scorecardresearch

चतु:सूत्र : एकात्म मानव दर्शन-अभिशासनविचार

धर्मकारणाच्या प्रकाशात राष्ट्रकारण व राष्ट्रकारणासाठी राजकारण ही भारतीय परंपरा आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे समाजाची धारणा करणारी जीवनदृष्टी, जीवनमूल्ये व नियमसमूह; रिलिजन, मजहब वा केवळ उपासनापद्धती किंवा कर्मकांड नव्हे.

एकात्म मानववाद

रवींद्र महाजन

गेला काही काळ आपल्याला पाश्चात्त्यांच्या विचारसरणीचा मोह पडत असला तरी राष्ट्र ही संकल्पना आपल्याकडे वैदिक काळापासून अस्तित्वात आहे. ती येथील समाज, त्याच्या गरजा, त्याचा स्वभाव लक्षात घेऊन विकसित होत गेली आहे.

धर्मकारणाच्या प्रकाशात राष्ट्रकारण व राष्ट्रकारणासाठी राजकारण ही भारतीय परंपरा आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे समाजाची धारणा करणारी जीवनदृष्टी, जीवनमूल्ये व नियमसमूह; रिलिजन, मजहब वा केवळ उपासनापद्धती किंवा कर्मकांड नव्हे. ‘एकात्म मानव दर्शन’प्रणीत सुयोग्य अभिशासन (गव्हर्नन्स – पोलिटिकल अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह) राष्ट्रीय सामथ्र्य व समृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहे. अभिशासनपद्धती आपल्या संस्कृतीनुरूप असली पाहिजे.

प्राचीन अभिशासन 

योगी अरिवदांच्या ‘भारतीय संस्कृतीचा पाया’ या पुस्तकात भारतातील प्राचीन अभिशासनाबद्दल म्हटले आहे की, ‘राजाचे प्रमुख कर्तव्य धर्मसंरक्षण हे होते. त्याला कायदे करण्याचा अधिकार नसे. कायदे ऋषी करीत. कुठल्याही श्रेणीतून ऋषी होत. ख्रिस्तपूर्व किमान ६०० वर्षे ग्रामलोकसत्ताक, नगरलोकसत्ताक, उद्योगसंघ, कुलसंघ, राजधानीत पौरसभा व राजाला सल्ला देणारी कारभारी मंडळे अशा निर्णय घेणाऱ्या स्वायत्त संस्था कार्यरत होत्या. यांत श्रेणींच्या संख्याबलानुसार त्यांना प्रतिनिधित्व असे. भारतात समाजाची व राजकारणाची एखादी आदर्श व्यवस्था निर्माण झाली नसली तरी सुज्ञ, टिकाऊ, समन्वयी सुस्थिर व्यवस्था अस्तित्वात होती.’

अभिशासनाची उद्दिष्टे

वर्तमान समाजवास्तवात ‘धर्म, संस्कृती, जीवनपद्धती, राष्ट्रीय एकात्मता यांच्या संरक्षणासाठी राजसत्ता’ हे मूल्य अंगीकारणे आवश्यक आहे. या दृष्टीने अभिशासनाची प्रमुख उद्दिष्टे थोडक्यात खालीलप्रमाणे: 

  • राष्ट्रीय एकता व अखंडता यांच्यासाठी बाह्य व अंतर्गत सुरक्षा तसेच न्यायव्यवस्था चोख राखणे.
  • राष्ट्रीय सम्यक विकासाची धोरणे, योजना आखणे, राबवणे. ल्ल संस्कृतीसंवर्धनासाठी झ्र् गुणवत्ता, नैतिकता, समरसता, समता, राष्ट्रीय चारित्र्य, सत्यान्वेषण – प्रयत्नशील राहणे. ल्ल भारतमातेसंबंधी समर्पणभावना, भ्रष्टाचारनिर्मूलन, पर्यावरणसंरक्षण, इ.साठी कार्यरत. ल्ल सतत भविष्यवेध घेऊन जगभरच्या उपयुक्त ज्ञानाचा व साधनांचा उपयोग करणे.

अभिशासनाची मार्गदर्शक सूत्रे

भारतीय चिंतनाच्या आधारे, देशाच्या आशा-आकांक्षांनुसार काही मार्गदर्शक अभिशासन सूत्रे:

धर्मानुसारी – व्यक्तीच्या विकासासाठी भारतीय सामाजिक तत्त्वज्ञानात पुरुषार्थचतुष्टय़ाची (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) योजना आहे. समाजधारणेचे हे सिद्धांत धर्मात समाविष्ट आहेत. धर्म सनातन पण त्याचा व्यवहार कालमानाप्रमाणे बदलतो.

राष्ट्रहित सर्वोपरी- सर्व देशाच्या हिताचा समग्र दृष्टीने विचार हाच प्राप्त परिस्थितीत निर्णायक असावा. वंचितांना झुकते माप द्यावे.

