अलाबामामधील कृष्णवंशीयांचे आधिक्य असलेल्या शहरगावात साठच्या दशकात वाचनाची आवड रुजविणार्या पुस्तकगाडीच्या योगदानाबद्दल लिहिलेला हा निबंध. आपल्याकडे गावोगाव जशा अलीकडे पुस्तकपेट्या पोहोचविल्या जातात, त्यातलाच हा प्रकार. कृष्णवंशीय समुदायात वाढलेल्या ब्रेण्डा विल्सन या लेखिकेने काही बालपुस्तकांचीही माहिती यानिमित्ताने करून दिली आहे. त्यासाठीच या लेखाचे महत्त्व.
https://tinyurl.com/4ujtnj36
मध्यरात्रीचे वाचक…
जपानच्या ग्रंथदालनांमध्ये मध्यरात्री पुस्तक खरेदीसाठी झुंबड उडण्याचा नवा प्रवाह हारुकी मुराकामी या लेखकाने गेल्या दीड दशकात तयार केला. ‘द टेल ऑफ काहो’ ही ताजी कादंबरी शुक्रवारी प्रकाशित झाली. पहिली प्रत निव्वळ अडीच लाख इतक्या संख्येची. पण त्यातही ती आपल्याला प्रथम मिळावी यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून रांगा लागल्या. वर्षअखेरपर्यंत ही कादंबरी इंग्रजीत अनुवाद होऊन जगासाठी निर्यात होईल. तूर्त असोसिएट प्रेसने जपानमधील मध्यरात्रीच्या वाचकांवर केलेले स-छायाचित्र वृत्तांकन येथे वाचता येईल.
डेव एगर्सची मुलाखत…
नव्या पुुस्तकाच्या निमित्ताने अमेरिकी लेखक डेव एगर्स मुलाखती देत सुटलाय. ही मुलाखत ‘गार्डियन’च्या साहित्य विभागात गेल्या आठवड्यात आलेली. एगर्स टीव्हीवरच्या मालिका पाहत नाही. लोकप्रिय असलेले फेसबुक नामक अकाऊंटही वापरत नाही. बोट भाड्याने घेऊन तिथे ‘मोबाइल कनेक्टिव्हिटी’ टाळून लिहितो. हे सगळे तो का करतो? त्याची कंपनी दोन मासिके चालविते आणि लहान मुलांना लेखन-वाचनाची गोडी लागावी यासाठी विनानफा तत्त्वावर झटते. त्यांचा खर्च कसा निघतो आणि त्यांचे नियोजन कसे होते; याविषयी अधिक खोलात जाणारे प्रश्न यांत आलेत. एआयच्या युगात मानवी कलांचा र्हास होईल की काय, ही भीती त्याने फेटाळून लावली. कुठल्याही काळात फक्त मानवच कला घडवू शकतो, यावर तो ठाम आहे. या मुलाखतीसह १६ वर्षांपूर्वी डेव एगर्सच्या चाहतीने कथेच्या अंगाने लिहिलेला लेख. डेव एगर्सच्या लोकप्रियतेची झलक दाखविणारा.
https://tinyurl.com/bdwe2yz5
https://tinyurl.com/2bbbfatn
