सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत अनुक्रमे ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’ आणि ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ हे दोन कथाखंड बाजारात दाखल होतात. राम कोलारकरांच्या ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’ या पुस्तकांची प्रेरणा या नियमित प्रसिद्ध होणार्‍या वार्षिक ग्रंथांत होती. पुढे कोलारकरांसारखे काम कुणीच करावयास धजले नसल्याने तो उपक्रम दोन दशकांत बंद पडला. पण शतकी नियमितता असलेले अमेरिकेतील कथाखंड अजूनही गंभीरपणे निघत आहेत. २९ सप्टेंबर रोजी ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’चा खंड प्रकाशित होईल. त्या संग्रहाचे संपादन लेखक टॉमी ऑरेंज करतायत. नेटिव्ह अमेरिकी असलेले ऑरेंज यांचे कथाप्रेम पुस्तक दुकानात काम करताना सुरू झाले. त्यानंतर वाचनाच्या नादातून त्यांच्या समूदायाचा परिसर आणि माणसे पुस्तकांत आली. त्यांनी संपादन केलेल्या खंडाची प्रस्तावना, ज्यात कथावाचनाचे आणि लिखाणाचे आत्मकथन बर्‍यापैकी उतरले आहे, ती संपूर्ण वाचता येईल. त्याशिवाय या संग्रहात त्यांनी निवडलेल्या काही कथाही येथे मोफत वाचता येतील.

*  https://tinyurl.com/25k4vapb  *   https://tiyurl.com/3 k9yrhvm

*   https://tinyurl.com/yycjdfbw    *  https://tiyurl.com/eh8czfkt

पुस्तकविक्रीची मखलाशी…

हा लेख गेल्या आठवड्यातील ‘गार्डियन’ वृत्तपत्राच्या आठवडी ग्रंथ पुरवणीमधील चर्चेचा मुख्य मुद्दा. तो ब्रिटनमधील ग्रंथव्यवहारावर प्रामुख्याने लक्ष वेधत असला, तरी जगभरातील विक्री व्यवहाराशी पडताळून पाहता येण्यासारखा. समाजातील तसेच माध्यमांतील प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या प्रचाराचा, पुस्तकाच्या मुखपृष्ठांचा आणि एकूणच दुकानांच्या प्रयत्नांचा एकूण परिणाम कसा होतो, त्याविषयी रोचक माहिती यातून होते. जपानी खूपविक्या पुस्तकांचे विक्रीमूल्य मुखपृष्ठांवर असलेल्या चित्रांत मांजर काढल्याने कसे वाढते, चित्रकार ते संपादक आणि हौशी किंवा पुस्तकांच्या दुकानांची साखळी असलेल्या संस्था विकत घेऊन ग्रंथ वाचणार्‍यांना आकर्षित कसे करतात, त्यांचे अर्थकारण कसे चालते, याचा तपशील यात आला आहे.

https://tinyurl.com/e6 hx2vrx