अमृतांशु नेरुरकर, ‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.

१९७० आणि ८०च्या दशकात चिपनिर्मिती उद्योगाचा लंबक पाश्चिमात्य देशांकडून पौर्वात्य देशांकडे सरकला. त्यानंतरच्या चार दशकांचं विश्लेषण केल्यास भूराजकीय परिप्रेक्ष्यात आज या क्षेत्राची सद्य:स्थिती काय? चिप उद्योगाकडून सर्वाधिक संख्येने निर्मिल्या जाणाऱ्या केवळ दोन प्रकारच्या चिपचा विचार करूया. जगभरात लॉजिक चिपचे उत्पादन करणाऱ्या केवळ सहा कंपन्या आहेत, ज्यांचा एकूण बाजारहिस्सा ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे – तैवानस्थित ‘टीएसएमसी’ आणि ‘यूएमसी’, दक्षिण कोरियाची ‘सॅमसंग’, चीनची ‘एसएमआयसी’ आणि अमेरिकेची ‘इंटेल’ व ‘ग्लोबल फाऊंडरीज’! तैवान, दक्षिण कोरिया आणि चीन या तीन आशियाई देशांचा लॉजिक चिपच्या निर्मितीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक वाटा आहे.

viagra tablet for dimensia
लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?
bajaj housing finance files drhp for rs 7000 crore ipo
बजाज हाऊसिंग फायनान्सचा ‘सेबी’कडे ७,००० कोटींच्या ‘आयपीओ’साठी प्रस्ताव
Gadchiroli, Recovery,
गडचिरोली : ‘यलो बेल्ट’साठी भूमाफियांच्या माध्यमातून लाखोंची वसुली? अर्चना पुट्टेवारच्या कार्यकाळातील घोटाळे…
Elon Musk China Visit
‘स्पेसएक्स’च्या महिला कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध, मुलं जन्माला घालण्यास दबाव; एलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप
adani group companies share surge
लोकसभेच्या निकालाआधी अदाणी समूहाचे शेअर्स वधारले; गौतम अदाणी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
bribe of three lakhs was paid on name of the chief officer of MHADA
धक्कादायक! म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर पावणेतीन लाखांची लाच
CIDCO Establishes 24 Hour Emergency Control Room, CIDCO Establishes Emergency Control Room in Panvel, CIDCO Establishes 24 Hour Emergency for monsoon, navi Mumbai monsoon, navi Mumbai news,
पनवेल : आपत्तीवर मात करण्यासाठी सिडकोचे आपत्कालिन कक्ष सज्ज
share market update sensex falls 220 point nifty stable below 22900
निकालाआधी नफावसुलीला प्राधान्य…; ‘सेन्सेक्स’ची २२० अंशांची पीछेहाट

मेमरी चिप उद्योगाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आज या क्षेत्रावर दक्षिण कोरियाची मक्तेदारी आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. दक्षिण कोरियाच्या सॅमसंग व एसके हायनिक्स या दोन कंपन्यांचे मेमरी चिप उद्योगावर अधिराज्य आहे. या दोन कंपन्या वगळता जपानची किऑक्सिया तर अमेरिकेची मायक्रॉन आणि वेस्टर्न डिजिटल या तीनच कंपन्या मेमरी चिप उत्पादन आणि महसुलाच्या बाबतीत दखलपात्र म्हणण्याजोग्या आहेत. म्हणजेच लॉजिक चिपप्रमाणेच, मेमरी चिप उद्योगही पूर्व आशियाई कंपन्यांच्या हाती एकवटला आहे.

चिपची संरचना, आरेखन, तसेच त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर संसाधनांमध्ये आजही अमेरिकेची मक्तेदारी आहे; तर चिपनिर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीत (उदा. फोटोलिथोग्राफी) युरोपीय कंपन्या आघाडीवर आहेत. पण घाऊक स्तरावरील चिपनिर्मितीमध्ये मात्र आग्नेय आशियाई देशांची सद्दी उलथवणे (मेमरी चिप – ९० टक्के बाजारहिस्सा, लॉजिक चिप – ७५ टक्के बाजारहिस्सा) गेल्या तीन-चार दशकांत अमेरिकेसारख्या महासत्तेलाही जमू शकलेले नाही.

सुरुवात जपानपासूनच..

