अनुसूचित जातींच्या राष्ट्रीय आयोगाकडे २०२० ते २०२४ या काळात ४७ हजारांहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या, असे एका माहिती अधिकाराला दिलेल्या उत्तरातून समोर आले. दलितांवरील अत्याचार, जमिनीच्या संदर्भात असणारे वाद आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये होणारे संघर्ष या अनुषंगाने या तक्रारी होत्या. उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक तक्रारी केल्या गेल्या होत्या. उन्नाव आणि हाथरस या ठिकाणच्या नृशंस घटना माध्यमांमधून ठळकपणे समोर आल्या; मात्र अशा अनेक घटना सातत्याने घडतात. शेकडो वर्षे सामाजिक व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकलेला हा वर्ग. त्याच्यावरील अत्याचाराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या वर्गासाठी विशेष तरतुदी केल्या पाहिजेत, याची जाणीव संविधानकर्त्यांना होती. त्यामुळेच संविधानातील ३३८ व्या अनुच्छेदानुसार ‘अनुसूचित जातींचा आणि जमातींचा राष्ट्रीय आयोग’ स्थापन केला गेला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा