चार-पाच गावांतली भाषणे आटोपून सांगोल्यातल्या बैठकांना हजेरी लावून बापू पाटील परतले तेव्हा सायंकाळचे चार वाजले होते. पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. दोन ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेवणाचे ताट समोर धरले पण त्यांच्या डोळ्यासमोर ‘ती’ बंडलेच यायची. गावाजवळच्या शेतात नव्यानेच बांधलेल्या प्रशस्त बंगल्यातून साहेबांना ‘झाडी-डोंगर’ दिसावे म्हणून नोकराने खिडक्या उघडताच त्यांनी रागाने त्याच्याकडे बघितले. ते आल्याची वर्दी मिळताच सारे दिवाणखान्यात जमले. त्यात ‘त्या’ काळरात्री गाडीत असलेले स्वीय साहाय्यक, कंत्राटदाराची माणसे, त्यांचा पुतण्या होते. या साऱ्यांना चाबकाने फोडून काढायला हवे असा विचार मनात आला पण निवडणूक काळात आणखी विघ्न नको म्हणत तो त्यांनी टाळला, सारे माना खाली घालून उभे असलेले बघून त्यांचा पारा चढला. ‘मूर्खांनो, काही बोलाल की नाही’ तरीही कुणी मान वर केली नाही. पाटलांनीच सुरुवात केली.
उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…
विरोधकांना भलेही ‘खोके खोके’ म्हणून ओरडू देत पण आरोप होत नाहीत तोवर गरिबी हेच प्रचाराचे उत्तम हत्यार असते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-10-2024 at 01:14 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article sanjay raut allegations on shahaji bapu patil links to cash seizure case zws