लोकेच्छा व लोकहित- लोकेच्छा व लोकहित तसेच आचार्य परिषदेचे मत या तिन्हींचा सुमेळ

पूर्णत्वाचा ध्यास- वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय बाबीत पूर्णत्वाच्या ध्यासानेच सर्वागीण प्रगती. यातून गुणवत्तापरिपोष व संशोधन तसेच प्रतिभाविकास.

विकेंद्रीकरण – राज्यसत्ता, अर्थोत्पादन व धर्मसत्ता यांच्या एकीकरणाने उन्मत्तता येऊ शकते व उर्वरित समाजाचे शोषण होते, म्हणून त्यांना वेगवेगळे ठेवणे व प्रत्येकीचे विकेंद्रीकरण करणे श्रेयस्कर.

संतुलन व समन्वय- सृष्टी ही समन्वय व सहकार यावर टिकली आहे. म्हणून वर्गविरोध आणि संघर्ष यांच्या ऐवजी परस्परावलंबन, पूरकता आणि सहकार यावर भर

स्वायत्त समाज- शासनसत्ता ही राष्ट्राचे सर्वस्व नव्हे पण महत्वाचे अंग. संरक्षण, कायदा-सुव्यवस्था, इ. सोडून सर्व राष्ट्रव्यवहार स्वायत्त संस्थांद्वारा होणे हे निकोप प्रगतीसाठी उपकारक 

स्वदेशी – स्वदेशी नेहमीच कालोचित, पण पश्चिमीकरणाच्या मोहात व जागतिकीकरणाच्या मृगजळामागे धावण्यात स्वदेशीला दुर्लक्षिले. आता धक्के खाऊन पुन्हा स्वदेशीकडे काही वाटचाल सुरू.

  राष्ट्राची संकल्पना

आपली राष्ट्रकल्पना वैदिक कालापासून आहे. ती पश्चिमेप्रमाणे प्रतिक्रियात्मक नसून भावात्मक आहे. प्राचीन काळीच एकराष्ट्रीयत्वाची भावना, भारताच्या एकत्वाची कल्पना, यांना मूर्त स्वरूप देणाऱ्या संस्थांची स्थापना आणि तसे संस्कार अशी योजना आपल्याला दिसते.

राष्ट्राचे भूमी, जन, संस्कृती, भूतकाळाविषयी समान धारणा व उज्ज्वल भविष्यासंबंधी उत्कट आकांक्षा हे महत्त्वाचे चार घटक. एका विशिष्ट भूमीला माता मानणारा पुत्ररूप समाज, इतिहासातील सुखदु:खांसंबंधी समान भाव, ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांविषयी आदर, तसेच उज्ज्वल भविष्याची स्वप्ने व त्यासाठी एकत्र झटण्याची तयारी या गोष्टी राष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेतच पण या सर्वाना कालौघात आलेला संस्कृतीचा घाट हा अतीव महत्वाचा पैलू आहे. म्हणून याला भूसांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात.

चिती

प्रत्येक समाजाचे/राष्ट्राचे स्वत:चे म्हणून काही आत्मतत्त्व-सत्त्व (इथॉस) असते. हिंदुस्थानचा स्वभाव सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘हिंदु म्हणतो राजकीय व सामाजिक स्वातंत्र्य हवेच. पण खरे मोल आध्यात्मिक स्वतंत्रतेचेझ्र्मुक्तीचे आहे. हाच आपला राष्ट्रीय जीवनहेतू. आपण पाहिले की आपला जोम, आपली शक्ती, आपले राष्ट्रीय प्राणतत्त्व आपल्या धर्मात आहे. या सत्याशी तुम्ही बांधले गेला आहात व त्याचा त्याग केल्यास तुमचा विनाश होऊन जाईल. आपल्या राष्ट्राची हीच जीवनशक्ती आहे व ती पुष्ट केली पाहिजे.’’

विराट

चितीने जागृत आणि एकीभूत झालेल्या समष्टीच्या नैसर्गिक शक्तीला ‘विराट’ म्हणतात. प्राचीनकाळी अशा प्रकारच्या सजग जनचेतनेचे प्रतिनिधित्व ’समिती’ ही नैतिक यंत्रणा करीत असे. आधुनिक काळातही हा अनुभव देशातील आणीबाणीच्या संदर्भात आला. ही जनचेतना नित्यदक्ष जागरूक कशी ठेवायची, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

राष्ट्र व राज्य

राष्ट्र व राज्य या दोन वेगळय़ा संकल्पना आहेत. राष्ट्र हे एक स्थायी सत्य आहे; तर राज्याचे स्वरूप अस्थिर असते. राज्य ही राष्ट्राच्या सोयीसाठी निर्मित यंत्रणा असते. आपण पाहतो की राज्याच्या सीमांत परिवर्तन घडू शकते. आमचे राज्य गेले तरी राष्ट्र जिवंत होते. तीच गोष्ट इस्रायलची. दोघांनी राज्ये परत मिळविली.

