कालच्या २३ एप्रिलला शेक्सपिअरचा ४५०वा वाढदिवस जगभरात अनेक ठिकाणी साजरा झाला. आता महाराष्ट्रातील शेक्सपिअरचे भक्त आणि अनुयायी वयोवृद्ध झालेले असल्याने त्यांनी लेख लिहिणे, कार्यक्रम करणे, निदान त्याच्या नावाने पार्टी करणे असे प्रकार फार केले नाहीत, ही गोष्ट खरी असली तरी जगभरातल्या, विशेषत: पाश्चात्य देशातल्या अनेक वर्तमानपत्रांनी शेक्सपिअरविषयी विविध स्वरूपाचे लेख, बातम्या आणि कार्यक्रमांची माहिती देणारे वृतान्त प्रसिद्ध केले. ‘गार्डियन’ या वर्तमानपत्राने शेक्सपिअरचा प्रभाव असलेल्या आणि जागतिक साहित्यात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या १० कादंबऱ्यांविषयी एक लेख प्रकाशित केला आहे. त्या दहा कादंबऱ्या अशा-
१) मॉबी-डिक – हर्मन मेल्विल
२) द डॉटर ऑफ टाइम – जोसेफाइन टे
३) ब्रेव्ह न्यू वर्ल्ड – आल्डस हक्सले
४) केक्स अँड अले – सॉमरसेट मॉम
५) द टॅलेटेंड मि. रिप्ले – पॅट्रेशिया हायस्मिथ
६) द ब्लॅक प्रिन्स – आयरिश मडरेक
७) द डॉग्ज ऑफ वॉर – फ्रेडरिक फोर्सिथ
८) वाइज चिल्ड्रन – अँजेला कार्टर
९) लव्ह इन इल्डनेस – अमांडा क्रेग
१०) अ थाऊजंड एकर – जेन स्मायली
या सर्व कादंबऱ्या शेक्सपिअरच्या विविध नाटकांवर बेतलेल्या आहेत. हर्मन मेल्विल पासून अँजेला कार्टपर्यंत जागतिक साहित्यातील बिनीच्या कादंबरीकारांनाही शेक्सपिअरला टाळता येत नाही, म्हणजे बघा!