‘पुणे आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव’ (पीआयएलएफ) २ ते ४ डिसेंबरदरम्यान होणार असून पहिले दोन दिवस यशदामध्ये तर तिसऱ्या दिवशी पीआयएलएफच्या फेसबुक पानावर विविध सत्रे होतील. यंदा या ‘लिटफेस्ट’चे दहावे वर्ष. त्यामुळे उद्घाटन समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आणि ‘इन्फोसिस’च्या अध्यक्ष व लेखिका सुधा मूर्ती यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवातील ८०हून अधिक सत्रांत १३०हून अधिक वक्ते सहभागी होणार आहेतच, पण तरुण आणि विद्यार्थी यांना आकर्षून घेण्यासाठी हा महोत्सव यंदाही प्रयत्न करील.

 त्या दृष्टीने ‘मानसिक क्षमता आणि सक्षमीकरण’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून या विषयावर काही सत्रे होणार आहेत. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे एक ‘मिस्ट्री रूम’ तयार करण्यात येणार आहे. या रूममध्ये जाऊन एखाद्या गुप्तहेराप्रमाणे विविध कोडी सोडविण्याची मजा लुटता येईल. ३ डिसेंबरला ‘द ट्रेजर आयलंड’ या संकल्पनेअंतर्गत लहान मुलांसाठी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठ वर्षे आणि त्यापुढील वयोगटांतील मुले यात सहभागी होऊ शकतील. यात पुस्तकाचे जाहीर वाचन, कथाकथन आणि विविध कार्यशाळा असे कार्यक्रम होणार असून त्यात बालसाहित्यकार सहभागी होतील. याव्यतिरिक्त इतिहास, मिथके, ब्रँडिंग, डिजिटल साक्षरता, कलाकारांचे स्वातंत्र्य, प्रकाशन व्यवसायाची सद्य:स्थिती आणि भविष्य, बदलत्या विश्वातील शारीरिक व मानसिक आरोग्य, महिला सक्षमीकरणाचा प्रवास अशा विविध विषयांवरील मुलाखती आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

या साहित्य महोत्सवात अभिनेते नसिरुद्दीन शाह, लेखक अँथनी हॉरोविट्झ, अर्थविषयक पत्रकार ब्रेट स्कॉट, ‘अगाथा ख्रिस्ती लिमिटेड’चे अध्यक्ष मॅथ्यू प्रिचार्ड, लेखक स्टिफन अल्टर, लेखक डॉ. विक्रम संपत, अभिनेत्री दीप्ती नवल, लेखिका अश्विन सांघवी, अभिनेत्री आणि लेखिका सुष्मिता मुखर्जी, ‘फोब्र्ज मार्शल’चे सहअध्यक्ष नौशाद फोब्र्ज, ‘प्राज इंडस्ट्रीज’चे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी, कलाइतिहासकार डॉ. अलका पांडे, लेखक तुहिन सिन्हा, ब्रँडिंग आणि जाहिराततज्ज्ञ अंबी परमेश्वरन, बाइकर आणि अनेक प्रवासवर्णनांचे लेखक केतन जोशी, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यासह अन्य अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.  २ डिसेंबरला दुपारी १२.०५ ते १२.४५ दरम्यान या महोत्सवाचे उद्घाटन होईल. महोत्सवात सहभागी होण्यासाठी- प्रवेश विनामूल्य आहे. पीआयएलएफच्या (स्र््र’ऋ.्रल्ल) संकेतस्थळावर नोंदणी सुरू झाली आहे आणि महोत्सवाचे सविस्तर वेळापत्रकही याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे.