राजेश बोबडे

बुद्धिविकास राष्ट्रीयदृष्टय़ा संपन्नच हवा असा आग्रह धरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘सर्वच गोष्टींचा विकास करणारे ऋषी आपल्या सर्व आवश्यक कार्य व कर्तव्यांना विसरत गेल्यामुळे त्यांना आपल्या राष्ट्राला धड सांभाळून ठेवता आले नाही. हजारो वर्षांपासूनची प्रत्येक घातक रूढी नाहीशी करण्यासाठी महात्मा गांधींनी आणि त्यांच्या आधीही अनेक थोर पुरुषांनी प्रयत्न केले. मात्र कार्य मोठे असल्यामुळे त्यांच्याकडून ते पूर्ण होऊ शकले नाही व आजही आम्ही ते पूर्ण रूपात पाहू शकत नाही. त्या कार्याची पूर्णत: हीच मानवतेची पूर्णता आहे. ते कार्य आजच्या सुशिक्षित व चारित्र्यवान तरुणांनी करावे आणि आपल्या देशाची सेवा करून कृतकृत्य व्हावे असे मला मनापासून वाटते.’’

sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य

‘‘वास्तविक खरे सुशिक्षित त्यांनाच म्हणतात ज्यांना आपल्या देशाच्या सुधारणेची दृष्टी प्राप्त झाली आहे. व्यक्तित्व भावनेने सुधारलेले तरुण कितीही सुंदर, विचारी, कलावंत व जगाचा उपभोग घेणारे असले तरी त्यांना या देशाच्या मैदानात कवडीइतकीही किंमत जनता देत नाही, हे विसरून चालणार नाही. तेव्हा जर देशाला जगाच्या बाजारात काही भाव यावा असे वाटत असेल तर, या देशाचे तरुण, जे शाळा- महाविद्यालयांतून बाहेर पडतात किंवा आश्रमीय शिक्षण घेतात त्यांना राष्ट्रीयतेची दृष्टी असणे गरजेचे आहे. ती दृष्टी व शिस्त त्यांच्यात येण्याकरिता अध्यापकांनीही तसे वागले पाहिजे.’’

तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘पूर्वीच्या काळात ढिलाई झाल्यामुळेच आजची अवस्था ओढवली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावरही भोगलालसेने ती तशीच ठेवली जाणार असेल, तर आमच्यावर राज्य करणारे दुसरेच बलवान येतील व तेच आपला धर्म व राज्य लादतील, हे निश्चित. हे भावी दु:खाचे दृश्य जर जाणत्या लोकांना पाहवत नसेल तर आजपासून देशाच्या त्या जाणत्या तरुणांनी आवश्यक गोष्टींच्या प्रचाराचा चंग बांधला पाहिजे. अर्थात देशातील लोकांत, आपल्या म्हणण्यावर सर्वस्व वाहून देण्याची प्रवृत्ती निर्माण केली पाहिजे आणि त्याचबरोबर ‘नेता कोण’ हे त्यांना आपल्या बुद्धीने ओळखता येईल याची दक्षता घेतली पाहिजे. माणूस ही माझी जात आहे. देशात सुख व सुसंस्कृतपणा वाढवून व्यवहार नैतिकतेने उन्नत करणे हा माझा धर्म आहे! मी कुणाशी लढणार? जे माझ्या न्याय्य स्वातंत्र्याच्या आड येऊन देशद्रोहीपणा करतील तेच माझे शत्रू! याची जाणीव माझ्या देशातील प्रत्येक जबाबदार घटकाला प्राप्त होवो,’’ अशी प्रार्थना करून महाराज म्हणतात,

विद्वनांनो! व्यक्तिसुखास्तव, ही विद्वत्ता नाही तुम्हा।

असतील जे जे अनपढ कोणी, शिकवुनि त्या विद्वान करा।।