भारतीयांना चेकॉव्ह या रशियन कथाकाराच्या कथा अगदी शतकाच्या सुरुवातीपासून अनुवादांतून सापडल्या. पण गतवर्षाच्या अखेरीस एक नवेच पुस्तक आले. चेकॉव्हच्या आरंभीच्या काळातील म्हणजेच १८८० ते ८२ या काळात लिहिलेल्या कथा-कादंबरिका-विनोदिका यांचे संकलन असलेले. टोपण नावाने वेगवेगळ्या नियतकालिकांत चेकॉव्हने लिहिलेल्या या लेखनाच्या इंग्रजी अनुवादाचे संपादन रोझमंड बार्टलेट आणि एलेना मायकोलोव्हास्का यांनी केले आहे. या पुस्तकाविषयी. चेकॉव्हच्या आधीच्या लिखाणाविषयी अधिक तपशिलात या दोन लेखांतून वाचता येईल.
https:// tinyurl. com/ ywv2 rr5 h
https:// tinyurl. com/5 n6 vusaz
न्यू यॉर्कर नॉव्हेला…
पूर्वी म्हणजे दशकापर्यंत २० पानी कथा अथवा कादंबरिका ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाच्या मुद्रित आवृत्तीत अनेकदा येत असे. आता मात्र कथा पाच-ते दहा पानांत आटोपतात. २० पानी लेखाची मेजवानी क्वचित प्रसंगी सापडते. वर्षाच्या अगदीच शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन विभागात ‘न्यू यॉर्कर’ने कादंबरिका दिली आहे, ती मुंबईच्या कनक कपूर या लेखिकेची आणि दुबईमधील दोन भारतीय कामगारांवर आधारलेली. मुंबई आणि दुबईमध्ये बालपण काढलेल्या आणि अमेरिकी शिष्यवृत्तीवर सध्या स्टॅण्डफर्ड विद्यापीठात शिकत असलेल्या कनक कपूर यांची ही कादंबरिका येथून उतरवून पूर्णपणे वाचता येईल.
https:// tinyurl. com/4 kmse5 at
भारतावरचा ग्रॅण्टा आणि…
गेल्या महिन्यात भारतकेंद्री असलेला तिसरा अंक ग्रॅॅण्टाने काढला. तीन दशकांत जगातील मोठी बाजारपेठ असलेल्या आपल्या देशावर गंभीरपणे तिसऱ्यांदा ‘लिटररी’ अंक काढताना २०१४ नंतरचा भारत हा मुद्दा त्यांनी ग्राह्य धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘टाइम’ साप्ताहिकाच्या अंकावर झळकणे आणि ग्रॅण्टाच्या मुखपृष्ठावर त्यांची छबी वापरली जाणे यात खूप मोठा फरक आहे. तूर्त हा मासिकाच्या तुलनेत अंमळ महागडा अंक मोठ्या प्रमाणावर उचलला गेला असला, तरी ज्यांना मजकुराच्या गुणवत्तेविषयी शंका आहे. त्यांच्यासाठी ग्रॅण्टाच्या संकेतस्थळावर विवेक शानबाग यांची कन्नडमधून अनुवादित झालेली दीर्घकथा येथे मोफत वाचता येईल. ग्रॅण्टाने या अंकातील आणखी काही भाग संकेतस्थळावर खुला ठेवला आहे.
https:// tinyurl. com/ ymcaek66
