यापैकी एक आत्मकथा जुनी.. १११ वर्षांपूर्वीची! दुसरी अगदी हल्लीची. पहिली आत्मकथा आहे ती डोसेबाई कावसजी जस्सावाला यांची, १९९१ साली प्रकाशित झालेली. या डोसेबाई (नाव आज विचित्र वाटेल, पण त्या काळात रस्तोरस्ती डोसे मिळत नसत!) म्हणजे भायखळय़ाला ‘खडा पारशी’ म्हणून जो पुतळा आहे, त्या करसेटजी माणेकजीं श्रॉफ यांची नात. तिचे लग्नानंतरचे आडनाव जस्सावाला. या दानशूर करसेटजींचा पुतळा १५० वर्षांपूर्वी उभारला गेला होता. तर, शतकभरापूर्वी घडून गेलेल्या आपल्या आयुष्यातले प्रसंग सांगण्याची सुरुवात १८६० पासून डोसेबाई करतात. त्या वर्षी, या मुलीला इंग्रजी शाळेत- हायस्कुलात- जायचे होते. शिक्षणात ती उत्तम आहे, असा मास्तरांचा निर्वाळा होता. पण भावांचा आणि काकाचा विरोध! मात्र त्याच वर्षी ‘दिल्ली दरबार’चे निमंत्रण आल्याने हे सारे कुटुंब दिल्लीस गेले, तेव्हा एका राजेसाहेबांनी या कुटुंबाशी बातचीत करताना ‘शिकू दे की मुलीला..’ असा सल्ला दिला. मग बराच खल झाला. राजा राममोहन राय यांच्या प्रेरणेने बंगालात तर स्त्रीशिक्षण वाढले आहेच आणि तिकडे मराठी मुलीही शिकत आहेत. मुंबईत आता मुलींचे हायस्कूलही सुरू झाले म्हणतात.. मग हिनेच का शिकू नये, असा विचार झाला आणि डोसेबाई हायस्कुलात गेल्या. या आत्मचरित्रात पुढे तत्कालीन पारसी स्त्रीजीवन, लग्न आदी प्रसंगीच्या प्रथा, ब्रिटिशांशी घसट वाढल्याने त्यांत पडलेला फरक आदींचे अगदी स्वानुभवातले वर्णन आले आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे समाजाच्या इतिहासाचा दस्तावेज तर आहेच, पण आपण आज काय लिहिले तर पुढल्या काळात तो एक सामाजिक ऐवज ठरू शकतो, याचेही आडाखे हे पुस्तक वाचल्यावर बांधता येतात.

डोसेबाई जस्सावाला यांचे ‘द स्टोरी ऑफ माय लाइफ’ हे पुस्तक, त्याच नावाने आता ‘स्पीकिंग टायगर’ या प्रकाशनसंस्थेतर्फे प्रकाशित होते आहे. छायाचित्रांची जोड मिळालेल्या या नव्या आवृत्तीची किंमत ८०० रुपयांच्या आसपास आहे, पण ‘आर्काइव्ह.ऑर्ग’ या संकेतस्थळावर हेच पुस्तक (१०० वर्षांपॅर्वीचे असल्याने) वाचता येऊ शकते.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

दुसरी आत्मकथा अद्याप प्रकाशित झालेली नाही. त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन करणे अशक्य. मात्र या आत्मकथेची लेखिका आजवर परिचित आहे ती नव्या अनुभवांनिशी ठाशीव लिखाण करणारी म्हणून. स्त्रीमुक्तीसाठी चळवळ न करावी लागता व्यक्ती म्हणून लहानपणापासून मोकळेपणा मिळालेली ही लेखिका. पण तिचे लहानपण डिस्लेक्शियाने ग्रासलेले होते आणि तारुण्याची चाहूल लागली तोवर, आपल्याला समिलगी आकर्षण वाटते आहे हेही तिला जाणवू लागले. या दोहोंकडे ‘विकृती’ म्हणून पाहणारा समाज तिने पाहिला. त्या अनुभवांवर आधारलेली ही आत्मकथा- ‘होमलेस : ग्रोइंग लेस्बियन अ‍ॅण्ड डिस्लेक्सिक इन इंडिया’ (लेखिका : के.वैशाली) ‘सायमन अ‍ॅण्ड शूस्टर’ व ‘योडा प्रेस’ यांच्यातर्फे येत्या महिला दिनी प्रकाशित होते आहे.