एल. के. कुलकर्णी, लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.

भारतातील अर्थकारण, समाजजीवन, संस्कृती सारे काही ज्या मोसमी वाऱ्यांभोवती फिरते, त्यांचा अभ्यास जगभरातील तज्ज्ञ इसवी सन पूर्व काळापासून करत आले आहेत, मात्र त्याविषयीची उत्सुकता आजही कायम आहे.

Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
representation of women in the lok sabha after general elections 2024
अग्रलेख: राणीचे राज्य…
Terror Attacks in Jammu and Kashmir,
अग्रलेख : दहशत आणि दानत!
massive crowd gathered for team india world cup victory parade
अग्रलेख: उन्माद आणि उसासा

मान्सून हे एक प्रकारचे वारेच. पण त्यावर भारतीयांचे अस्तित्व, भावना आणि स्वप्ने अवलंबून असतात. ‘मान्सून’ किंवा मोसमी वारे हा शब्द मूळच्या ‘मौसम’ या अरबी शब्दावरून आलेला आहे. तशी या वाऱ्याची माहिती जगाला फार पूर्वीपासून होती. इ. स. पूर्व ३३४ मध्ये अरिस्टॉटलने ‘अरबी समुद्रात अव्याहतपणे आलटूनपालटून पूर्व व पश्चिमेकडून वाहणाऱ्या’ वाऱ्यांचा उल्लेख केला आहे. अलेक्झांडरचा सेनापती निआर्कस हा भारताकडील सागरी मार्गाचा आद्य प्रणेता मानला जातो. इ. स. पूर्व ३२४ मध्ये सिंधू नदीच्या मुखापासून सागरी मार्गाने परत जाताना तो ‘पश्चिमेकडून येणारे वारे’ थांबेपर्यंत अडकून पडला होता. पण मान्सून वाऱ्यांच्या शोधाचे श्रेय मात्र पहिल्या शतकातील ‘हिप्पालस’ या ग्रीक नाविक व व्यापाऱ्याला दिले जाते. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या पहिल्या शतकातील प्रसिद्ध संदर्भग्रंथात त्याचा उल्लेख आहे.

पुढे आठव्या ते बाराव्या शतकातील अब्बासी खलिफांच्या राजवटीत मोठी जहाजे उन्हाळय़ात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यासोबतच अरबस्तानातून भारताकडे येत. दहाव्या शतकात अल मसुदी या अरब भूसंशोधकाने अरबी समुद्रातील पूर्व व पश्चिमी अशा आलटूनपालटून वाहणाऱ्या वाऱ्यांचे वर्णन केले आहे. याच काळात चोल राजवटीत आग्नेय आशियाई भागाकडे मोठा व्यापार व लष्करी मोहिमा होत असत. अर्थातच त्यासाठी मान्सून व इतर वाऱ्यांचे ज्ञान आवश्यक होते. पण त्यांच्या नाविक प्रवासाचे वेळापत्रक व इतर तपशील यांच्या नोंदी उपलब्ध नाहीत. पंधराव्या शतकातील अरब कवी, नकाशा व भूगोलतज्ज्ञ इब्न माजिद याला अरबी समुद्रातील सागरी प्रवासाचे ज्ञान होते. वास्को द गामाला त्यानेच भारताचा मार्ग दाखवला, असे मानले जाते. नंतर मात्र पोर्तुगीज, अरब व इतर युरोपीय व्यापारी आणि भूसंशोधकांनी मोसमी वाऱ्यांचे वेळापत्रक, दिशा इत्यादीचे सखोल ज्ञान मिळवले. त्यांच्या जहाजांच्या लॉग बुकमधील नोंदी व माहितीपत्रके ही एक मौल्यवान संपत्ती किंवा ‘ट्रेड सिक्रेट’ मानले जाई. या ज्ञानाच्या आधारेच पुढे पोर्तुगीजांसह, डच, फ्रेंच आणि इंग्रज इत्यादींच्या भारताकडील सागरी प्रवास व व्यापाराचे प्रमाण वाढले. एकंदरीत जहाजांनाच नव्हे तर भारताच्या इतिहासालाही दिशा देण्यात मान्सून वाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

पण त्यांची निर्मिती कशी व का होते, याचे स्पष्टीकरण मात्र हजारो वर्षे कुणालाही माहीत नव्हते. हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणाऱ्या एडमंड हॅले यांनी रॉयल सोसायटीच्या सूचनेवरून भारतीय मान्सूनच्या पॅटर्नचा अभ्यास केला व १७८६ मध्ये त्यावर एक ग्रंथ प्रसिद्ध केला. सूर्याच्या उष्णतेमुळे हिंदी महासागराचे पाणी आणि दक्षिण आशियाची भूमी हे कमी-अधिक तापतात. त्यातून मान्सून वारे भारताच्या दिशेने वाहतात, असे  स्पष्टीकरण हॅले यांनी दिले. ते मूलत: बरोबर होते. १७३५ मध्ये जॉर्ज हेडली यांनी भारतीय उपखंडात मान्सूननंतर वाहणाऱ्या ईशान्य व्यापारी वाऱ्यांचे स्पष्टीकरण दिले. १८१७ मध्ये थोर जर्मन भूगोलसंशोधक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनी भारतात मान्सून व ईशान्य व्यापारी वारे आलटूनपालटून वाहण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले. १८७५ मध्ये भारतात भारतीय हवामान खात्याची स्थापना झाली. गावोगावी अनेक वेधशाळा उभारण्यात आल्या. वरील सर्व प्रयत्नांतून मान्सूनचे रहस्य बरेचसे उलगडले आहे.

विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूपाने पडतात. त्यामुळे तेथील तापमान वाढून कमी भाराचा पट्टा तयार होतो, त्याला ‘डॉल्ड्रम’ म्हणतात. वारे जास्त भाराकडून कमी भाराकडे वाहतात. यामुळे वर्षभर कर्कवृत्त व मकरवृत्ताकडून विषुववृत्ताकडे वारे वाहतात. त्यांना ‘व्यापारी वारे’ म्हणतात. उत्तर गोलार्धातील व्यापारी वाऱ्यांना ईशान्य व्यापारी वारे तर दक्षिण गोलार्धात आग्नेय व्यापारी वारे म्हणतात. खरे तर हे वारे वर्षभर वाहायला हवेत. पण उत्तरायणाच्या काळात पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकू लागतो. त्यामुळे सूर्य उत्तरेकडे सरकत अखेर २१ जून रोजी सूर्यकिरणो कर्कवृत्तावर लंबरूप पाडतात. अर्थातच विषुववृत्तावरील डॉल्ड्रम हा कमी भाराचा पट्टाही कर्कवृत्तावर सरकतो. आता दक्षिण गोलार्धातील मकरवृत्तावरून येणारे आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्तावर आले तरी तिथे कमी भाराचा डॉल्ड्रम नसतो. यामुळे हे वारे विषुववृत्त ओलांडून कर्कवृत्ताकडे जाऊ लागतात. पण विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात येताच त्यांची दिशा बदलते. फेरेलच्या नियमानुसार पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धातील वारे उजवीकडे वळतात. त्यानुसार आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडताच नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहू लागतात. त्यामुळे त्यांना ‘नैर्ऋ त्य मान्सून वारे’ म्हणतात. ते जूनपासून समुद्रावरून भारतीय उपखंडावर येतात. तेच नैर्ऋ त्य मान्सून वारे. पुढे २३ सप्टेंबर रोजी डॉल्ड्रम परत विषुववृत्तावर येतो. त्यामुळे हे नैर्ऋ त्य वारे वाहायचे थांबून नेहमीप्रमाणे ईशान्य व्यापारी वारे वाहू लागतात. असाच प्रकार ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या बाबतीत दक्षिण गोलार्धात होतो. जानेवारी ते एप्रिल या काळात ते विषुववृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धात जातात व वायव्य मान्सून वारे म्हणून वाहू लागतात.

सोबतची आकृती पाहा. भारतावर अरबी समुद्रावरून येणारे नैर्ऋ त्य मोसमी वारे हे मुळात दक्षिण गोलार्धातून मकरवृत्तावरून निघालेले असतात. त्यांचा हजारो कि. मी. चा प्रवास समुद्रावरून असल्याने ते प्रचंड प्रमाणात बाष्प घेऊन येतात. याचमुळे जोपर्यंत ते वारे भारतावरून वाहतात, तोपर्यंत (जून ते सप्टेंबर) भारतावर पाऊस पडतो. म्हणूनच  भारतात चार महिन्यांचा स्वतंत्र पावसाळा हा ऋतू तयार झाला आहे. सप्टेंबरपासून मोसमी वारे थांबून भारतावरून ईशान्य व्यापारी वारे वाहू लागतात. हे मुख्यत: जमिनीवरून समुद्राकडे वाहत असल्याने कोरडे असतात. उत्तर भारतात ‘पुरबाई’ म्हणून ओळखले जाणारे वारे ते हेच. त्यांच्यामुळे फक्त किनारी भागात थोडा पाऊस पडतो. या विवेचनावरून भारतात ८० टक्के पाऊस पावसाळय़ाच्या चारच महिन्यांत का पडतो हे स्पष्ट होईल.

‘मी खूप पावसाळे पाहिलेले आहेत’ या वाक्प्रचारात ‘पावसाळे’च का, हिवाळे किंवा उन्हाळे का नाहीत, याचे कारण मान्सूनच्या व्यामिश्र स्वरूपात दडलेले आहे. अनिश्चितता, अनियमितता, केंद्रितता व वितरणातील असमानता ही मान्सूनची वैशिष्टय़े आहेत. म्हणजे त्याचे आगमन व परतीची तारीख, तसेच तो कुठे, केव्हा, किती व कसा बरसणार हे कधीही नक्की नसते. त्यामुळे पूर, अवर्षण, अतिवृष्टी, वीज पडणे, पेरण्या वाया जाणे, भरघोस उत्पादन, प्रवासातील अडथळे, आजारपणे, साथीचे आजार, संकटे, त्यावर मात यासह आशा- निराशेचे खेळ- असे कितीतरी जीवनानुभव केवळ या चार महिन्यांत माणसाला येऊन जातात. म्हणूनच माणसाची अनुभवसमृद्धी ही पावसाळय़ाच्या संदर्भातच मोजली जाते. नाही तरी युगानुयुगे शेतीप्रधान भारतातील कोटय़वधी लोकांची समृद्धी आणि गरिबी, सुखे आणि दु:खे यांचा मान्सून हाच खेळीया राहिलेला आहे. पण त्याचा खेळ जेवढा अगम्य आहे, तेवढेच इतर असंख्य गोष्टींसाठी वेळ व रस असणाऱ्या आपल्या कृषीजीवी पिढय़ापिढय़ांना या आजही जीवनस्पर्शी विषयाच्या अभ्यासासाठी वेळ व रस नसावा हेही अगम्य आहे.

(डॉल्ड्रम व नैर्ऋत्य मान्सून वारे (स्रोत-इंटरनेटवरून साभार))