घरी वा रुग्णालयात मरणासन्न अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीस दयामरण देण्यासंदर्भातील कायदा करण्याचा केंद्राचा प्रस्ताव स्तुत्यच म्हणावा लागेल..
दयामरण किंवा इच्छामरणाच्या संदर्भात सुस्पष्ट आणि संशयाची सर्व जळमटे झटकून टाकणारा र्सवकष कायदा अस्तित्वात आला, तर खितपत जगणाऱ्या किंवा जगण्याची उमेद संपून केवळ मरणाची वाट पाहणाऱ्या असंख्य जीवांना दिलासा मिळणे शक्य आहे.
अरुणा शानबाग नावाच्या एका ‘स्टोरी’चा शेवट झाला, त्याला तीन दिवसांपूर्वी, १८ मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. जिवंतपणी मरणयातना भोगल्याने माणूसपण हरवलेली अरुणा शानबाग नावाची एक स्त्री जवळपास ४० वष्रे मुंबईच्या केईएम इस्पितळाच्या बिछान्यात केवळ संवेदनाहीन अवस्थेत पडून राहिलेली असतानाही, त्यामध्ये अनेक कथानकांची गुंफण होत गेली आणि गेल्या वर्षी १८ मे रोजी अरुणा शानबागचे निधन झाले. ‘अरुणाच्या स्टोरी’च्या निमित्ताने तिच्या अस्तित्वहीन जगण्याच्या काळात लिहिल्या गेलेल्या एका उपकथानकाचे पानही अरुणाच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा जिवंत झाले, हा निव्वळ योगायोग मानता येणार नाही. अरुणाला मरणप्राय जिवंतपणातून मुक्ती द्यावी, यासाठी एक लढा तिच्या संवेदनाहीन जिवंतपणाच्या काळातच उभा राहिला होता. तो लढा होता, दयामरणाचा किंवा इच्छामरणाचा! सजीवपणाच्या संवेदना हरवलेल्या अवस्थेत किंवा जगण्याची आस संपलेल्या अवस्थेत निरसपणे मरणाची वाट पाहत जगत राहण्यापेक्षा, समाधानाने मृत्यूला सामोरे जाण्याची किंवा मरण देण्याची मागणी अरुणाच्या निमित्ताने ऐरणीवर आली असली, तरी या मागणीचा पाठपुरावा गेल्या अनेक दशकांपासून व्यक्तीपासून समूहांपर्यंत अनेकांकडून सातत्याने सुरू होता. इच्छामरणाच्या मागणीसाठी लहानमोठय़ा गटांनी चळवळीदेखील उभारल्या असल्या, तरी इच्छामरण हा सर्वमान्य मुद्दा कधीच ठरला नाही. जन्म घेणे ही सजीवाची ऐच्छिक प्रक्रिया नसते. ती नसíगक प्रक्रिया असते. तसे मरण हीदेखील ऐच्छिक नव्हे, तर नसíगक प्रक्रियाच असली पाहिजे, असा प्रबळ दावा इच्छामरणाच्या चळवळीआड उभा राहिला होता, तर जन्म घेणे आपल्या हाती नाही, पण मरण तरी आपल्या हाती असले पाहिजे, असा दावा करीत इच्छामरणाचे असंख्य पुरस्कत्रे सरकारदरबारी याचना करीत वर्षांनुवष्रे कायद्याकडे डोळे लावून बसले आहेत.
जिवंतपणाचे सर्वात जिवंत लक्षण कोणते असेल, तर ‘मृत्यू’ हे त्याचे एका शब्दातील प्रामाणिक उत्तर असले पाहिजे. कारण मृत्यू हा केवळ- आणि केवळच- जिवंत असलेल्यांच्याच वाटय़ाला येणारा निसर्गाचा आविष्कार आहे. आसपास असंख्य निर्जीव दगडधोंडे वर्षांनुवष्रे उन्हातान्हात त्याच स्थितीत पडून असतात. त्यांच्या जन्माला स्वयंभू कहाण्या नसतात. त्यांची तोडफोड होते, कित्येकाच्या भोवती मुळांचा विळखा घालत जिवंत झाडे जोमाने फोफावतात, तरीही त्या निरिच्छ दगडाधोंडय़ांना कसल्याच संवेदना नसतात. अवघ्या सजीवसृष्टीने आनंदाने मोहरून जावे असे असंख्य क्षण सभोवती असतानाही किंवा कोमेजून जावे असे असंख्य आघात होत असतानादेखील, दगडधोंडय़ांच्या अस्तित्वावर त्याचे कोणतेही परिणाम होत नसतात. सृष्टीचे कौतुक म्हटल्या जाणाऱ्या संवर्धनाची आस त्याला नसते, जन्माचा सोहळाही नसतो आणि मृत्यूची वेदनाही त्याला नसते. पण म्हणून त्या दगडधोंडय़ाच्या अस्तित्वाचा कुणी कधी हेवा करीत नाही. म्हणून सजीवपण हे सृष्टीचे वेगळेपण ठरते. तरीही या सजीवपणाचा आनंद अमर्याद नसतो.
मृत्यू हा निसर्गनियम झाला. म्हणून तो जिवंतपणाचे अंतिम लक्षण ठरला. त्याची रूपे असंख्य असल्यामुळे आणि त्याला अनपेक्षिताची किनार असल्यामुळे कदाचित त्याचे भय असते. पण मृत्यू हा जगण्याचा शेवटचा क्षण आहे, हे सत्य स्वीकारावेच लागते.
