‘जयपूर लिटफेस्ट’ हे प्रामुख्यानं इंग्रजी साहित्याचं भारतातलं पहिलं संमेलन, २००९ मध्ये लहान स्वरूपात सुरू झालं आणि साधारण २०१६ पासून इतकं वाढलं की ‘पूर्वीची मजा नाही’ हा नेहमीचाच सूर, चक्क खरा वाटू लागला! कोविडकाळामुळेच या गर्दीला लगाम बसला, कारण गेल्या वर्षी हा अख्खा लिटफेस्ट ऑनलाइनच करावा लागला. मग वर्षभर काही ना काही ऑनलाइन कार्यक्रमांची रेलचेलच जयपूर लिटफेस्टनं केली आणि ‘५० लाख लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला’ असा दावाही केला! जयपूर लिटफेस्टच्या तारखा साधारण २६ जानेवारीनंतरच्या असतात, तो शिरस्ता यंदाही पाळला जाईल. २०२२ मध्ये २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी भरगच्च कार्यक्रम असतील.. पण यापैकी काही कार्यक्रम ‘क्लार्क आमेर’ नावाच्या आलीशान हॉटेलात, तर अगदी थोडेच (बहुतेक सारे संगीताचे वगैरे) कार्यक्रम जयपूर लिटफेस्ट नेहमीचं ठाणं असलेल्या ‘हॉटेल डिग्गी पॅलेस’मध्ये होतील. या सर्व कार्यक्रमांना यंदा प्रथमच तिकीट आहे. सर्वात स्वस्त तिकीट २०० रुपयांचं! ते नसेल काढायचं, तर ऑनलाइन पाहाता येतीलच बरेचसे परिसंवाद वगैरे. थोडक्यात, आता जयपूरनं गर्दीला खरंच आवर घालायला सुरुवात केलेली आहे.

जयपूरशी अगदी स्पर्धा करणारा नव्हे, पण तितकाच मोठा होऊ पाहणारा आणि सध्या भारतातला दुसऱ्या क्रमांकाच साहित्य महोत्सव  म्हणजे ‘केरळ लिटरेचर फेस्टिव्हल’. यंदाही तो कोळिकोड इथं होणार आहे. जयपूरप्रमाणेच इथंही ४०० हून अधिक वक्ते किंवा सहभागी असतात, प्रेक्षकसंख्या काही हजारांत असते. गेल्या वर्षी या सर्वाला खीळ बसली खरी पण यंदा सारं जोमानं करण्याचा चंग केरळ लिटफेस्टनं बांधला आहे. जेफ्री आर्चर ते वेन्डी डोनिजर किंवा अरुंधती रॉय असे परीपरींचे लेखक यंदा केरळच्या लिटफेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. जयपूरचं हे तेरावं वर्ष, तर केरळचं सहावं. प्रतिसाद वाढल्याचा दावा यंदा  कोळिकोडमधून जयपूरपेक्षा जास्त ठामपणे होणार, हे काय सांगायला हवं?

BJP Victory On 4th June Morning People Taunts By Sharing Attack Video
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच झाली हाणामारी आणि दोष मात्र.. प्रचारयात्रेचा Video पाहून पडाल बुचकळ्यात, खरं काय?
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?