वरील विश्लेषणामध्ये ठळकपणे जाणवत नसलं आणि आजघडीला तो देश चिपनिर्मिती स्पर्धेत काहीसा मागे पडलेला असला, तरीही चिपनिर्मितीमध्ये आशियाई वर्चस्वाची सुरुवात जपानपासून झाली होती. दुसऱ्या महायुद्धाची सर्वाधिक झळ पोचलेल्या देशांमध्ये जपानचे स्थान वरचे होते. साफ विस्कटलेली सामाजिक व आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी जपानला अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्यावर आधारित उद्योगांची नितांत गरज होती. पन्नासच्या दशकात जपानने ‘कॉपी इट’, थोडक्यात तंत्रज्ञानात पाश्चात्त्यांचे अनुकरण करा, हे धोरण अंगीकारले व देशांतर्गत उत्पादन क्षेत्राचा श्रीगणेशा केला.

सुरुवातीच्या काळात उत्पादन क्षेत्रात पाय रोवण्यासाठी हे धोरण उपयोगी होते. पण दीर्घकालीन नियोजनाच्या दृष्टिकोनातून, जपानी उत्पादनांवर ‘स्वस्त आणि हलक्या दर्जाची’ असा बसलेला शिक्का पुसण्यासाठी तसेच गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवण्यासाठी, या धोरणात बदल घडवणे अत्यावश्यक होते. साठच्या दशकात जपानी राज्यकर्ते आणि कंपन्यांनी त्यानुसार पावले टाकायला सुरुवात केली. यात आघाडी घेतली अकिओ मोरिता या अत्यंत कल्पक उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘सोनी’ या कंपनीने!

सोनी या नाममुद्रेची भारतीयांना नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही इतके हे नाव आपल्याला सुपरिचित आहे. विसाव्या शतकात जपानी इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा सोनी हा एक प्रमुख चेहरा होते. सोनीच्या उत्पादनांना जगभरात पोहोचवायचे असेल तर त्याचा केवळ दर्जा उच्च असून चालणार नाही; तर त्यापुढे जाऊन उत्पादनात नावीन्यपूर्णताही आणावी लागेल याची मोरितांना पूर्ण कल्पना होती. म्हणून त्यांनी ‘प्रॉडक्ट इनोव्हेशन’ नावाचा एक स्वतंत्र विभाग प्रस्थापित केला. केवळ नावीन्यपूर्णतेसाठी समर्पित एक वेगळा विभाग निर्माण करणारी सोनी ही पहिली जपानी कंपनी होती. उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना हेरून, त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवून, नंतर सोनीमध्ये समाविष्ट करून घेतले जाई.

या सर्व मेहनतीची फळे सोनीला लगेच मिळू लागली. साठच्या दशकात लोकप्रिय झालेला ट्रान्झिस्टर रेडिओ, पुढे अत्यंत गुंतागुंतीची आणि क्लिष्ट स्वरूपाची आकडेमोड करू शकणारा कॅलक्युलेटर आणि या सर्वावर कळस म्हणजे १९७९ मध्ये बाजारात आलेला व संगीत क्षेत्रात क्रांती घडवणारा ‘वॉक-मन’! माणसाला चालताना किंवा प्रवास करताना स्वत:पुरते खासगी संगीत ऐकता येईल ही कल्पना सत्तरच्या दशकात तरी स्वप्नवतच होती. म्हणूनच ४० कोटींच्या घरात विक्री झालेले वॉक-मन हे सोनीचे सर्वात यशस्वी उत्पादन ठरले. वॉक-मन असो नाहीतर ट्रान्झिस्टर, ही सर्वच उच्च दर्जाच्या आणि त्याच वेळेला नावीन्यपूर्ण अशा उत्पादनांची खरीखुरी उदाहरणं होती.

सत्तरच्या दशकाच्या मध्यावर केवळ सोनीच नव्हे तर निकॉन, कॅनन, शार्प, कॅसिओ, पॅनासॉनिक, हिताची, तोशिबा अशा कितीतरी जपानी कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर संपूर्ण जगभरात आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली होती. या सर्व कंपन्यांच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनात सेमीकंडक्टर चिप हा एक मूलभूत घटक होता, ज्याच्यावाचून त्या उत्पादनाच्या कार्यात बाधा निर्माण झाली असती. एवढेच नव्हे तर ग्राहकांच्या सुलभ हाताळणीसाठी जपानी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे जे सूक्ष्मीकरण (मिनिएचरायझेशन) केले होते, त्यात आकाराने लहान पण क्षमतेने वृिद्धगत होत गेलेल्या चिपचा महत्त्वाचा वाटा होता.

