भारतीय पोलीस सेवेत नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना जेथे प्रशिक्षण दिले जाते, त्या हैद्राबादच्या सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या प्रमुख म्हणून अरुणा बहुगुणा यांची निवड झाली. असा मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला! बहुगुणा या १९७९ सालच्या तुकडीतील भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. आंध्र प्रदेश हे त्यांचे केडर, पण त्यांची ओळख एव्हढीच मर्यादित नाही. या पदावर निवड होण्यापूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ- जे देशातील अग्रगण्य निमलष्करी दल मानले जाते) त्या विशेष महासंचालक होत्या. असा मान मिळवणाऱ्यादेखील भारतातील त्या पहिल्याच महिला पोलीस अधिकारी. या पदावर काम करीत असताना, त्यांनी सुमारे साडेतीन लाखांच्या दलास समर्थ आणि सक्षम नेतृत्व दिले. त्यांची नवी नेमणूक हा निव्वळ योगायोग निश्चितच नाही. वयाच्या बाविसाव्या वर्षी बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर लगेचच त्या भारतीय पोलीस सेवेत निवडल्या गेल्या. त्या वेळच्या ५४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तुकडीत केवळ दोनच महिला अधिकारी होत्या. बहुगुणा या त्यापैकीच एक.. त्यात त्यांचे तोपर्यंतचे सर्व शिक्षण हे कन्याशाळेत झालेले, त्यामुळे प्रत्यक्ष प्रशिक्षण कालावधीत थेट ५२ मुलांच्या वर्गात बसणे त्यांना सुरुवातीला अत्यंत अवघड गेले. पण या आव्हानांवर मात करीत त्या पुढे आल्या. आयुष्यात समस्यांवर मात करण्याची त्यांची जणू वृत्तीच झाली. त्यांचे दोन विवाह झाले. द्वितीय यजमान एस. जयरामन हे शुद्ध शाकाहारी तर बहुगुणांचे कुटुंब  मांसाहारी. पण अडचणी मग त्या कौटुंबिक असोत किंवा नोकरीतील, त्यांच्यावर मात करायचीच हा त्यांचा स्वभाव झाला. अरुणा यांच्या आजींना गुरुदेव  टागोरांचा सहवास लाभला होता. साहजिकच अरुणा यांच्यावरही काव्याचा, आदर्शवादाचा आणि कलासक्तीचा प्रभाव पडल्यावाचून राहिला नाही, असे त्या स्वत:च अभिमानाने सांगतात. इतिहास हे त्यांचे प्रेम तर प्रवासवर्णनांचे लेखन हा छंद. २०१० मध्ये आंध्र प्रदेशात स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीने जोर धरण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाच्या प्रमुख म्हणून अरुणा यांनी आपल्या कामाने छाप पाडली होती. धैर्य, समर्पित वृत्ती, असीम सेवाभाव असलेले भारतीय पोलिसांचे नेतृत्व घडविणे हे राष्ट्रीय पोलीस अकादमीचे ध्येय आहे. ‘सीआरपीएफ’च्या प्रमुख म्हणून बहुगुणांनी केलेले काम आणि त्यांची सकारात्मक वृत्ती यामुळेच, ५६व्या वर्षी बहुगुणा यांची निवड या पदासाठी करण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांबद्दल समाजात आणि प्रत्यक्ष पोलीस दलात असलेली प्रतिमा अधिक उज्ज्वल करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

JP Nadda Buldhana, JP Nadda,
जे पी नड्डा म्हणतात, “इंडिया आघाडी म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविणारी…”
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा