गेल्या आठवड्यातील बातमी. फ्रान्समधील ‘बुकसेलर्स असोसिएशन’ने पुढील महिन्यात पॅरिसमध्ये भरणार्या पुस्तक प्रदर्शनासाठी ‘ॲमेझान’वर थेट बहिष्कार टाकल्याची. बाजारात ‘एआय’निर्मित पुस्तकांची भर पाडत ॲमेझॉन त्यांचा खोटा प्रचार करीत त्या पुस्तकांना खूपविका बनवतोय हे बहिष्काराचे मुख्य कारण.
बहिष्कार अस्त्रामुळे ‘ॲमेझॉन’ने या प्रदर्शनातून अंग काढून घेतले. पण गेल्या २० वर्षांपासून जगभरातील पुस्तकविक्रीत मक्तेदारी मिळवू पाहत असलेल्या आणि स्थानिक ग्रंथदालनांना संपवणार्या संस्थेच्या विरोधात वातावरण तयार होत असल्याचे या बातमीने समोर आणले. ही बातमी तर आहेच. त्यासह ‘द एव्हरीथिंग वॉर’ या दोन वर्षांपूर्वीच्या पुस्तकानिमित्ताने ॲमेझॉनच्या वसाहतवादी प्रवृत्तीवरचा तपशील सांगणारा लेख. त्याचबरबरोबर गेल्या आठवड्यात अमेरिकेतील स्थानिक पुस्तक दुकानमालकांनी ॲमेझॉनच्या व्यवसाय पद्धतीबद्दल दिलेल्या माहितीची व्हिडीओ क्लिप.
https://tinyurl.com/nd7swzyp, https://tinyurl.com/2yu9etc6, https://tinyurl.com/4r7cwavy
द्विशतकी वाचनालयातील मुंबईकर
‘स्टेट लायब्ररी ऑफ न्यू साऊथ वेल्स’ या वाचनालयाला दोनशे वर्षे पूर्ण झाली. तर ऑस्ट्रेलियाच्या या ग्रंथालयाबाबत आपल्याला का कुतूहल, हा प्रश्न पहिल्या वाक्यातून पडू शकतो. तर त्याचे उत्तर द्विशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांनी एक ग्रंथ काढलाय, ‘द लायब्ररी दॅट मेड मी’ नावाचा. तर या वाचनालयाशी संबंधित तेथील सर्व लेखक-विचारवंत आणि अभ्यासकांना लिहिते केलेय.
मुंबईत जन्मलेल्या ‘रोॲना गोन्सालवीस’ सिडनेमधील विद्यापीठात सर्जनशील लेखन शिकवतात. मुंबईतील खासगी वाचनालयांपासून ते मोठ्या संस्थांमध्ये पुस्तक बदलण्यासाठीचा रेल्वेप्रवास अभिजात साहित्याच्या भारतातील वाचनापासून ते सिडनेमधील लायब्ररीपर्यंतचा वाचनप्रवास त्यांनी आपल्या निबंधात लिहिलाय. त्याचा संपादित अंशदेखील मोठाच आहे आणि तो इथे उपलब्ध आहे.
https://tinyurl.com/2tp2r528
