बुकबातमी : १२५ वर्षांच्या ग्रंथखुणा…

वर्तमानपत्रातली ग्रंथपरीक्षणं आणि टिप्पणीवजा अन्य प्रकारचा – म्हणजे बुकबातमीसारखा वगैरे- मजकूर, यांचं हे संकलन.

बऱ्यापैकी जाडजूड आणि ‘सवलतीत’ ६६ अमेरिकी डॉलर किंमत असलेलं हे पुस्तक येतंय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात. कसलं पुस्तक? तर वर्तमानपत्रातली ग्रंथपरीक्षणं आणि टिप्पणीवजा अन्य प्रकारचा – म्हणजे बुकबातमीसारखा वगैरे- मजकूर, यांचं हे संकलन. ‘द न्यू यॉर्क टाइम्स ’ या एकाच दैनिकाच्या गेल्या १२५ वर्षांच्या, सहा हजारांहून अधिक  अंकांच्या ठेव्यातून हे निवडक माणिकमोती वेचून काढलेले आहेत, म्हणून या पुस्तकाचं महत्त्व. एरवी ग्रंथपरीक्षणांचा इतिहास मांडणारी पुस्तकं काही कमी नाहीत. ब्रिटनमध्ये तर सतराव्या शतकापासूनचा ग्रंथपरीक्षण- इतिहास सांगितला जातो कुºर्यात. पण अमेरिकेत न्यू यॉर्क टाइम्सनंच पहिल्या (१८ सप्टेंबर १८५१ रोजीच्या) अंकापासून ग्रंथपरीक्षणांना स्थान दिलं,  आणि १८९६ च्या ऑक्टोबरपासून तर आठ पानी निराळा पुरवणीवजा विभागच सुरू केला ग्रंथपानं देणारा. तेव्हापासून ते आजवरच्या ग्रंथपानांतलं हे निवडक. ‘द न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू’ हे आता स्वतंत्र साप्ताहिकासारखंच चालतं. त्याच्या हल्लीच्या संपादिका टिना जॉर्डन आणि नूर कासिम यांनी या पुस्तकाचं संपादन इतकं सटीक केलंय की, ‘‘१९२२ साली टी. एस. इलियटचं ‘वेस्ट लॅण्ड’ प्रकाशित झालं, तरी आमच्याकडे एकही ओळ आली नाही छापून त्याबद्दल’’ अशी कबुलीही त्यांनी दिलीय. पण बाकीच्या अनेक अमेरिकी लेखकांना या ग्रंथपानांनी स्थान दिलंय,  त्यातून अमेरिकी साहित्याचा इतिहासच उलगडेल!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Book marks of 125 years the new york times the new york times book review akp

Next Story
विशलिस्ट
ताज्या बातम्या