आफ्रिकेतील देशांसाठीचे बुकर ही ‘केन’ पारितोषिकाची गेल्या पंचवीस वर्षांतील ओळख. यातील बरेचसे विजेते आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतात, म्हणून त्यांचे महत्त्व. यंदाच्या पारितोषिकासाठी कथांची लघुयादी नुकतीच जाहीर झाली. केनिया, कॅमेरून, नायजेरिया, इजिप्त आणि झिम्बाब्वे या देशांतील पाच नव्या लेखकांच्या कथा स्पर्धेत आहेत. केन पारितोषिकाच्या संकेतस्थळावर त्या पूर्ण स्वरूपात वाचता येतील.
https://tinyurl.com/3de7xb2s
‘करेक्शन्स’ची पंचवीस वर्षे…
अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी हल्ला झाला, त्याच्या बरोबर आदल्या आठवड्यात जोनाथन फ्रॅन्झनची ‘करेक्शन्स’ ही महाकादंबरी प्रकाशित झाली. साडेपाचशे पानांहून अधिक मोठी अमेरिकी कुटुंबाची कहाणी. त्याआधी म्हणजे हार्पर्स मासिकाच्या (एप्रिल १९९६) अंकामध्ये आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या आक्रमणकाळात कादंबरी वाचनाची चिकाटी किती उरेल या विषयावरचा त्याचा दीर्घ निबंधही गाजलेला.
आता तंत्रशरणावस्थेत गेलेल्या समाजाची कादंबरी वाचनाची बोंब आणखी वाढत चाललीय. अन् गेली तीस वर्षे काही वर्षांच्या अंतराने तो निबंध वेगवेगळ्या कारणांनी चर्चिला जातोय. पण इथे मुद्दा ‘करेक्शन्स’चा. या कादंबरीच्या पंचविसाव्या वर्षाची विशेष आवृत्ती या आठवड्यात बाजारात दाखल झाली. त्यानिमित्ताने फ्रॅन्झनच्या या पुस्तकाची चर्चा, लेख असा बराच ऐवज ब्रिटन आणि अमेरिकी माध्यमांमध्ये येतोय. (पुस्तकाच्या पहिल्या परिच्छेदावरदेखील विशेष लेख लिहिले गेलेत.) ‘ऑब्झर्व्हर’मधील खास लेख या दुव्यावरून वाचता येईल. त्याशिवाय या वर्षी सुरुवातीला न्यू यॉर्कर साप्ताहिकात आलेल्या नव्या कथेच्या संदर्भातील मुलाखत. (त्या कथेचा दुवा मुलाखतीमध्ये दिलाय.)
https://tinyurl.com/3 cfhks9u
https://tiyurl.com/3vwyj8ah
