही पद्धत राहील आणि अपवादात्मकरीत्या ती बदलूही शकेल. स्वामी स्वरूपानंदांनी ‘ज्ञानेश्वरी’चा संपूर्ण अभंगानुवाद केला आहे. तो ‘अभंग ज्ञानेश्वरी’ म्हणून विख्यात आहे. यात ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी सोप्या भाषेत अभंगरूपात मांडली आहे. अर्थविस्तार करतानाही मूळ ओवीचा तात्त्विक गाभा आणि काव्यसौंदर्य हे अभंगानुवादातही अभंगच राहिलं आहे! त्यामुळे गूढार्थ उकलताना स्वामीजींचा अभंगानुवाददेखील दीपस्तंभासारखा पथदर्शक ठरणार आहे. या विवेचनासाठी पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केलेला ‘श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ’ तसेच अभंग ज्ञानेश्वरी, भावार्थ गीता, अमृतानुभाव, संजीवनी गाथा आदी ग्रंथांचा आधार आहे. प्रचलित अर्थासाठी श्रीनानामहाराज साखरे (सारथी प्रकाशन, पुणे) आणि/अथवा मामासाहेब दांडेकर (वारकरी शिक्षण संस्था, आळंदी) यांनी संपादित केलेल्या पोथीचा आधार आहे. गूढार्थासाठी मात्र केवळ आणि केवळ श्रीगुरूकृपेचाच आधार आहे! जोवर दळभद्री ‘मी’ डोकावणार नाही, तोवर तो गूढार्थ थेट येईल. तर अथ श्रीज्ञानेश्वरी सारस्तोत्र प्रारंभ:!
ॐ नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।१।। (अ. १, ओवी १).
प्रचलितार्थ : ॐकार हाच परमात्मा आहे, असे कल्पून मंगलाचरणात माऊली म्हणतात, हे सर्वाचे मूळ व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्रीओंकारा तुला नमस्कार असो; व स्वत:ला स्वत: जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जयजयकार असो.
गूढार्थ : ही श्रीसद्गुरूंची वंदना आहे! ॐकारस्वरूप आणि सृष्टीच्या आधीपासून विद्यमान असलेल्या हे गुरुदेवा तुम्हाला नमन असो. वेदांनाही तुमचं खरं रूप आकळलं नाही आणि ‘नेति नेति’ म्हणून त्यांनी हात जोडले. केवळ तुम्हीच तुमचं स्वरूप जाणू शकता. आत्मरूपानं तुम्ही जीवमात्रात आहात. जो या आत्मरूपापर्यंत पोहोचेल तोच ‘स्वरूपज्ञानी’ होईल, अर्थात तोच तुम्हाला जाणू शकेल! या गूढार्थाला स्वामींचीही पूर्ण पुष्टी आहे. त्यांनी या ओवीचा केलेला अभंगानुवादच पाहा- आत्मरूपा तुज। करीं नमस्कार। तुझा जयजयकार असो देवा।।१।। ॐकारस्वरूपा। तूं चि सर्वा मूळ। व्यापोनि सकळ। राहिलासी।।२।। सर्व सर्वातीत। तूं चि सर्वात्मक। विषय तूं एक। वेदांलागीं।।३।। ‘नेति नेति’ ऐसें। बोलती ते वेद। स्वरूप अगाध। तुझें देवा।।४।। आता गूढार्थ विवेचनाकडे वळू.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
nashik, hemant godse, hemant godse nashik lok sabha
नाशिकमध्ये उमेदवारीची वाट न पहाता प्रचाराचा थाट, हेमंत गोडसे यांच्यावर अनधिकृत प्रचाराचा आक्षेप