कुठल्याही पुस्तकाचा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत होणारा अनुवाद ही सर्जनशीलप्रक्रिया असते. त्यामुळेच त्याला ‘सहनिर्मिती’ असे सार्थपणे म्हटले जाते. अनुवाद हा ‘एका कुपीतून दुसऱ्या कुपीत अंतर ओतण्यासारखा’ प्रकार आहे. इंग्रजीमध्ये अनुवादाला ‘टू फ्रंट डोअर’ असेही म्हटले जाते.
म्हणून अनुवादाबद्दल जास्तीत जास्त बोललं, लिहिलं जाण्याची गरज असते. अनुवादकांनी प्रत्येक पुस्तकाचा अनुवाद करताना आपले अनुभव लिहिणं जितकं गरजेचं असतं, तितकंच मूळ लेखकानं त्याच्या पुस्तकाच्या अनुवादाविषयी बोलणंही. त्यातून अनुवादाकडे पाहण्याचा एक निर्भेळ आणि निर्मळ दृष्टीकोन तयार होऊ शकतो. यासाठी http://authors-translators.blogspot.in  हा ब्लॉग चांगला पर्याय ठरू शकतो. यावर जगभरचे लेखक त्यांच्या पुस्तकांच्या अनुवादाबद्दल बोलतात, त्यांच्या अनुवादकांशी चर्चा करतात. आणि अनुवादकही त्यांचे लेखक आणि त्यांच्या  पुस्तकांविषयी लिहितात-बोलतात. त्यातून अनुवाद ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजावून घेता येते.
काय हरवतं आणि काय गवसतं, याचं तारतम्य अनुवादाविषयीच्या या ब्लॉगवरील  चर्चेतून जाणून घेता येतं. म्हणून तो वाचायलाच हवा.
——
फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
वाइज इनफ टू बी फुलिश : गौरी जयाराम, पाने : २१६२२५ रुपये.
बिनाथ मार्बल स्काय : जॉन शोरस, पाने : २७२२९५ रुपये.
रेड स्पॅरो : जेसन मॅथ्यू, पाने : ४४८४९९ रुपये.
द राइट काइंड ऑफ डॉग : अदिल जुस्सावाला, पाने : १४८२०० रुपये.
अलार्म ऑफ सायलन्स : माणिक मुंडे, पाने : १२८१९५ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
ताज – अ स्टोरी ऑफ मुघल इंडिया : तिमेरी एन. मुरारी, पाने : ३६८२९५ रुपये.
कॉन्केरिंग द केऑस-विन इंडिया, विन एव्हरीव्हेअर : रवि वेंकटेसन, पाने : २३२८९५ रुपये.
द ब्लॅक काउंट : टॉम रेस, पाने : ४३२४९९ रुपये.
द हार्ट इज नोबल : द कर्मापा ओजीन ट्रीन्ले दोरजे, पाने : २१६४९५ रुपये.
द वेट लॉस क्लब : देवप्रिया रॉय, पाने : ३०४/२५० रुपये.