खरे म्हणजे, केवळ जगण्याचाच नव्हे, तर सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क कायद्यानेच सर्वाना दिलेला आहे. मग असे सन्मानपूर्वक जगणे शक्य होत नसेल, तर केवळ मरण येत नाही म्हणून जगणे हे खरे जगणे नव्हे अशी निराशा ज्या मनांच्या कोपऱ्यात जागी होत जाते, त्याची मरणाची इच्छा प्रबळ होत असते. आत्महत्यांसारखे प्रकार हे नराश्यग्रस्त अवस्थेचे टोक असते. असे नराश्यपूर्ण जगण्यापेक्षा सन्मानपूर्वक मरण्याचा हक्क मिळावा म्हणून इच्छामरण किंवा दयामरणाचा पुरस्कार वाढू लागला. स्वित्र्झलड, नेदरलँड्स किंवा अमेरिकेतील काही राज्यांमध्ये इच्छामरणाचे कायदे अस्तित्वात आहेत. पण मरणाला कायदेशीर हक्क देण्याच्या या प्रकाराकडे संशयानेदेखील पाहिले जाते. काटे काढण्यासाठी त्याचा दुरुपयोग होणार नाही हे पाहणारी यंत्रणा काटेकोर नसेल तर कायद्याचे काय होणार, हा या कायद्याच्या विरोधकांचा मुद्दा नजरेआड करता येत नाही. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या अनेक दशकांची कोंडी फोडून एका कायद्याचा मसुदा तरी चच्रेसाठी जनतेसमोर ठेवत एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलेल्या, केवळ मरण येत नाही एवढेच जिवंतपणाचे लक्षण असलेल्या व्यक्तीस दयामरण देण्यासंदर्भातील कायदा करण्यापूर्वी जनमत अजमावण्याचे केंद्र सरकारने आता ठरविले आहे. यानिमित्ताने इच्छामरण, दयामरण या बहुचíचत विषयाचे अनेक अंगांनी नव्याने मंथन होणार आहे. मृत्यू हा अनाकलनीय म्हणूनच काहीसा गूढ मुद्दा असल्याने, जगण्याच्या काळाची निश्चिती करता येत नसल्याच्या अवस्थेत असताना एखाद्याला दयामरण देणे हे निसर्गाच्या प्रक्रियेवरील अतिक्रमण आणि म्हणूनच अन्यायकारक ठरेल, असा प्रवाह लगेचच बळावू लागला आहे, तर सन्मानाने जगण्याची कोणतीच लक्षणे उरलेली नसल्याच्या, म्हणजेच आसन्नमरण अवस्थेत जगणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दयामरण हा सन्मानपूर्वक मृत्यू तरी ठरेल, असा दुसरा मतप्रवाहदेखील चच्रेत आला आहे. आसन्नमरण अवस्थेतील व्यक्तीला उपचाराने जगविणे हे नसíगक जगणे ठरणार नाही, त्यामुळे त्याला तशा अवस्थेत जगविणेदेखील उचित नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जण मान्य करीत असले, तरी जगविणे हीच त्या क्षेत्राची नीती असल्याने दयामरण हे वैद्यकीय व्यवसायाच्या नतिकतेला धरून नाही, असाही दावा केला जातो. अरुणा शानबाग यांना दयामरण देण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देताना, इच्छामरण हा गुन्हा नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले होते. त्यामुळे दयामरण आणि इच्छामरणाच्या मुद्दय़ावर सकारात्मक विचार करण्याची एक मानसिकता तरी सुदृढ होऊ लागली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी दयामरणाचा अवलंब करू नये, तथापि, मृतवत मेंदूसारख्या अवस्थेतील रुग्णास जिवंत ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम यंत्रणा काढून घेण्याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांना सामूहिक निर्णय घेऊन तशी कृती करता येईल, असे केंद्रीय आरोग्य खात्याने २००२ मध्येच वैद्यकीय व्यावसायिकांच्या नीतिमूल्यांचा तपशील देतानाच स्पष्ट केले होते. आता त्या संदर्भातील कायदाच अस्तित्वात येऊ पाहत आहे.
कायद्यातील त्रुटीचा गरफायदा घेणे किंवा कायद्याला बगल देणे, कायद्याशी विसंगत कृती करणे हा गुन्हेगारीचा पाया असतो. दयामरण किंवा इच्छामरणाच्या संदर्भात सुस्पष्ट आणि संशयाची सर्व जळमटे झटकून टाकणारा र्सवकष कायदा अस्तित्वात आला, तर खितपत जगणाऱ्या किंवा जगण्याची उमेद संपून केवळ मरणाची वाट पाहणाऱ्या असंख्य जीवांना दिलासा मिळणे शक्य आहे. मृत्यू ही आनंददायी घटना नाही, हे आपण भावनिकदृष्टय़ा स्वीकारलेले सत्य असले, तरी मृत्यू टाळता येत नाही, हेदेखील निर्वविाद सत्य आहे. सन्मानाने जगण्याचा कायदेशीर हक्क जरी घटनेनेच प्रत्येकाला दिला असला, तरी असे सन्मानाचे जगणे हे अनेकांसाठी अजूनही स्वप्नवतच आहे. सन्मानाने जगविण्याची जबाबदारी असलेल्यांपुढे, तशी परिस्थिती निर्माण करण्याचे मोठे आव्हान सदैव उभे आहे. ते आव्हान पेलविण्याची क्षमता अंगी येत नाही, तोवर सन्मानाने मरण्याचा मार्ग मोकळा करण्यात काहीच गर नाही. त्याचे पहिले पाऊल उचलले गेले, हा समंजसपणाच म्हणावा लागेल.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…