जतीन देसाई
शाहबाज तासीर.. एका श्रीमंत घराण्यातील मुलगा. तासीर कुटुंब पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. २६ ऑगस्ट २०११ ला सकाळी मर्सिडीज कार चालवत तो ऑफिसला निघाला. काही मिनिटांत दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. ही बातमी पाकिस्तानला धक्का देणारी होती. त्या देशातील कोणतेही शहर सुरक्षित नाही, हे स्पष्ट करणारी ही घटना आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची होती. अवघ्या सहा- सात महिन्यांपूर्वी शाहबाजचे वडील (तेव्हा पंजाब प्रांताचे गव्हर्नर) सलमान तासीर यांची त्यांचेच सुरक्षा कर्मचारी मुमताज कादरी यांनी इस्लामाबाद येथील बाजारात हत्या केली होती. ईशिनदा खटल्यात आरोपी असलेल्या आशिया बीबी या ख्रिस्ती महिलेला तुरुंगातून सोडविण्याचा सलमान तासीर यांचा प्रयत्न होता.
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five terrible years in the custody of militants lost to the world ysh