scorecardresearch

Premium

अन्वयार्थ : युक्रेनची नवी ‘आघाडी’..

क्रिमिया या रशियाव्याप्त युक्रेनी प्रांताच्या सागरी क्षेत्रात, विशेषत: सेवास्टोपोल बंदर परिसरात युक्रेनने अलीकडच्या काळात तिखट हल्ले आरंभले आहेत.

ukrain attack

क्रिमिया या रशियाव्याप्त युक्रेनी प्रांताच्या सागरी क्षेत्रात, विशेषत: सेवास्टोपोल बंदर परिसरात युक्रेनने अलीकडच्या काळात तिखट हल्ले आरंभले आहेत. सध्याच्या घडीला युक्रेनचे पाच प्रांत पूर्णत: वा बहुतांशत: रशियाच्या ताब्यात आहेत : क्रिमिया, डॉनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन, झापोरिझ्झिया. यांपैकी क्रिमिया प्रांतावर रशियाने २०१४ मध्येच लुटुपुटीच्या सार्वमताच्या आधारे अंमल लादला. लुहान्स्क आणि डॉनेत्स्क प्रांतांच्या काही भागांचा ताबा रशियाधार्जिण्या बंडखोरांनी त्यानंतरच्या काळात घेतला. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी याच दोन प्रांतांना रशियाशी जोडून घेण्याच्या प्रधान उद्दिष्टापायी रशियाने युक्रेनवर अनेक आघाडय़ांवरून हल्ला केला. पण क्रिमियाच्या वेळी दाखवलेली उदासीनता या वेळी मात्र युक्रेनने दाखवली नाही आणि रशियाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वामुळेच कीएव्ह हे राजधानीचे शहर, तसेच आणखी काही महत्त्वाची शहरे रशियाच्या हातात पडली नाहीत.

यात महत्त्वाचा भाग म्हणजे युक्रेनचा प्रतिकार जिवंत राहिला. या प्रतिकाराला प्रतिहल्ल्यामध्ये परिवर्तित करण्याची झेलेन्स्की यांची महत्त्वाकांक्षा आहे. तिला आतापर्यंत मर्यादित यशच मिळू शकले. रशियाच्या जोखडातून क्रिमियासह युक्रेन मुक्त करण्याची ही योजना दीर्घ काळ सुरू राहील अशीच चिन्हे आहेत. परंतु असे असतानाही युक्रेनचे प्रतिहल्ले थांबलेले नाहीत आणि रशियाच्या काळय़ा समुद्रातील आरमाराच्या मुख्यालयावरील – सेवास्टोपोल – २३ सप्टेंबर रोजीचा हल्ला युक्रेनची प्रहारक्षमता तसेच हिमतीचा निदर्शक आहे. या हल्ल्यामध्ये रशियन नौदलाचे अनेक अधिकारी आणि काळय़ा समुद्रातील रशियन आरमारप्रमुखाचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. आरमारप्रमुखाच्या मृत्यूविषयी दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र अशा प्रकारे रशियाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील तळावर हल्ला करून युक्रेनने इरादे दाखवून दिले आहेत.

Is Ukraines Counteroffensive Succeeding
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?
after flood queues of vehicles at servicing centers
उपराजधानीतील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये अचानक वाहनांच्या रांगा..!!
samudrayaan matsya 6000
चांद्रयाननंतर आता समुद्रयान मोहीम; समुद्राचा तळ गाठणारा ‘मत्स्य ६०००’ प्रकल्प काय आहे?
African Union G 20
विश्लेषण : आफ्रिकी महासंघाच्या जी-२० समूहातील समावेशाचे महत्त्व काय?

इतर कोणत्याही प्रांतापेक्षा क्रिमिया हा युक्रेनचा प्रांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरतो. या प्रांताला रशियाशी जोडणारा केर्श पूल हा अत्यंत मोक्याचा आहे. या पुलालाही काही महिन्यांपूर्वी युक्रेनने लक्ष्य केले होते. झापोरिझ्झिया आणि डॉनेत्स्क या दोन प्रांतांमध्ये युक्रेनने दोन प्रतिहल्ला आघाडय़ा उघडल्या आहेत. पण त्यांचा रेटा रशियन बचाव मोडून काढण्याइतपत शक्तिशाली ठरू शकलेला नाही. परंतु क्रिमियामध्ये रशियन युद्धसामग्री आणि प्रतिष्ठेचे अतोनात नुकसान करणारे काही हल्ले युक्रेनने केले आहेत. काळय़ा समुद्रात गतवर्षी मोस्कवा ही रशियन युद्धनौका युक्रेनच्या तुलनेने प्राथमिक क्षेपणास्त्राने बुडवली. तेव्हापासून किमान नौदल आघाडीवर तरी आणखी अप्रतिष्ठा होऊ नये, याची खबरदारी रशिया घेत होता. पण युक्रेनने आता नव्याने रशियन आरमाराला लक्ष्य करून एक प्रकारे नवी आघाडीच उघडली आहे. काळय़ा समुद्रातील जहाजवाहतुकीसंबंधी करारातून रशियाने माघार घेतल्यामुळे हा संपूर्ण टापू धान्य, खनिजे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारासाठी असुरक्षित बनला. त्यामुळे युक्रेनने पर्यायी जलमार्गाचा वापर सुरू केल्यामुळे आफ्रिका-आशियातील देशाला युक्रेनकडून होणारी मालवाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर क्रिमियातील रशियन नौदलावर केलेले हल्ले युक्रेनचा आत्मविश्वास वाढवणारे ठरतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anvyartha in the maritime zone of the russian occupied ukrainian province of crimea attacks started ysh

First published on: 28-09-2023 at 04:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×