फिक्शन
१) द सिल्क वर्म : रॉबर्ट गालब्रेथ, पाने : ४६४६९९ रुपये.
(जे. के. रोलिंग उर्फ) रॉबर्ट गालब्रेथ यांची ही दुसरी रहस्यमय कादंबरी. गतवर्षी ‘द ककूज कॉलिंग’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. पण लवकरच ती जे. के.च असल्याचा ब्रभा झाला आणि अचानक तिचा खप वाढला. आता ही काय करते ते कळेलच लवकर.
२) द लाइव्हज ऑफ अदर्स : नील मुखर्जी, पाने : ३५३५९९ रुपये.
लंडनस्थित भारतीय लेखकाची ही पण दुसरीच कादंबरी. कोलकात्यात घडणारी. काळ १९६७चा. ही तशी कुटुंबकथा पण  समाजव्यवस्था, व्यवसाय आणि प्रतिष्ठेने व्यापलेली.
३) फेस ऑफ : संपा. डेव्हिड बाल्डाची, पाने : ३८३४९९ रुपये.
हा गुन्हेगारी कथांचा संग्रह आहे. डेनिस लेहान, अयान रँकीन, आर. एल. स्टीन, एम. जे. रोज, स्टीव्ह मार्टिनी, जेफ्री डिव्हर, हिदर ग्रहॅम अशा नामांकितांचा समावेश असलेला.  
नॉन-फिक्शन
१) व्हॉय आय राइट? – एसेज बाय सआदत हसन मंटो : संपादन व अनुवाद- आकार पटेल,   पाने : १९६३५० रुपये.
मंटो यांच्या सवरेत्कृष्ट कथांइतकेच त्यांचे लेखही नितांत सुंदर आणि वाचनीय आहेत. व्यक्तिचित्रं तर खासच. या संग्रहात मंटो यांचे असेच काही गाजलेले लेख आणि व्यक्तिचित्रांचा समावेश आहे. त्यांचा थेट मूळ उर्दूतून इंग्रजीत अनुवाद केल्याने तो वाचनीय झाला आहे.
२) द सॅफ्रन टाइड- द राइज ऑफ द बीजेपी : किंगशुक नाग, पाने : २५६५०० रुपये.
स्थापना, राजकारण प्रवेश इथपासून ते केंद्रीय सत्तालाभ इथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा आलेख पत्रकार नाग यांनी या पुस्तकात रेखाटला आहे. तो मनोरंजक आहे.
३) खुरमा, खीर अँड किस्मेत- फाइव्ह सिझन्स इन ओल्ड दिल्ली : पामेला टिम्म्स, पाने : १८२३९५ रुपये.
स्कॉटिश पत्रकार असलेल्या लेखिकेचे हे पुस्तक जुन्या दिल्लीतल्या खाद्यसंस्कृतीची यात्रा घडवतं. त्यातून लज्जत आणि शाही रंग रेंगाळत राहतात.