गुजरात विधानसभा २०२२ च्या निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भाजप नेते तुम्हाला वनवासी म्हणून संबोधतात. तुमचा अवमान करतात. तुम्ही आदिवासी आहात. या देशातले पहिले रहिवासी आहात, हे ते नाकारतात. भाजपने ‘वनवासी’ शब्द कसा योग्य आहे, याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मुळात आदिवासी की वनवासी, हा वाद बराच जुना आहे. संविधानसभेत जयपालसिंग मुंडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता की आम्ही आदिवासी असताना आमच्यासाठी ‘जनजाती’ हा शब्द वापरणे अवमानकारक आहे. कारण त्यातून आम्ही असंस्कृत, असभ्य आहोत, असा निर्देश करायचा असतो. स्वत: मुंडा यांनी ‘आदिवासी’ शब्दच वापरला. त्यांनी आदिवासी महासभेची १९३८ साली स्थापना केली होती. अखेरीस संविधानामध्ये ‘अनुसूचित जनजाती’ असा शब्दप्रयोग केला गेला. ब्रिटिश काळापासून या समूहासाठी विशेष कायदे करण्याची आवश्यकता आहे, याची जाणीव निर्माण झालेली होती. मुंडा यांनी या समूहाच्या हितासाठी आग्रही भूमिका मांडली. त्यानुसार अनेक सांविधानिक तरतुदी त्यांच्यासाठी केल्या गेल्या. त्यापैकीच एक तरतूद आहे ती अनुसूचित जनजातींच्या राष्ट्रीय आयोगाची. अनुच्छेद ३३८ (क) मध्ये या स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे. या आयोगाला ८९ व्या घटनादुरुस्तीने (२००३) स्वतंत्र स्थान मिळाले.
संविधानभान: आदिवासी उलगुलान !
अनुच्छेद ३३८ (क) मध्ये अनुसूचित जनजातींच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे...
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-11-2024 at 02:53 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSभारतीय संविधानIndian Constitutionमराठी बातम्याMarathi Newsविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan establishment of national commission for scheduled tribes amy