आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०१३ साली व्हर्जिनीयस खाखा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली…
एस.एस. राजामौली यांचा ‘आर. आर. आर. (२०२२) हा सिनेमा प्रदर्शित झाला. तो प्रचंड गाजला; मात्र यातील कोमाराम यांच्या पात्रावरून वाद झाला. गोंड आदिवासींचा अवमान झाला, अशी टीका केली गेली. अगदी काही संशोधनपर लेखांमध्येही आदिवासींचे पठडीबाज चित्रण केले आहे, असे म्हटले गेले. केवळ हाच सिनेमा नव्हे बहुतांश बॉलीवूड सिनेमाने आदिवासींचे असेच एकारलेले, पठडीबाज आणि व्यंगात्मक चित्र रंगवले आहे. अगदी ‘चढ गया पापी बिछुआ’ ते ‘झिंगा लाला हू हू’ अशा गाण्यांमधूनही आदिवासी हे रानटी, विक्षिप्त, जंगली असतात, असे दाखवले गेले आहे. ते मागास, बुद्धू आणि असभ्य आहेत, असे सातत्याने म्हटले जाते. थेट म्हटले नाही तरी बहुसंख्यांच्या नेणिवेत ते असते. जयपालसिंग मुंडा संविधानसभेत आले तेव्हाही त्यांना हीन दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच ते संविधानसभेत म्हणाले, ‘‘मी जंगली आहे, याचा मला अभिमान आहे.’’ जंगली हे नकारात्मक अर्थाने म्हटले गेले असले तरी ‘जल, जंगल, जमीन’ यांच्याशी असलेले जैव नाते मुंडा यांनी अधोरेखित केले आणि आदिवासी समुदायासाठी संवैधानिक तरतुदींचा आग्रह धरला.

© The Indian Express (P) Ltd