‘संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ’ हा भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या ‘संघराज्यवादाचे व त्याच्या क्षमतांचे आकलन’ या २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘लोकसत्ता लेक्चर’चा साररूप अनुवाद वाचला. त्यांचे विचार उद्बोधक आहेतच. मात्र सद्या:स्थितीत सत्ता आणि संपत्ती तसेच राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचे अतिरिक्त केंद्रीकरण झाले आहे. हे संघराज्यव्यवस्थेला आणि सामाजिक तसेच आर्थिक विकासाला पूरक नसून मारक आहे. आज स्वायत्त संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. तसेच लोकशाहीचे चार स्तंभ विधिमंडळ, न्यायपालिका, प्रशासन, प्रसारमाध्यमे आक्रसत आहेत ही चिंतेची बाब आहे. भारत जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही भारतीयांचे दरडोई सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ २७३० डॉलर्स आहे. अन्न ,वस्त्र, निवारा, बेरोजगारी, गरिबी हे सामान्य जनांचे ‘खरे प्रश्न’ आहेत. मात्र राजकारणी धर्म, वंश, जात, प्रांत, भाषा हे ‘नगण्य प्रश्न’ अधोरेखित करून लोकांची दिशाभूल करत आहेत. सर्वमान्य आणि मुक्त भ्रष्टाचार हे भारतीय व्यवस्थेचे फलित आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचे केंद्रीभूत पद्धतीने घेतलेले निर्णय अर्थव्यवस्थेला मारक ठरले आणि त्यात सामान्य नागरिक भरडले गेले. डॉ. विजय केळकर समितीच्या शिफारसी जीएसटी व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी व्यवहार्य आहेत. (१) १२ टक्के दराने संपूर्ण देशात जीएसटीची समान आकारणी (२) विकेंद्रित स्वायत्त जीएसटी परिषद (३) राज्यांना व स्थानिक स्वराज्य संस्थांना जीएसटीचा न्याय्य वाटा त्वरेने मिळण्यासाठी सुटसुटीत संस्थात्मक संरचना.

विकसित भारताचे स्वप्न पाहाताना व्यवस्थेचे जटिल वास्तव स्वीकारून त्यात सुसूत्रता आणावी लागेल. सत्ता आणि अर्थकारणाचे विकेंद्रीकरण तसेच संघराज्यवादाला बळकटी देणे हे विकसित भारताच्या वाटचालीतील कळीचे मुद्दे ठरतील!- डॉ. विकास हेमंत इनामदारपुणे

loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…

हिंदू म्हणजे कोण?

तिरुपती देवस्थानात हिंदू कर्मचारीच हवे’ ही नवनियुक्त अध्यक्ष बी. आर. नायडू यांची भूमिका (लोकसत्ता- १ नोव्हेंबर) आज मान्य केली तर उद्या मंदिरात/ गाभाऱ्यात फक्त तथाकथित सवर्णांनाच प्रवेश हीदेखील मागणी येऊन काळाची चक्रे उलटी फिरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो! कारण भेदभावाला एकदा परवानगी मिळाली की आपसूकच पुढच्या पुढच्या पायऱ्या गाठल्या जातातच. तसेही रजस्वला महिलांना मंदिर प्रवेशबंदी वगैरे मध्ययुगीन परंपरा (सर्वोच्च नेतृत्वाच्या जाहीर पाठिंब्यासकट) अजूनही तशा पाळल्या जातातच. खरा भक्त हा त्याच्या लिंग, जात, धर्म यापेक्षा त्याच्या कर्म व भावाने ओळखला जायला हवा ही प्रगल्भ सामाजिक जाणीव निर्माण होणे तर दूरच पण समाजाला त्याच त्याच चक्रात अडकवून ठेवून आपले कुटिल कारस्थान तडीस नेण्याच्या व्यापक डावपेचांचा हा भाग वाटतो. ‘हीनं नष्यति इति हिंदूह्ण अशीही हिंदू धर्माची एक व्याख्या आहे, तिला हे माणसामाणसांत भेद करायचे हीन काम करून आपण बट्टा लावतो आहोत याचेही भान या हिंदू धर्मासाठी आग्रही वगैरे असलेल्यांना राहिलेले नाही असेच खेदाने म्हणावे लागेल.-प्रवीण नेरुरकरमाहीम, मुंबई</p>

एस. सोमनाथ आणि स्टीफन हॉकिंग

‘‘तारे’ तोडण्याचे तर्कट!’ हे इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी परजीवसृष्टीच्या अस्तित्वाबाबत मांडलेल्या तर्कटाचा वेध घेणारे संपादकीय (२ नोव्हेंबर) वाचले. प्रसिद्ध भौतिक आणि विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे अंतराळातील अनेक रहस्ये उलगडण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिले. विश्वनिर्मितीच्या अनेक सिद्धांतांवर काम केल्यानंतर त्यांनी शेवटी ‘‘विश्वात कुठेही देव अस्तित्वात नाही’’ असे ठामपणे सांगितले. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विकास अमिबासारख्या एकपेशीय जीवापासून झाला आहे. पृथ्वीवरील निसर्गात पोटात लपलेल्या अनेक रहस्यांचा सागराच्या तळाशी, भूगर्भात शोध सुरू आहे. मानसाच्याच अनेक प्रजाती आजही समुद्रातील बेटांवर पाषणयुगीन जीवन जगताना दिसत आहेत. या प्रजाती प्रगत माणसाला त्यांच्या जवळ येऊही देत नाहीत. एस. सोमनाथ यांची विज्ञानातील उंची हॉकिंग यांच्या एवढी नक्कीच नसावी. ‘चांद्रयान- ३’ मोहिमेपूर्वी त्यांनी तिरुपती बालाजीला साकडे घातले होते. त्यांनी मांडलेल्या विश्वात आपल्यापेक्षा अतिप्रगत किंवा अप्रगत जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला कोणता सैद्धांतिक आधार आहे, हे तेच जाणोत. स्टीफन हॉकिंग यांचे ‘‘व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू मूर्खता नाही, तर ज्ञानी असल्याचा भ्रम आहे.’’ हे वाक्य प्रसिद्धच आहे. एस. सोमनाथ यांची अतार्किक मते (तारे) डार्विन यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारणाऱ्या विचारधारेला खतपाणी घालणारी आहेत.- किशोर बाजीराव थोरातनाशिक

