पुतिन यांच्या आततायी कृतीचा चीन आणि जर्मनी या दोन्ही देशांनी निषेध केला असून त्यामुळे पुतिनविरोधातील जागतिक कारवाईस बळच मिळणार आहे.

देशांतर्गत पातळीवर सर्वाची यशस्वीपणे मुस्कटदाबी केल्यानंतर पुतिन यांस ‘तुम्ही चुकत आहात’ असे सांगणारा कोणी नाही. अशी वेळ येते तेव्हा ती सर्वोच्च नेत्यासाठी धोक्याची घंटा असते. पण त्यास तीही ऐकू येत नाही. कारण हा नेता आपल्या सुआयोजित स्तुतिसुमनांचे मंजुळ ध्वनी ऐकण्यात मग्न असतो.

Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?

सातत्याने यशोकमान चढणाऱ्या नेत्याच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की तेथपासून त्याची कारकीर्द उतरणीस लागते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी युक्रेन हा तो क्षण. गेल्या जवळपास २२ वर्षांचे विनाआव्हान निर्घृण राजकीय यश या युक्रेनच्या निमित्ताने पुतिन यांनी पणास लावले असून हे युद्ध झालेच तर ते त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीचा चेहरा बदलवून टाकणारे असेल यात शंका नाही. याचे कारण हा संभाव्य संघर्ष रशिया आणि पुतिन यांच्यासाठी गरजेचा नाही. म्हणजे युक्रेन या देशाने रशिया वा पुतिन यांविरोधात काही कागाळी केली म्हणून त्यास धडा शिकवणे आवश्यक वाटावे असे काहीही नव्याने घडलेले नाही. तरीही पुतिन हे युक्रेनचा घास घेऊ पाहतात त्यामागे त्यांस आतापर्यंत मिळालेल्या यशाची धुंदी हे कारण आहे. देशांतर्गत पातळीवर सर्वाची यशस्वीपणे मुस्कटदाबी केल्यानंतर पुतिन यांस ‘तुम्ही चुकत आहात’ असे सांगणारा कोणी नाही. अशी वेळ येते तेव्हा ती सर्वोच्च नेत्यासाठी धोक्याची घंटा असते. पण त्यास तीही ऐकू येत नाही. कारण हा नेता आपल्या सुआयोजित स्तुतिसुमनांचे मंजुळ ध्वनी ऐकण्यात मग्न असतो. अशा वातारवणात विसंवादी स्वर कानावर येतच नाहीत. पुतिन यांचे हे असे झालेले आहे. देशात एक विरोधक नाही, जो एकमेव होता तोही जेरबंद केलेला, माध्यमकर्मीचे नंदीबैल झालेले, ज्यांनी अशा माना डोलावण्यास नकार दिला त्या अ‍ॅना पोलित्कोवस्कायासारख्या पत्रकारांस निजधामी पाठवून दिलेले आणि देशाबाहेरून आव्हान देऊ शकेल अशा अमेरिकेच्या माजी अध्यक्षावर गारूड यामुळे पुतिन हे बेफाम झाले असून युक्रेनचा घास घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या मुळाशी हीच बेफिकिरी आहे. तथापि साऱ्या जगास तिचे दुष्परिणाम भोगावे लागणार असल्याने ही घटना पुतिन यांच्यासाठी अंतारंभ ठरण्याचीच शक्यता अधिक.

पुतिन यांनी युक्रेनवर अद्याप हल्लाबोल केलेला नाही. पण तो न करताही युद्ध लादण्याची नवीनच पद्धत ते या वेळी वापरताना दिसतात. युक्रेन देशातील दोन रशियाबहुल प्रांतांस पुतिन यांनी आज स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा बहाल केला. दोनेत्स्क आणि लुहांस्क हे ते दोन प्रांत. ही नावे महत्त्वाची नाहीत. पण पुतिन यांची कृती मात्र महत्त्वाची. मुळात पुतिन यांनी निवडलेला हा मार्गच भयंकर असा आहे. त्याची दाहकता समजून घ्यावयाची असेल तर भारत-श्रीलंका वा भारत-पाकिस्तान असे उदाहरण देता येईल. म्हणजे श्रीलंकेच्या काही प्रांतांत तमिळ बहुसंख्य आहेत म्हणून किंवा पाकिस्तानच्या काही शहरांत हिंदूू संख्येने लक्षणीय आहेत म्हणून उद्या आपल्या सरकारने त्या प्रांतांस स्वतंत्र देशाचा दर्जा दिल्यास या देशांस जसे वाटेल तसे पुतिन यांच्या कृतीमुळे युक्रेन या देशास आज वाटत असणार. याचे कारण ‘आपण युद्ध सुरू केलेलेच नाही, फक्त त्या दोन प्रांतांस मान्यता तेवढी दिली’ हा त्यांचा युक्तिवाद गोड मानून घेण्यास कोणी तयार नाही.

