scorecardresearch

Premium

चिंतनधारा: चमत्कार तेथे नमस्कार

‘चमत्कार तेथे नमस्कार, तेणे जादूगिरीस चढे पूर।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत चमत्काराबाबत परखड भाष्य केले.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

‘चमत्कार तेथे नमस्कार, तेणे जादूगिरीस चढे पूर।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत चमत्काराबाबत परखड भाष्य केले. महाराज म्हणतात, ‘‘या देशातील अनेक सिद्ध लोकांनी आणि अनेक चमत्कार करून दाखवणाऱ्या ‘सिद्धप्रसन्न’ लोकांनी या देशावर काय उपकार करून ठेवला, ही गोष्ट समजणे प्रत्येकाच्या विचारधारणेवर अवलंबून आहे. बुवांनी मेलेली माणसे जिवंत केली असेही ऐकिवात आहे. परंतु त्यांची अफाट शक्ती एखादाच माणूस जिवंत करण्याइतकी कशी आकुंचित राहू शकली व त्यांच्या घरातील माणसांनाही कसे त्यांनी कायमचे ठेवलेले नाही, याबद्दल मनात नेहमी शंका असते. कोणी म्हणतील की, जिवंत झालेल्या माणसाचे भाग्य होते. मग मेलेला माणूस आपल्या भाग्याने जिवंत झाला असेल तर? ‘कितीही विषारी साप आमच्यापुढे नम्र होऊ शकतो’, असे दावे करणाऱ्यांचाही मृत्यू सर्पदंशानेच झाल्याचीही उदाहरणे आहेत. तेव्हा हा चमत्कार नसून एक विशिष्ट कला आहे अथवा विद्या आहे, असे का म्हणू नये?

अशा अनेक लोकांकडून झालेल्या विभिन्न चमत्कारांनी या देशाच्या मानवतेचे किती उत्थान झाले हे विशेषत: माझ्या दृष्टीस येत नाही. परंतु ज्यांनी मानवधारणेच्या मार्गाने लोकांची सेवा केली, मनुष्य होण्याचे सक्रिय धडे दिले आणि त्यांच्यामुळे माणसे माणुसकीच्या शिखरावर पोहोचली, त्यांच्या कार्यास मी चमत्कार समजतो. गांजलेल्या जीवांना पुरुषार्थी करून, उद्योगरत करून मनुष्यपणाचे धडे शिकवावेत, जनावरांसारख्या मूक जिवांनाही आपल्या सहज वाणीने वेदाचे उच्चार व आचार कळवावेत; गाढवासारख्या जनावरांच्या तोंडात पाणी घालून ईश्वराची सर्वव्यापकता समाजाला शिकवावी; आपल्या घरी आजच्या गरजेपेक्षा अधिक नको म्हणून संग्रही असलेले धान्य व दागिने लोकांना वाटून द्यावेत; असे वागून आपल्या मनुष्यपणाचे आदर्श शिकविणारे ते लोक महान चमत्कार करणारे आहेत, असे मी मानतो.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: त्यासि म्हणावा अवतार!
Deputy Chief Minister Ajit Pawar , Ajit Pawar , Pusesavali , karad ,
दंगलीसारख्या घटना कुणालाही न परवडणाऱ्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुसेसावळीला अचानक भेट
unique tribute to Chhatrapati Shivaji Maharaj
पिंपरी- चिंचवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना, दीड हजार ढोल ताशा वादकांनी एकत्र केले वादन
rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : श्रद्धेला वळण लावण्याची जबाबदारी

‘‘एखाद्याची भविष्यवाणी आपल्याकरिता कितीही मोठी असली वा ती चुकलीही असली तरी तिची माझ्यापुढे कवडीइतकीही किंमत नाही. त्यांच्या जीवनाने किती लोक माणुसकीला लागले आहेत, स्वावलंबी झाले आहेत, हे लक्षात घेऊन, हा प्रयत्नशीलपणा ज्या कोणातही असेल त्याला मी चमत्कार मानतो. जगाला सुखवणारी, माणसाला प्रयत्नशील करणारी व त्याच्याच प्रयत्नाने त्याला देवता बनविणारी अशी जेवढी फळे देणारी फुले त्यांच्या मुखातून निघत असतील, ती सर्व जीवसृष्टीत अमोल आहेत असे मी मानतो. लहान लोकांच्या, मागासलेल्या लोकांच्या व श्रीमंतांच्या दारात उभे राहून त्यांच्या खऱ्या कर्तव्याची निर्भयपणे जाणीव करून देणारे व त्यांच्या वर्तनाने जगाला समाधान मिळेल असे योग्य विचार समजावून देणारे, मग ते चिंध्या घातलेले मडके वापरणारे, खराटे घेतलेले, विद्रूप स्वरूपाचे जरी कोणी असले तरी ते या युगाचे महान चमत्कारी पुरुष आहेत, असे मी मानत आलो आहे. चमत्कारावर विश्वास ठेवल्याने अनेक लोकांनी अनेक लोकांना फसविलेले मी पाहिले आहे व ऐकलेलेही आहे.

राजेश बोबडे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chintandhara human miracle rashtrasant tukdoji maharaj amy

First published on: 03-10-2023 at 03:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×