साहजिकच सुरुवातीच्या काळात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व जपानी कंपन्या चिप आरेखन आणि निर्मितीसाठी जवळपास १०० टक्के अमेरिकी चिपनिर्मिती कंपन्यांवर अवलंबून होत्या. पण ज्या गतीने इलेक्ट्रॉनिक क्षेत्र वाढत होते ती गती कायम राखण्यासाठी चिपची उपलब्धता हा कळीचा मुद्दा होता व त्यासाठी सर्वस्वी अमेरिकेवर अवलंबून राहणे फार काळपर्यंत जपानी कंपन्यांना परवडणारे नव्हते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी मग जपानी सरकार या कंपन्यांच्या मदतीला धावून आले. एका बाजूला विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंधने लादण्यात आली तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत चिपनिर्मितीसाठी जपानी कंपन्यांना अत्यंत कमी व्याजावर प्रचंड मोठे भांडवल उपलब्ध करून देण्यात आले.

चिपनिर्मितीचा अद्ययावत कारखाना उभारणे हा नेहमीच अत्यंत खर्चीक व प्रचंड जोखमीचा प्रकल्प असतो. पण स्वस्त भांडवलाची उपलब्धता व शासनाचा भरभक्कम पाठिंबा या दोघांच्या जोरावर सोनी, हिताची, तोशिबा अशा अनेक जपानी इलेक्ट्रॉनिक कंपन्या चिपनिर्मिती क्षेत्रात उतरल्या. तोवर मेमरी चिपच्या आरेखनाचे प्रमाणीकरण बऱ्याच अंशी झाले होते. त्याचबरोबर संगणक किंवा तत्सम कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असो- या चिपचा उपयोग केवळ विदेच्या (तात्पुरत्या) साठवणुकीसाठी होणार होता. त्यामुळे जपानी कंपन्यांना तिचे घाऊक उत्पादन करणे हे व्यावसायिक दृष्टिकोनातून किफायतशीर तर होतेच; पण एकंदर इलेक्ट्रॉनिक उद्योगाच्या वाढत्या पसाऱ्यासाठी साहाय्यभूतही ठरले असते.

जपान हा पहिल्यापासूनच दीर्घपल्ल्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करणारा, अत्यंत मेहनती लोकांचा व उत्पादन क्षेत्रातील उच्च कार्यक्षमतेसाठी म्हणून ओळखला जाणारा देश आहे- या बाबी सेमीकंडक्टर चिपनिर्मिती उद्योगासाठी आत्यंतिक महत्त्वाच्या आहेत. अपेक्षेनुसार ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपासूनच मेमरी चिपनिर्मिती उद्योगात (विशेषत: डीरॅम चिप) जपानी कंपन्या अधिराज्य गाजवू लागल्या. इतक्या की १९८५ पर्यंत इंटेलचा (जिने जगातील पहिली डीरॅम चिप बनवली होती) मेमरी चिपनिर्मितीतला बाजारहिस्सा दोन टक्क्यांपेक्षाही खाली आला.

१९८० पर्यंत अमेरिकी सरकार आणि चिपनिर्मिती कंपन्या जपानच्या या क्षेत्रातील स्पर्धेला फारसे महत्त्व देत नव्हत्या. त्यांच्या समजुतीनुसार भलेही जपानने मेमरी चिपनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले असेल, पण तांत्रिक क्षमतेवर अमेरिकी चिप कंपन्या जपानच्या अनेक योजनेपुढे होत्या. अमेरिकेचा हा भ्रमाचा भोपळा फुटायला फार काळ जावा लागला नाही. त्याच वर्षी ह्यूलेट पॅकार्ड (एचपी) या संगणकीय हार्डवेअर क्षेत्रातील अमेरिकी बलाढय़ कंपनीने आपल्या संगणक व इतर साहाय्यक उपकरणांसाठी (पिंट्रर, स्कॅनर इत्यादी) लागणाऱ्या मेमरी चिप इंटेल, नॅशनल सेमीकंडक्टर्स वगैरे अमेरिकी कंपन्यांना डावलून प्रथमच तोशिबा, एनईसी यांसारख्या जपानी कंपन्यांकडून खरेदी करण्याचा इरादा जाहीर केला.

आपल्या उपकरणांसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक सुटे भाग खरेदी करण्यासाठीचे एचपीचे नियम अत्यंत कठोर होते. त्यामुळेच एचपीच्या या एका निर्णयाने सिलिकॉन व्हॅलीमधील चिप उत्पादक कंपन्या खडबडून जाग्या झाल्या. स्वत:चे मुख्यालय सिलिकॉन व्हॅलीत असूनही सिलिकॉन व्हॅलीमधल्या चिप उत्पादकांना डावलण्याचा निर्णय एचपीने का घेतला होता? अमेरिकी चिप कंपन्यांची मक्तेदारी उतरणीला लागण्याची सुरुवात झाली होती का? अशा जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता चिप कंपन्यांकडे कोणते पर्याय होते? या प्रश्नांचे अवलोकन पुढील सोमवारी करूया.