अमेरिकेतही वाचनाची बोंब आहे. तरीही ॲरिझोना विद्यापीठाचा अहवाल तिथला समुदाय आणि अमेरिकी वाचन गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने ताजा. पण आपल्या इथे नव्वदीच्या दशकापर्यंत हे होत होतेच की… उन्हाळ सुट्टीच्या दिवसांत मुलांच्या मनोरंजन पर्यायांत पुस्तकांचे वाचन वरच्या स्थानी होतेच. नव्वदीनंतर मनोरंजन साधने वाढत गेली. शिवाय बालसाहित्याची मुबलक उपलब्धता ओसरली. पालकांचे याबाबतचे दुर्लक्ष सातत्य वाढतच गेले. आता अनेक देश मुलांना मोबाइलपासून लांब ठेवण्याचे नवनवे कार्यक्रम आखत आहेत. वाचनाची महत्ता विसरलेल्यांपर्यंत हा दुवा पोहोचवाच.
https:// tinyurl. com/ ysmsmwre