म्हणजे आतापर्यंत चीन, जर्मनी हे देश पुतिन यांच्या पाठीशी असल्याचे भासत होते. चीन हा पुतिन यांच्या रशियन वहाणेने अमेरिकेस ठेचता येईल या विचाराने आणि जर्मनी हा रशियन ऊर्जासाधनांवर डोळा असल्यामुळे पुतिन यांस विरोध करीत नव्हता. पण पुतिन यांच्या या आततायी कृतीचा या दोन्हीही देशांनी निषेध केला असून त्यामुळे पुतिन यांच्या विरोधातील जागतिक कारवाईस बळच मिळणार आहे. यात कळीची भूमिका असेल ती चीनची. आपला हा शेजारी देश एका बाजूने पुतिन यांचा हितचिंतक आहे आणि दुसरीकडे त्यास पुतिन यांची युक्रेन चाल मंजूर नाही. कारण त्यामुळे चीनची डोकेदुखी वाढते. अनेकांस हे जाणवणार नाही. पण आपल्याप्रमाणे रशिया आणि चीन यांची सीमाही एकमेकांस लागून आहे. आणि दुसरे असे की रशियाप्रमाणे चीनचादेखील युरोपीय बाजारपेठेवर डोळा आहे. त्यामुळे चीनने रशियास युक्रेन युद्धात पाठिंबा दिला तर युरोपीय संघटना आणि अमेरिका यांच्या संभाव्य आर्थिक निर्बंधांचा फटका रशियाप्रमाणे चीनलादेखील बसेल. याआधी सात वर्षांपूर्वी रशियाने क्रीमिआचा घास घेतला असता संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधातील ठरावावर चीन तटस्थ राहिला. आता ही तटस्थता चीनला सोडावी लागेल. कारण अर्थातच आर्थिक.

हाच युक्तिवाद जर्मनीबाबतही लागू होतो. पुतिन यांना युक्रेन हवा आहे कारण रशियातील ऊर्जासाधने थेट जर्मनीच्या अंगणात नेऊन सोडण्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे संपूर्ण युरोपीय बाजारपेठ रशियातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांच्यासाठी खुली होते. अमेरिकेस नेमके तेच नको आहे. कारण त्यामुळे जर्मनी आणि युरोप यांचे रशियाशी संबंध सुधारतात. तसे झाल्यास अमेरिकेचे आर्थिक महत्त्व कमी होते. तसे ते व्हावे याच उद्देशाने पुतिन हे जर्मनीशी संधान बांधू इच्छितात. पण त्यासाठी युक्रेनचा घास घेतलाच तर जर्मनी अमेरिकेच्या बाजूने उभा राहणार नाही, हा त्यांचा कयास. पण आज जर्मनीने पुतिन यांच्याविरोधात उघड भूमिका घेऊन तो खोटा पाडला. युक्रेनच्या दोन प्रांतांस मान्यता देण्याची पुतिन यांची कृती जर्मनीस पसंत पडलेली नाही. याचा अर्थ अमेरिकेशी असलेल्या संबंधांचा बळी देऊन जर्मनी हा पुतिन यांचे प्रेम संपादन करू इच्छित नाही. त्यास ते परवडणारे नाही. याचा दुसरा अर्थ असा की तशीच वेळ आल्यास जर्मनी संयुक्त राष्ट्रात वा अन्यत्र पुतिन यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता नाही. म्हणजे  ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळच पुतिन यांच्यावर येण्याची शक्यता अधिक. संकटसमयी ज्याचा पाठिंबा महत्त्वाचा असेल तो चीन पाठराखण करण्याची शक्यता नाही आणि ज्यास खूश करायचे तो जर्मनीही तोंड मुरडण्याची शक्यता अधिक.

म्हणून पुतिन यांची ही कृती सर्वार्थाने वेडे साहस ठरू शकते. या वेडय़ा साहसात भर पडेल ती जगाकडून लादल्या जाणाऱ्या आर्थिक निर्बंधांची. अमेरिका आणि युरोप या दोघांनीही रशियावर कठोरातील कठोर निर्बंध लादण्याचा इरादा आधीच जाहीर केलेला आहे. तसे ते लादले जाणे याचा अर्थ बाजारपेठेचा संकोच होणे. म्हणजे रशियास आपली ऊर्जासाधने अन्यत्र विकता येणार नाहीत आणि अन्य देशांतील काही माल विकतही घेता येणार नाही. असे निर्बंध जेव्हा लावले जातात तेव्हा त्या देशातील जनतेच्या हालांस पारावर राहात नाही. सुदान आणि इराण ही अशी काही जिवंत आणि ताजी उदाहरणे. यातून देशांतर्गत पातळीवर सत्ताधाऱ्यांविरोधात प्रक्षोभ दाटण्याचा धोका असतो.

रशियात आधीच तो दाटू लागलेला आहे. सलग २२ वर्षे एकहाती, एककल्ली, एकारलेली सत्ता राबविल्यानंतर तसे होणे साहजिक. अशा वेळी हे युक्रेन युद्धचे झेंगट पुतिन यांनी अंगावर ओढवून घेतले तर ते वेडे साहस ठरण्याचाच धोका अधिक. सलग यशाची धुंदी ही अपयशाचा धोका झाकोळून टाकते. पुतिन हे त्याचे आणखी एक उदाहरण ठरतील. इंग्रजीत ‘पेनी वाइज बट पौंड फूलिश’ असा वाक्प्रचार आहे. ‘पैचा शहाणपणा आणि रुपयाचा मूर्खपणा’ असे त्याचे वर्णन करता येईल. पुतिन यांची कृती ही अशी आहे.