महिलांसाठीच्या चित्रवाणी कार्यक्रमांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून अमेरिकी चित्रवाणी व्यवसायाचेच स्वरूप बदलण्याचे आणि राष्ट्रीय चर्चांच्या विषयांना वळण देण्याचे श्रेय ज्या निर्माता-निवेदक फिल डॉनाह्यूू यांना दिले जाते, ते गेल्या आठवड्यात- ८८व्या वर्षी निवर्तले. त्यांनी केवळ गृहिणींच्याच कार्यक्रमांना प्राधान्य दिले असे नाही, तर एड्ससारखी गंभीर समस्या ते सुरुवातीपासून मांडत राहिले. अमेरिका-इराक युद्धादरम्यान अमेरिकेच्या धोरणावर टीका करणाऱ्या काही मोजक्या पत्रकार-निवेदकांत त्यांचा समावेश होता. सत्तरीच्या दशकात गृहिणींना डोळ्यासमोर ठेवून, दिवसा दैनंदिन मालिका, गेम शो आणि घर चालवण्याची कौशल्ये यांसारख्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असे. त्याला छेद देत डॉनाह्यू यांनी आपल्या कार्यक्रमांत स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि लैंगिक संबंध, गर्भपात आणि वंशवाद यांसारख्या ‘वैचारिक’ चर्चांमध्ये महिलांना समाविष्ट केले.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरुन : खरेच करायचा आहे देशाचा विकास?

uma mani the coral woman of india
उमा मणी… गृहिणी ते कोरल वुमनचा कलात्मक प्रवास
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, रतन टाटांच्या निधनानंतर गौतम अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना
No action has been taken against unauthorized boards due to pressure of political leaders
पालिका आयुक्तांच्या आदेशाला कोणी दाखविली केराची टोपली
Nalasopara, girl was raped Nalasopara,
वसई : नालासोपार्‍यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, अश्लील छायाचित्राआधारे उकळली २५ हजारांची खंडणी
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Loksatta explained Why did the controversy rise over the same policy of Barty Sarathi Mahajyoti
विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?

डॉनाह्यूू यांच्या कारकीर्दीची सुरुवात नभोवाणीतून झाली. चित्रवाणी माध्यमाकडे वळल्यावर मात्र, कार्यक्रमाच्या स्वरूपात काही बदल करणे त्यांना भागच पडले. त्या वेळच्या टीव्ही स्टुडिओत जास्त पाहुणे बोलावणे शक्य होत नसल्यामुळे रेडिओप्रमाणे तिथे एकाच कार्यक्रमात एकापेक्षा जास्त पाहुण्यांची मुलाखत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सिनसिनाटीच्या ‘क्रॉस्लेज ब्रॉडकास्टिंग’च्या मालकीच्या ‘डब्ल्यूएलडब्ल्यूडी-टीव्ही’मध्ये ‘फिल डॉनाह्यूू शो’ सुरू करताना त्यांनी एक पाहुणा, एक विषय आणि प्रेक्षकांकडून फोनवर प्रश्न अशा स्वरूपाचा कार्यक्रम सुरू केला आणि तो अल्पावधीत लोकप्रियही झाला. इतका की, त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या २०० वाहिन्यांवरून प्रक्षेपित केले जात आणि त्यांना एकंदर ९० लाख प्रेक्षकसंख्या लाभत असे. त्यापैकी ९० टक्के महिला असत. श्रोते, प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा हा ‘फोन-इन’ कार्यक्रम आता जगभरात स्थिरावला आहे. फिल यांचा जन्म ओहायो राज्यातल्या क्लीव्हलँडमध्ये, मध्यमवर्गीय कुटुंबातला. विद्यापीठाच्या ‘कॅम्पस रेडिओ’पासून त्यांना निवेदनाची गोडी लागली. शिक्षण पूर्ण झाल्यावर मिशिगनच्या एका नभोवाणी केंद्रात कार्यक्रम दिग्दर्शक म्हणून नोकरी. मग ओहायोतल्या खासगी नभोवाणीवर सकाळच्या बातमीपत्राचे निवेदक अशी उमेदवारी करून ते छोट्या पडद्यावर आले. या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत ते सक्रिय राहिले. ‘डॉनाह्यूू यांच्यामुळेच आपण येथे आहोत’ असे अमेरिकेतील लोकप्रिय निवेदिका ओप्रा विन्फ्रे यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यातून त्यांचा प्रभाव दिसून येतोच, पण ओप्रा विन्फ्रेच्या आगमनानंतर डॉनाह्यूंच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला आणि हळूहळू ते बाहेर पडले, हेही खरे. अर्थात, त्यांच्या पहिलेपणाचा ठसा अमीटच राहील.