‘बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिक ‘रेत की समाधि’ या हिंदी कादंबरीच्या ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ या अनुवादाला मिळालं, तो अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला आहे आणि मूळ कादंबरी गीतांजली श्री यांची आहे, ही काही ‘बुकबातमी’ नव्हे. हे पुस्तक अनुवादासाठी खरोखरच कठीण – आणि म्हणून आव्हानदायीसुद्धा- होतं, ही मात्र बुकबातमी ठरू शकते. पण कठीण म्हणजे किती कठीण? मुद्दाम वाचा खालची हिंदी वाक्यं :

‘‘ परिवार की दशा दिल्ली नगरी सी है. ठस्समठस्सा तितर बितर अस्त व्यस्त चीलसपट्टा खील बताशा पुराना सिकंदर लोदी सबसे पुरानी इन्द्रप्रस्थ जगर जगर मॉल बुक्कायंधी झोपडम्पट्टी और ऊपर और नीचे धरती और अम्बर के चीथडमे बिजली और टेलीफोन के तारों पर मटमैली पन्नियों से झूलते और कभी पास खडमे मति-मारे को छुल जाते और करंट लगा के उसका सफ़ाया कर जाते. पर इससे न तो शहर साफ़ होता, न आबादी घटती. दिल्ली और परिवार अजर अमर, बमगोले पे टिके, फटते, फूटते, चलते रहते.’’

ravi jadhav shares post for chinmay mandlekar
“महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

दिल्लीच्या चाँदनी चौकाजवळ ‘रेत की समाधि’ची म्हातारी नायिका राहाते, त्या परिसराचं या वाक्यांमधलं वर्णन एकाच वेळी वास्तवदर्शी आणि संज्ञाप्रवाही! पण हे नुसतं परिसरवर्णन नाही, ‘परिवार की दशा’ कशी आहे, हे लेखिका सांगतेय! तेव्हा आपण जरी ‘भारतीय भाषेचा सन्मान’ झाला म्हणून आनंदलो असलो, तरी डेझी रॉकवेल यांनी इंग्रजीत उत्तम काम केलं नसतं तर हा मान मिळाला नसता, ही खूणगाठ बांधू या. आणि हो, एकदा वरच्या वाक्यांचा (तरी) आपापल्या मातृभाषेत अनुवाद सर्वानी करून पाहावा! वीज आणि टेलिफोनच्या तारांपेक्षा संकल्पनांच्या जंजाळात अडकल्यासारखं वाटेल ना? बाकी ‘भारतीय भाषा’ म्हणून आपल्याला आनंद, ‘हिन्दी का सम्मान’ म्हणून हिंदीवाल्यांना आनंद, हे सारं ठीकच पण तुमच्या अनुवाद-प्रयत्नातून तुम्हालाच एक ठळक बातमी मिळेल ती अशी की, भाषा राज्याची वा देशाची असते वगैरे कितीही मानलं तरी लिखाणाची भाषा मात्र स्वत:ची असते स्वत:ची! आणि तशी ती असावीच लागते.