आंतरराष्ट्रीय राजकारणातही ‘किंग कोब्रा’ म्हणून ओळखले जाणारे झाम्बिया या आफ्रिकेच्या दक्षिणेकडील देशाचे राष्ट्राध्यक्ष मायकल साटा यांचे लंडनमधील रुग्णालयात निधन झाल्याची वार्ता बुधवारी जगाला समजली आणि या देशाने नेमके काय गमावले यावरही चर्चा सुरू झाली.
मायकल हे काही मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध नव्हते. उलट, रांगडे आणि फटकळ राजकारणी हीच त्यांची ओळख होती. ‘किंग कोब्रा’ ही ख्याती – खरे तर कुख्यातीच- त्यांना मिळाली तीही गरळ ओकल्यासारखे लागट बोलण्यामुळे. असे काही राजकारणी आपल्या देशातही आहेत आणि अनेकदा तर, ते टीका करताहेत की स्तुती हेही कळेनासे व्हावे, अशी स्थिती त्यांच्या तिखट जिभेमुळे ओढवते. मायकल यांनी जे चीनविरोधी आंदोलन १९९०च्या दशकापासून आरंभले होते, त्यात त्यांनी एकदा ‘‘चीनकडून गुलामगिरी पत्करण्यापेक्षा आमचा देश पुन्हा ब्रिटनचा वा युरोपीय राष्ट्राचा गुलाम झालेला बरा’’ असे वक्तव्य केले, ते अर्थातच वादग्रस्तही ठरले आणि या गलबल्यात, पाश्चात्त्य देशांनी पूर्वी केलेल्या वसाहतीकरणाला कल्याणकारी किनारही होती आणि चीनसारख्यांच्या नववसाहतवादाला अशी किनार असणे अशक्य आहे, हा मायकल यांचा मूळ मुद्दा बाजूलाच पडला!
रांगडेपणा नसानसांत भिनावा, इतक्या कष्टांत मायकल यांचे बालपण गेले. १९३७ साली जन्मलेले मायकल शाळेत शिकले बेतासबात, परंतु सफाई कर्मचाऱ्यापासून अनेक कामांमध्ये अंगमेहनत करताना, दुसरे लोक कसे जगताहेत आणि ही स्थिती का आहे, याचाही विचार या भावी नेत्याने केला. संघर्षांचा िपड, पण जीभही तिखट, या वैशिष्टय़ांमुळेच त्यांचा राजकारणप्रवेश सुकर झाला. लुसाका या झांबियाच्या राजधानीच्या शहराचे महापौर, पुढे केंद्रीय मंत्री अशी पदे मिळत गेली आणि चीनची आíथक दपटशाही न पटल्यामुळे त्याविरुद्ध आंदोलन उभारण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी पॅट्रियाटिक फ्रंट हा स्वत:चा पक्ष काढला. मात्र, २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत चिनी खाणी वा अन्य कंपन्यांना विरोध करणे त्यांनी टाळले आणि त्याआधीच्या तीन निवडणुकांतील अपयशांचा पायंडा ते २०११ मध्ये मोडू शकले.
केनेथ कौंडा या पाश्चात्त्य संस्कारित, आंग्लविद्याभूषित नेत्यापासून सुरू झालेला, झाम्बियातील स्वातंत्र्योत्तर नेतृत्वाचा प्रवाह कष्टकऱ्यांच्या वाडीवस्तीत आणणारा नेता, ही मायकल साटा यांची ओळख इतिहासात कायम राहील. त्यांचे उत्तराधिकारीपद उपराष्ट्रपती गाय स्कॉट यांच्याकडे आले आहे, पण ते तात्पुरतेच असेल.
केले, ते अर्थातच वादग्रस्तही ठरले आणि या गलबल्यात, पाश्चात्त्य देशांनी पूर्वी केलेल्या वसाहतीकरणाला कल्याणकारी किनारही होती आणि चीनसारख्यांच्या नववसाहतवादाला अशी किनार असणे अशक्य आहे, हा मायकल यांचा मूळ मुद्दा बाजूलाच पडला!