पश्चिमेत राष्ट्र हे मानवनिर्मित मानतात पण राजा स्वत:ला दैवी अधिकारप्राप्त समजत असे. सध्या तिकडे राष्ट्र व राज्य एकरूप मानून त्याला नेशन-स्टेट म्हणतात. युनोमध्ये ज्यांना नेशन म्हणून मान्यता मिळते ती प्रत्यक्षात राज्येच असतात.

एकात्म शासन

घटना समितीत एकात्म शासनप्रणालीबाबत चर्चा होऊनही शेवटी सध्याची युनियन ऑफ स्टेट्स ही रचना स्वीकारली गेली. या पद्धतीचे दोष आता दिसतात. एकात्म शासनपद्धतीत स्वायत्त शासनाच्या आधारावर गाव या आधारभूत घटकापासून प्रारंभ होऊन ग्रामांचे मंडल, जनपद आणि प्रांत यांच्या रचनेहून मोठे असे संपूर्ण राष्ट्राचे एकच एकक असेल. त्यात सर्व प्रांतीय किंवा प्रादेशिक मंडले राष्ट्राचे अभिन्न आणि अविभाज्य घटक म्हणून राहतील. यात संरक्षण, परराष्ट्र धोरण, दळणवळण अशा काही बाबी सोडून जास्तीतजास्त विकेंद्रीकरण, प्रांत, जनपद, मंडल, ग्राम यांच्या स्तरावर झाले पाहिजे.

सरकार

राष्ट्राच्या सीमांचे संरक्षण आणि समाजजीवन सुव्यवस्थित व शांततापूर्ण रीतीने गतिशील ठेवणे हीच राज्यसत्तेवर जबाबदारी असते. राजसत्तेचे अधिक आक्रमण समाजजीवनावर झाल्यास समाज व नागरिक यांची प्रतिभा व प्रेरणा यांचा कोंडमारा होऊन त्यांचा विकास खुंटेल. व्यक्तिविकासासाठी ही अवस्था उपयुक्त नाही. समाजासाठीही ती अनिष्ट आहे.

शासक, लोकप्रतिनिधी, प्रशासक

काही अपवाद वगळता शासक, लोकप्रतिनिधीं व प्रशासक यांची वागणूक व कामाचा दर्जा घसरलेला दिसतो. आदर्श राज्यपद्धतीसाठी किंवा सुशासनासाठी त्यांची वृत्ती, ज्ञान व क्षमता यांचे फार महत्त्व आहे. त्यांनी राजर्षी म्हणजे नुसते राजा नव्हे तर ऋषीही बनावे – पुरुषार्थी व संतवृत्तीचे परोपकारी- अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रीय संरक्षण

जगाला धर्म देण्यास निघालेल्या हिंदुना ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचर्चा प्रवर्तते’ या सिद्धांताचा विसर पडला. हे बदलले पाहिजे. युरोपीय संस्कृतीचा धोका वाढत आहे. केवळ बचाव हा आधुनिक भांडणात शेवटी बचाव करणाऱ्याच्या पदरात केवळ पराभवच घालतो. भारताचे युरोपावरील आक्रमण नवनिर्मिती करणारे यशस्वी असे घडून येईल तरच भारताचे स्वसंरक्षण परिणामकारक होईल.

आचार्य परिषद

वर्तमान राजकीय- सामाजिक व्यवस्थेत राजसत्ताही धम्र्य राहण्यासाठी, तिच्यावर अंकुश कसा राखावा हा सर्वच समाजांपुढील जटिल प्रश्न आहे. सच्चरित्र, आदर्श व्यक्तींचा गट समाजात असेल तर लोक त्यांचे मार्गदर्शन घेतात, अनुकरण करू लागतात. अशा लोकांची आचार्य परिषद महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सरकारला सल्ला देऊ शकेल. शासनाने या सल्ल्याचा योग्य तो आदर करून उपयोग करून घ्यावा.

अभिशासनासंबंधी केवळ काही मुद्देच संक्षेपाने मांडले आहेत. एकंदरच आपल्या राष्ट्रीय जीवनदर्शनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी, स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाच्या प्रयत्नांसाठी ‘भारतीयो भूत्वा भारतं यजेत्।’ या सूत्रातून अस्सल भारतीय तत्त्वदृष्टीचा स्वीकार तसेच जागतिक परिस्थितीचा व्यापक आढावा आवश्यक आहे.

auraent@gmail.com

मराठीतील सर्व चतु:सूत्र ( Chatusutra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Integrated human philosophy integral humanism westerners thought nationalism nation politics ysh

ताज्या बातम्या