राजेश बोबडे

भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात आणून एक कोटी तासांचा समयदान यज्ञ केला. श्रमदानातून गावा गावात विकासकार्य केले. धर्म स्वीकारून त्याप्रमाणे आचरणच केले नाही तर कोणत्याही धर्माची दीक्षा घेतली तरी काहीच फरक पडणार नाही. प्रत्येक धर्मात चांगल्या गोष्टी आहे त्यांचे आचरण करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. भगवान बुद्धांचा आदर्श सांगताना महाराज म्हणतात, ‘‘भगवान बुद्धाचे जीवन शिकल्यासवरल्या माणसास माहीत नसेल तर त्याची गणना लहान मुलातच करणे इष्ट होईल. आम्ही आपले शिक्षण अंधपणे इंद्रियभोगप्रवृत्ति वाढविण्यासाठीच घेत असू, तर आमच्या मानव वृत्तीचा विकास होण्याचे कार्य खंडित झाले आहे असेच म्हणावे लागेल. शहाणपण आल्यावरही काही न समजता सवरता शिकणारे लोक ग्रंथांचे गुलाम होत असतील तर तो मी अविकसित जग तयार करण्याचा प्रकार मानतो. आमच्या बुद्धीने कुठे गोते खाऊ नयेत म्हणून चाल चलन, राहणीचे व अनुभवाचे भांडार स्वतंत्र बुद्धीने वाढविण्यासाठी हे शिक्षण, हे ग्रंथ, हे आचार-विचार, हे सत्संग वगैरे करावयाचे असतात. मी अगदी याच दृष्टिकोनातून भगवान बुद्धाचे जीवन पारखतो. बुद्धासारखे जे आले त्यांनी त्याचा विचार केला आणि त्याबाबत ज्ञान मिळविले. लहान वयात बुद्ध घरातून बाहेर पडले, तेव्हापासून त्यांनी आपले हृदय उघडून, जगाचे लौकिक नाते तोडून अनुभवाचा संन्यास चढवला अन् वाढवला. छोटासा प्रसंग; मृतदेह पाहिला आणि जगाच्या भ्रामकतेचा बोध घेतला! गरिबी पाहिली आणि श्रीमंतीवर लाथ मारली! जातीयता पाहून हरिजन स्त्रीच्या हातचे पाणी पिण्यासाठी ओंजळी पसरली! समाजातील मागासलेपणा पाहून आपले हजारो सहकारी त्यांनी तयार केले आणि जनतेत मनुष्य-बुद्धीचा प्रचार केला. रिकामे, बेकार लोक आयते खात होते, काम करत नव्हते. काही लोक अशा वेळी उपाशी मरत होते. अशा वेळी ‘‘हीनदीनांची सेवा हाच आमचा परमेश्वर’’ असे निर्भयपणे सांगून स्वत:ला नास्तिकदेखील म्हणवून घेण्याचे साहस त्यांनी केले. विश्वाशी नाते जोडण्यासाठी त्यांनी राजसत्तेला मंत्र दिला व दृश्य- अदृश्य रूपाने विश्वात्मक भावनेचा प्रचार केला.

What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
bacchu kadu reaction on mahayuti
प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात? बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
solapur live conche sell marathi news, live conch fraud marathi news
आर्थिक लाभासाठी २५ लाखांस जिवंत शंख खरेदी करणे पडले महागात, महाराजासह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

हे सर्व काही, आपल्या विचारधारेला स्वतंत्रपणे जगासमोर आणून वाढविण्याचे मोठय़ात मोठे साहस होय! त्यांनी हरिनामाला कमी महत्त्व दिले. मात्र कुणी कुणास भय घालू नये, कुणास कुणी कुमार्गाने नेऊ नये, हिंसेची कास धरू नये, या गोष्टीवर त्यांनी विशेष जोर दिला. मानवांच्या प्रगतीचे हे मार्ग त्यांनी प्रत्यक्ष आचरून जनतेला दाखवून दिले. हाच खरा बुद्धांचा आदर्श होय, असे सांगून महाराज आचरणावर भर देताना भजनात म्हणतात.

आचाराविण धर्म कशाचा? अवडंबर सगळे।

गरीब लुटोनी धन वेचावे, धर्म करोनी।।