परग्रहावरील जीवसृष्टीचा दावा आभासी!

‘‘तारे’ तोडण्याचे तर्कट!’ हे शनिवारचे संपादकीय वाचले. परग्रहजीवसृष्टीचा शोध वा त्याबद्दलचे आकर्षण याकडे कुतूहल म्हणून पाहता येईल. मानव आणि इतर सजीव प्राणी, पक्षी यांना आवश्यक असणारे पोषक वातावरण पृथ्वीवर आहे म्हणून इथे सजीवांची निर्मिती झाली आहे आणि त्याचप्रमाणे इतरग्रहांवर त्या ग्रहांवरील पोषक वातावरणाप्रमाणे तिथेही काही सृष्टीची निर्मिती असू शकते तिला जीवसृष्टी म्हणावे की काय ते पुढील संशोधनावरून सिद्ध होईल. पण ‘इस्राो’च्या अध्यक्षांनी परजीवसृष्टीबाबतचा मांडलेला सिद्धान्त आणि ‘पेंटागॉन’च्या- अधिकाऱ्याने परग्रहावरील जीवांनी पृथ्वीला भेट दिल्याचा सनसनाटी दावा म्हणजे ‘देव माझ्याशी बोलला’ सारखाच आभासी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये!- अनिरुद्ध गणेश बर्वेकल्याण पश्चिम

दिवाळीच्या काळात क्रिकेट सामने नकोच

भारत- न्यूझीलंड क्रिकेट कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामनासुद्धा भारत हरला आणि न्यूझीलंडला या मालिकेत तीन शून्य असे नेत्रदीपक यश मिळाले. मागील वीस वर्षांचा इतिहास बघितला तर दिवाळीच्या काळात क्रिकेट सामने आपण हरतच असतो, क्वचितच जिंकतो. याचे कारण खेळाडूंना दिवाळी साजरी करायलाच मिळत नाही, याविषयी खेळाडूंमध्ये नाराजी असावी असे वाटते. यापुढे दिवाळीच्या काळात क्रिकेट सामने ठेवू नयेत. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने याचा विचार करावा.- अमोल पाठकनागपूर

इस्रायलने क्रूरपणा सोडावा

इस्रायलचे बैरूतवर रात्रभर हल्ले’ ही बातमी (लोकसत्ता- २ नोव्हेंबर ) वाचली. सुमारे १३ महिन्यांपूर्वी इराण समर्थक आणि हमास या दहशतवादी संघटनेचा इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला एकप्रकारे मधमाशांच्या पोळ्यावर भिरकावलेला दगड ठरून चवताळलेल्या इस्रायलने आजतागायत प्रतिहल्ले करीत हमासला पुरते कमकुवत केले आहे; त्यामुळे गर्भगळीत झालेल्या इराणच्या इशाऱ्यानुसार लेबनॉनस्थित हेजबोला या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर रॉकेटचा मारा करताच प्रत्युत्तरादाखल इस्रायलने कारवाई करून हेजबोलाच्याही नाकी दम आणला आहे. तन्निमित्त नागरी वस्त्यांत किंवा विस्थापितांच्या निवारा केंद्रांवर हल्ला न करण्याचा जागतिक पातळीवर युद्ध – नियम सपशेल धाब्यावर बसवून इस्रायल राजरोस हल्ले करीत असल्याने अक्षरश: हजारो निरपराध आणि निष्पाप महिला, बालके, वृद्ध, अपंग आणि आजारी नागरिकांचा नाहक बळी जात आहे. या कारणामुळे इस्रायल जगाची सहानुभूती गमावत आहे. गाझापट्टी असो किंवा बैरूत – इस्रायलने ‘क्रूरपणा सोडून संघर्ष करणे’ एवढेच जगाला अपेक्षित असू शकते!-बेन्जामिन केदारकर नंदाखाल (विरार)

कल्पकतेला सलाम ठीक; पण…

मोदींच्या कल्पकतेला सलाम!’ हे पत्र ( लोकमानस- २ नोव्हेंबर) वाचले. पंतप्रधान दरवर्षी सैनिकांसह काही तास दिवाळी साजरी करतात या उपक्रमातील कल्पकता सैनिकांच्या मनोधैर्यासाठी निश्चितच उपयोगी आणि अभिनंदनीय आहे. तथापि मोदींच्या या कल्पकतेमागे स्वत:चे प्रतिमा संवर्धन करणे यासारखे हेतूही आहेत का, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा प्रचारकी थाटात मिरवणारे मोदी सरकार सैनिकांप्रति किती असंवेदनशील आहे हे कॅगच्या २०२० च्या अहवालातून समोर आले. जवानांसाठी योग्य बूट व अन्य साधनांचा तुटवडा त्यातून उघड झाला होता!-बाळकृष्ण शिंदेपुणे

Story img Loader