scorecardresearch

बुकबातमी : गाणं बदललं; पण वाचणं?

पण गीतकार म्हणून त्यांच्या शब्दांना न्याय देण्यासाठी छापील पुस्तकाचा मार्गच कायम राहिला!

बुकबातमी : गाणं बदललं; पण वाचणं?

पॉल मॅक्कार्टनी हे अ‍ॅकॉस्टिक-इलेक्ट्रिक गिटारवादक आणि गीतकार आहेत, पण अनेक भारतीयांना त्यांचं कौतुक असते ते गिटारइतकीच लीलया त्यांनी सतारही (भारतात आले होते तेव्हा) वाजवल्याचं. ‘बीटल्स’ या अजरामर छाप असलेल्या, पण अल्पजीवी ठरलेल्या पॉप-रॉक संगीतसमूहाचे पॉल हे सदस्य. ‘बीटल्स’मध्ये ते गिटार वाजवत, आणि गाणीही लिहीत. ‘बीटल्स’ची ‘यस्टरडे’, ‘हिअर, देअर अ‍ॅण्ड एव्हरीव्हेअर’, ‘द लाँग अ‍ॅण्ड वाइन्डिंग रोड’, ‘लेट इट बी’ ही अत्यंत गाजलेली गाणी जॉन लेनन आणि पॉल मॅक्कार्टनी यांनी मिळून लिहिली आहेत. ही सारी गाणी चार दशकांपूर्वीच्या ‘एलपी’ तबकड्यांवरली असली, तरी पुढल्या कॅसेटच्या, सीडींच्या जमान्यातही ती भरपूर ऐकली गेली आणि आजच्या पेनड्राइव्ह आणि ‘डाऊनलोड’च्या काळातसुद्धा ती तितकीच ऐकली जातात! बीटल्सनंतरही पॉल यांनी (जॉन लेननची साथ नसूनही) ‘एबनी अ‍ॅण्ड आयव्हरी’ किंवा ‘टेक इट अवे’सारखी उत्तम आशयाची गाणी लिहिली. पण वादक म्हणून ‘दिसणारे’ पॉल मॅक्कार्टनी हे गीतकार म्हणून किती थोर आहेत, हे आजवर नजरेआडच झालं. आता येत्या नोव्हेंबरात, त्यांनी १९५६ पासून लिहिलेल्या सर्व प्रकाशित आणि काही अप्रकाशित गाण्यांचं सुमारे चार किलो वजनाचं, दोन खंडांत मिळून ९६० पानांचं आणि १५० डॉलर (किमान १०,९०० रुपये) किमतीचं पुस्तक येतंय!

संगीतकार म्हणून तबकडी ते ‘डाऊनलोड’ हा मोठा काळ मॅक्कार्टनी यांनी पाहिलाय, पण गीतकार म्हणून त्यांच्या शब्दांना न्याय देण्यासाठी छापील पुस्तकाचा मार्गच कायम राहिला!

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2021 at 00:01 IST

संबंधित बातम्या