निर्भया पथकासाठी घेतलेली वाहने एकनाथ शिंदे सरकारमधील आमदारांना तसेच त्यांच्या गटात सहभागी झालेल्या खासदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यासाठी वापरण्यात आली. हे धक्कादायक वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केल्यापासून राज्यभर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महिलांना सर्व पातळ्यांवर गृहीत धरले जाते, हा आक्षेप या वृत्तामधून खरे तर सिद्धच होतो. घरात तसेच घराबाहेर जबाबदाऱ्यांचे वाटप, वेतनातील असमानता, संपत्तीतील वाटा या पातळ्यांवर हक्कांसाठी झगडणाऱ्या महिलांना सुरक्षेच्या पातळीवरबी बेदखल करणे यापेक्षा दुसरा मानभावीपणा नाही. 

निर्भया हा शब्दच २०१२ पासून भारतात संवेदनशील ठरला आहे. अत्यंत निर्घृण बलात्काराला बळी पडलेल्या दिल्लीतील तरुणीच्या मृत्यूने बलात्कार, महिला सुरक्षा या सगळ्याबाबतची जागरूकता आणि व्याप्ती वाढवली. त्यातून कायदेबदल झाले. निर्भया निधी, निर्भया पथके  हा त्याचाच भाग. या निधीमधून पोलिसांच्या निर्भया पथकासाठी यावर्षी जून २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी २२० बोलेरो, ३५ एर्टिगा, ३१३ पल्सर बाइक आणि २०० अ‍ॅक्टिव्हा दुचाकी  ३० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या गाडय़ा घेण्यात आल्या. ही सर्व वाहने जुलै २२ पर्यंत मुंबईतील ९५ पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आली.

economic offences wing gives clean chit to ajit pawar in maharashtra state cooperative bank
अन्वयार्थ : घोटाळा झालाच नाही.. मग दोषी कोण? 
private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
article 18 in constitution of india abolition of titles zws
संविधानभान : ना गादी ना संस्थानिक; येथे सारेच नागरिक!
AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून

महिलांना समाजात वावरताना सुरक्षित वाटावे, यासाठी कायदा सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी. त्यासाठी गस्त घालणे, आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी तातडीने जाऊ शकणे यासाठी या गाडय़ा ही पोलिसांची गरज आहे.  त्यांच्या निर्भया पथकाच्या कामासाठी वापरायच्या गाडय़ा नव्या सरकारमधील आमदारांना वाय सुरक्षा देण्यासाठी कशा काय वापरल्या जाऊ शकतात? या गाडय़ा आमदारांना दिल्या त्याच काळात एखादी दुर्घटना घडली असती आणि मदतीसाठी पोलीस तिथे वेळेत पोहोचू शकले नसते तर ती जबाबदारी कोण घेणार होते? भलेही त्या काळात काही घडले नसेल, पण महिलांच्या सुरक्षेसाठी निर्माण करण्यात आलेली एखादी व्यवस्था परस्पर कुणासाठी तरी का म्हणून देऊन टाकायची? असे गृहीत धरणे पुरुषांसाठीच्या एखाद्या व्यवस्थेसाठी केले गेले असते का? पुरुषप्रधानता ती हीच नाही का? सत्ता  नेहमी पुरुषप्रधान असते, असे म्हटले जाते, ते  याचसाठी की ती मानसिकता केवळ आपल्या हितसंबंधांचा आणि हितसंबंधियांचा विचार करते. तुलनेत दुबळ्या आणि आवाज उठवू न शकणाऱ्यांच्या हक्काच्या गोष्टी बिनदिक्कतपणे हव्या तेव्हा काढून घेतल्या जातात. त्यामुळेच मग सामान्य महिलांपेक्षा आपल्या गोटामधल्या आमदार -खासदारांचा जीव जास्त महत्त्वाचा ठरतो. 

माहेरच्या संपत्तीत बहिणीचा हक्काचा वाटा द्यावा लागू नये म्हणून जसे तिला ‘त्यापेक्षा वर्षांतून एकदा भेटायला येण्यासाठी माहेर टिकायला हवे आहे, की नको,’ अशी भावनिक मात्रा दिली जाते, त्यापेक्षाही अधिक साळसूदपणा या सगळ्या प्रकारात आहे. कारण सुरक्षा व्यवस्थेतून बेदखल करणे हे संपत्तीतून बेदखल करण्यापेक्षाही वाईट. कोणत्याही समाजात महिलांना कसे वागवले जाते, यावरून त्या समाजाची संस्कृती समजत असते. सतत शिवाजी महाराजांचा जयजयकार करायचा आणि वागायचे असे, ही आपली संस्कृती आहे का?